महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,60,695

उभा गणपती, पुणे | Ubha Ganpati, Pune

Views: 1873
1 Min Read

उभा गणपती, पुणे –

मेहूणपुऱ्यातून लक्ष्मी रोडकडे जाताना लोखंडे तालमीजवळ ६३३ नारायण पेठ येथे शिव फॅशन आणि भारत हॅन्डलूम या दुकानांच्या मध्ये असलेल्या छोट्याशा बोळातून आत गेल्यावर एका इमारतीच्या तळघरात एक  वैशिष्ट्यपूर्ण बाप्पा विराजमान झाले आहेत.

सुमारे चार फूट उंची असलेली, उजव्या सोंडेची, चार हातांची काळ्या पाषाणात घडविलेली पण शेंदूर चर्चित, दोन्ही हात गुडघ्यांपर्यंत पोहोचलेली अशी ही अजानुबाहु गणेशाची दुर्मीळ उभी मूर्ती आहे. या गणपतीच्या पुढील उजव्या हातात जपमाळ, तर डाव्या हातात लाडू धरलेला आहे. मागील दोन्ही हातात शस्त्रे आहेत. सुपासारखे कान आणि मूर्तीच्या अंगावरच घडविलेला मुकुट आहे. गणपती मूर्तीच्या उजव्या पायाशी लहानसा शेंदूर चर्चित मारुती राया आहे. सदर मंदिर हे सणस कुटुंबियांच्या खाजगी मालकीचे असून, मंदिरात त्यांच्या पूर्वजांची समाधी देखील आहे.

संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर

पत्ता :
https://goo.gl/maps/b6P7kJkS1Mgc95h58

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment