तुंगारेश्वर शिव मंदिर

तुंगारेश्वर शिव मंदिर

तुंगारेश्वर शिव मंदिर –

हे मंदिर वसई, पालघर जिल्हा, महाराष्ट्र, भारत येथे आहे. मंदिर “तुंगारेश्वर प्रवेशद्वार” पासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक पौराणिक मंदिर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला राम कुंड देखील आहे. तुंगारेश्वर मंदिराबरोबरच “खोडियायार माताजी” देवीचे एक छोटेसे मंदिर आहे.

तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत २१३७ फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने म्हणून प्रसिध्द असून भाविकांना या ठिकाणी गेल्यावर आत्मिक समाधान लाभत असल्याने येथे गर्दी असते.तुंगारेश्वरच्या डोंगरावर वसई पूर्व सातीवली गावाच्या परिसरात हे मंदिर आहे. हिरवाईने नटलेला परिसर, डोंगररांगा आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांची पाशर््वभूमी लाभल्याने प्रत्यक्षात शंकराच्या दर्शनालाच जात असल्याची भावना भक्तांमध्ये होते. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठीही भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणाला अवश्य भेट देत असतात.

इतिहास –

तुंग’ नावाच्या राक्षसाचा भगवान शंकरांनी वध केल्याने या देवस्थानला ‘तुंगारेश्‍वर महादेव’ असे नाव पडले, असे सांगितले जाते. या देवस्थानचा उल्लेख पुराण कथांमध्येही आढळून येतो. ‘तुंगार’ या शब्दाचा अर्थच शिवोपासकांचा एक वर्ग असा आहे. तुंगारेश्‍वर मंदिरापासून ३-४ मैलांवर मत्यच्च पर्वत शिखरावर भगवान परशुरामांच्या वास्तव्याने पावन झालेले ‘परशुराम कुंड’ हे तीर्थक्षेत्र आहे. तिथेच प्रसिद्ध संतश्री बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम आहे. त्यामुळे ‘तुंगारेश्‍वर’ हे हिंदू धर्मीयांसाठी विशेष स्थान आहे. तुंगारेश्‍वर मंदिरापासून ३-४ मैलांवर मत्यच्च पर्वत शिखरावर भगवान परशुरामांच्या वास्तव्याने पावन झालेले ‘परशुराम कुंड’ हे तीर्थक्षेत्र आहे. तिथेच प्रसिद्ध संतश्री बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम आहे. त्यामुळे ‘तुंगारेश्‍वर’ हे हिंदू धर्मीयांसाठी विशेष स्थान आहे.

एकदा अवश्य भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here