वीरगळ म्हणजे काय ?

Discover Maharashtra 1

वीरगळ म्हणजे काय ? आणि वीरगळची व्यथा

वीरगळ हा कानड़ी वीरकल्लू या शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. कल्लू म्हणजे दगड,वीरकल्लू म्हणजे वीराचा दगड.वीराच्या स्मृति जीवंत ठेवन्यासाठी वीरगळ कोरल्या जात असत.साधारण दोन-अडीच फुट उंचीच्या दगड़ावर चार-पाच चौकटी असतात.एकदम खालच्या चौकटित आडवा पडलेला वीर असतो.त्याच्या वरच्या चौकटित युद्धाचा प्रसंग असतो.त्याच्या वरच्या चौकटित अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन जात आहेत अस दाखवलेले असते,त्याच्या वरच्या चौकटित तो वीर आपल्या पत्नी सोबत शिवलिंगा ची पूजा करताना दाखवले जाते.आणि सगळ्यात वरती मध्यभागी शिवलिंग असते,व शेजारी सूर्य आणि चंद्र दाखवलेले आढळतात याचा अर्थ जो पर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तो पर्यंत त्या वीराचे स्मरण लोकांना रहावे.(what is veergal ) आणि वीराला स्वर्गात नेताना दाखवतात कारण युद्धात वीरगति प्राप्त झाली म्हणजे स्वर्गप्राप्ती होते असे मानले जाई.आणि जास्त शिव पूजाच दाखवली जाते कारण बहूतेक वीरांची उपास्यदेवता शिव असते म्हणून शिवपूजा दाखवली जाते.

वीरगळ वर शिलालेख आढळत नाही त्यामुळे त्यांना इतिहासाच्या मूक साक्षीदार मानल्या जातात.

महाराष्ट्र हे राष्ट्र प्रामुख्याने वीरयोध्याच राष्ट्र आहे.(तुलना करुण कोणाचा मन दुखावन्याचा माझा हेतु नाहीये) मात्र इतरत्र तुलना करता महाराष्ट्रातील विरानी स्वाभिमानासाठी आणि आया बहिनीच्या आब्रूसाठी वेळो वेळी आपल्या प्राणांची आहूति दिली आहे.याला इतिहास साक्षी आहे.त्याच महाराष्ट्र भूमितिल वीरगळ आज शेंदूर लावून पूजल्या जातात याची खूप खंत वाटते.
अशीच एक वीरगळ आमच्या जवळच्या परिसरात म्हणजे राजगडच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मारका शेजारी आहे.पण त्या वीरगळचे दोन टुकडे झाले आहेत आणि त्याला लोकांनी शेंदुर लाउन त्याचा देव केला आहे.ज्या वीरांनी रणांगंणात लढून प्राणांची आहूति दिली त्यांच्या वीरगळची अशी अवस्था पाहून मनाला खूप वाईट वाटत.अशी अवस्था महाराष्ट्रात खूप वीरगळांची आहे.

लेखन: विजय गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here