महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,241

अदालत राजवाडा

By Discover Maharashtra Views: 2128 3 Min Read

अदालत राजवाडा –

नुसते नाव जरी ऐकले की आठवतात छत्रपती थोरले शाहू महाराज , आठवतात अदालत राजवाडा याच वाड्यात बसून न्यायदान करणारे  थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज, आठवतात त्या, करारीपणे वावरणाऱ्या पण तिक्याच प्रेमळपणे जनतेला राजवाड्याची द्वारे खुल्या करणाऱ्या रयतेला पुत्रवत प्रेम करणाऱ्या राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले.

छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जेव्हा किल्ले अजिंक्यतारा राजधानी म्हणून कमीपडू लागल्या नंतर राजधानी शाहूनगर (सातारा शहर) वसवले तेव्हा प्रथम काही वास्तू बांधल्या. सन १७२०/२१ मधील काही पत्रांमध्ये तसे उल्लेख आढळतात. शाहूनगर अर्थात सातारा शहर हे सुनियोजित शहर. शहर वसवताना किल्ले अजिंक्यतारा च्या माचीवर अर्थात अर्ध्या डोंगरावर बालेकिल्ल्या बांधला. मी बालेकिल्ला या साठी म्हणतोय कारण आपण जर अध्यास केला आणि नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की नगरपालिका भागा पासून ते  समर्थ मंदिर चौक इथं पर्यंत राजकारभारा निगडित वास्तू किंवा तत्सम इमारती किंवा त्यांच्या खाणाखुणा दिसतात. पण या माचीच्या अगदी मध्यभागी तख्तवाडा( सध्याची गुरुवार बाग), रंगमहाल( सध्याची गुरुवार पेठ मधील कूपर कंपनी) शेजारी विरुबाई आणि फत्तेसिंह वाडा, जुना हत्तीखाना, पागा यांची जागा अशा शाहूकालीन सातारा शहराच्या अनेक खुणा पहावयास मिळतात.  एका होळी सणाच्या दिवशी लागलेल्या मोठ्या आगीत आणि काळाच्या ओघात अनेक वास्तू नाहीशा झाल्या पण आजही सातारा शहराच्या स्थापने पासून दिमाखात उभा असलेला हा अदालत राजवाडा सातारा शहराची शान आणि स्वाभिमान आहे.

मुळातच अदालत हे नाव छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराजांच्या काळात पडलेले नाव आहे. या वाड्या वापर पूर्वी खाजगी वापरासाठी केला जात असे. करवीर छत्रपती संभाजीराजे जेव्हा साताऱ्यास छत्रपती शाहूंच्या भेटीस येत तेव्हा याच वास्तूत राहिल्याचे सांगितले जाते. प्रतापसिंह महाराजांच्या काळात या वास्तू मध्ये हुजूर अदालत अर्थात छत्रपतींचे कोर्ट भरत असे. एक आख्यायिका सांगितली जाते की येथे एक घंटा लावलेली असे. ज्या कोणास न्याय हवा असेल ती व्यक्ती येथे येऊन ती घंटा ( आजही अदालत वाद्य मध्ये ही घंटा प्रवेशद्वारा जवळ दिसते) वाजवत असत.

हइ वास्तू अत्यंत देखणी आहे. तत्कालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. हा वाडा ६७ मीटर लांब आणि ४८ मीटर रुंद आहे. प्रतापसिंह महाराजांच्या पश्चात छत्रपती अप्पासाहेब महाराज यांच्या काळात देखील येथे कोर्ट भरत असे. १८४८ साली संस्थान खालसा झाल्या नंतर देखील (१८७६ पर्यंत) या वास्तू मध्ये ब्रिटिश कोर्ट भरत असे. कालांतराने छत्रपतींचे जवळपास सर्वच राजवाडे ब्रिटिशांनी जप्त केले होते. कालांतराने छत्रपतींकडे हा वाडा आला आणि येथेच छत्रपतींचे निवासस्थान झाले. आजही हा वाडा छत्रपती घराण्याचे निवासस्थान आहे. छत्रपतींचे वंशज आदरणीय छत्रपती शिवाजीराजे महाराज साहेब येथे निवास करतात. शहर स्थापने पासून सध्या च्या काळा पर्यंत कित्येक घटना, आठवणी पाहत ही वास्तू आजही दिमाखात मराठ्यांच्या राजधानी मध्ये उभी आहे.

Abhijeet Jagdale

Leave a comment