महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,39,972

खाफीखानाचा सर्जा

Views: 3
5 Min Read

खाफीखानाचा सर्जा –

*फार्सी*
बादहु खातर अज़ बंदोबस्त इतराफ किला-इ राजगद की मलजाए कदीम ऊ बूद जमे साख्ता ब-दीन फिक्र उफ्ताद की मकान व कोह कल्ब तराज राजगद बराए मानदन खूद

ब-हमरसानंद बाद तफ्तीश व तजस्सुस बिसयार कोह-ए राहिरी की दर रेफत ब-आसमान हमसरी मी नमूद व अज पाए दामन कोह ता सर किलाए आन की तिघाई आन ब-नाफ चर च जमरुदी फाम रसीदे बूद.

सी करोह इरतफा दाश्त व बीस्त व चहार करोह अज़ औंजा दर्याए शूर वाके शूदे व शोबाए दरिया अज़ पाए दामन कोह हफ्त करोह मी शूमरदंद व इतराफ आन तरफ राह बंदर सूरत की दह- दवाजदह करोह राह मंज़ील ब-राह खुश्की वाके शुदा व राजगद अज़ इन्जा चहार-पंज मंज़ील अस्त व कोहाई सर ब-फलक कशीदे दुश्वारगुजार बिसयार कल्ब दर राह दारद.

पंज माह मुतस्सील बारान. दर आन सरजमीन मी बारीद व तालुक ब-कोकन निज़ाम उल मुल्की दारद इख्तियार नमूदा. ब-तामीर व इमारत आन किला परदाख्त व दरवाजा बुर्ज व बारे दर कमाल कल्बी करार दादे तर्क मान्दन राजगद नमूदे किला-ए राहिरी रा मलजा व जाए मानदन खुद मुकर्रर साख्त .
अज बाद तैयार शुदन किला व नस्ब नमूदन तोपहा व मसदूद साख्तन राहतरदद इतराफ की हमान यक राह कल्ब गुजाश्त रोजी मजमाए साख्ता खरीते ज़र करा तलाई सद हून दर मैदान गुजाश्ते फर्मुद की मनादी नूमायंद की हर की सिवाए राहे की मुकर्रर नमूदे शूद ब-राहे दीगर बाला-ए किला बिला मदद-ए जिना व कमंद मा निशान रवद बदो आन जर व करा-ए तला बख्शीदे शवद.

यकी अज़ कौम-ए धेर आमदा. इल्तिमास नमूद की अगर हुक्म राजा बाशद मन बालाए कोह मा निशान रफ्ते निशान नस्ब नमूदे ब-यायम. बादे की आन धेर ब-निशान बालाए किला-ए आन कोह रफ्ता निशान नस्ब नमूदे ब-जल्दी फरुद आमदा. आदाब दुआ व सना ब-जा आवर्द. सिवा फर्मुद की आन खरीताए ज़र मा करा तला ब ऊ ब-दहन्द व पाए ऊ रा अज़ बंद कत नूमायंद व हुक्म नमूद अज़ राहे की आन धेर बाला रफ्ते बूद आन रा बंद साजंद.

*मराठी*
राजगड हे आपले जुने आश्रयस्थान व त्याच्या भोवतालचा प्रांत सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर, शिवाजीराजांनी आपल्या वास्तव्याकरिता आणखी एक दुर्ग, जो अभेद्य व अतिदुर्गम असा असेल, शोधण्याचे मनावर घेतले. काळजीपूर्वक शोध घेतल्यानंतर त्यांनी रायरीचा किल्ला निवडला. हा अतिशय उंच व मजबूत होता. तो (डोंगर/किल्ला) आकाशाशी स्पर्धा करीत होता; आणि पर्वताच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत, त्या शिखराचा टोक पाचूसारख्या हिरव्या रंगाला पोहोचलेला होता.

त्याचा चढ तीन कोसांचा होता. समुद्रापासून तो चोवीस कोस अंतरावर असून, पायथ्यापासून सुमारे सात कोसांवर समुद्राची एक खाडी होती. सूरतेकडे जाणारा रस्ता या ठिकाणाजवळून जात असे, आणि ते बंदर सुमारे दहा-बारा टप्प्यांच्या अंतरावर होते. राजगड येथून चार-पाच टप्प्यांवर होता. येथील डोंगर फार उंच व चढण्यास कठीण होते. वर्षात सुमारे पाच महिने येथे पावसाळा असे. हा किल्ला निजामुल्मुल्कच्या अधिपत्याखालील कोकण प्रांताच्या हद्दीत येत असे.

ठिकाण निवडून झाल्यानंतर राजांनी किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ केला. दरवाजे, बुरुज व तट पूर्ण व मजबूत झाल्यावर ते राजगडहून येथे आले आणि येथेच आपले कायमस्वरूपी निवासस्थान केले. तोफांचा जडाव पूर्ण करून व किल्ला सुरक्षित केल्यानंतर त्यांनी सर्व वाटा बंद केल्या, केवळ एक अधिकृत मार्ग उघडा ठेवला.

एके दिवशी त्यांनी सभा बोलावून, लोकांसमोर सोन्याने भरलेली पिशवी व शंभर होन किंमतीचे सोन्याचे कडे ठेवून जाहीर केले की, “जो या अधिकृत मार्गाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही वाटेने, शिडी किंवा दोरी न वापरता किल्ल्यावर चढून ध्वज रोवेल, त्याला हे पारितोषिक दिले जाईल.”
तेव्हा एक ढोर पुढे आला आणि राजांच्या परवानगीने तो टेकडीवर चढला, ध्वज रोवून तो लगेच खाली उतरला व राजांना मुजरा केला. शिवाजीराजांनी त्याला सोन्याने भरलेली पिशवी व कडे देण्याचा हुकूम केला आणि त्याच्या पायाचे सांधे तोडून टाकण्याचा हुकूम दिला. त्याचबरोबर त्याने ज्या वाटेने चढाई केली होती ती वाट कायमची बंद करण्याची आज्ञाही दिली.

~मुन्तखबुल्लुबाब, खाफीखान, फार्सी, पृ. २२२-२३

फार्सी वाचन व मराठी भाषांतर
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे

Leave a Comment