महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,645

श्री तारकेश्वर महादेव मंदिर, येरवडा

By Discover Maharashtra Views: 1321 2 Min Read

श्री तारकेश्वर महादेव मंदिर, येरवडा –

बंडगार्डन पुलापलीकडे असलेल्या येरवडा गावठाणामध्ये एका टेकडीवर एक पुरातन शिव मंदिर आहे. ते श्री तारकेश्वर महादेव मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. बंडगार्डन पुल ओलांडून पलीकडे येरवड्यामध्ये गेल्यावर समोर एक भव्य प्रवेशद्वार दिसते. तिथून पायऱ्या चढून गेल्यावर श्री तारकेश्वर महादेव मंदिरामध्ये जाता येते. बहुतेक वेळेस हा दरवाजा बंद असतो. या मंदिरात जाण्यासाठी अजून एक रस्ता आहे, चौकात असलेल्या भारत रत्न राजीव गांधी हॉस्पिटल शेजारून जाणाऱ्या रस्त्याने टेकडीवर जाता येते. या रस्त्याच्या शेवटी श्री तारकेश्वर महादेव मंदिर आहे.

समोर असलेल्या १०/१५ पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन्ही बाजूला हात जोडलेले शिवगण आणि तळाशी  किर्तीमुख असलेल्या नक्षीदार दगडी कमानीतून मंदिरात जाता येते. आत मध्ये छोटेसे अंगण आहे. समोर दगडी दीपमाळ आहे. उजव्या बाजूला सुंदर नक्षीकाम असलेले दगडी तुळशी वृंदावन आहे. त्याच्या शेजारी श्री दत्त गुरुंचे मंदिर आहे. २/४ पायऱ्या चढून त्या मंदिरात जाता येते. या मंदिराला छोटा सभामंडप आहे. गाभाऱ्यावर नक्षीदार कळस आहे  आणि गाभाऱ्यामध्ये उंचावर दत्ताची छोटी संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. या मंदिराच्या समोर मुख्य शिवमंदिर आहे. मंदिराला भव्य सभामंडप असून पूर्वी तो लाकडामध्ये बांधलेला होता. इ.स. १९९८ मध्ये त्याच्या जिर्णोधार करून तो नवीन बांधण्यात आला.या सभामंडपात दगडी नंदी विराजमान आहे.

मंदिराचा मुख्य भाग डोंगरातल्या लेण्यामध्ये कोरलेला आहे. ३ नक्षीदार कमानीतून लेण्यात जाता येते.आत मध्यभागी शंकराची पिंड आहे. तसेच बाजूला विविध दालनामध्ये विठ्ठल-रुक्मीणी, गणपती, कालभैरव, मारुती व श्री राम-सीता-लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत.आवारामध्ये दत्त मंदिराबरोबरच साईबाबा आणि राधा कृष्ण यांची सुद्धा छोटी मंदिर आहेत. तसेच आवारामध्ये इतरही अनेक दागि मुर्त्या ठेवलेल्या आहेत. मागील ७ पिढ्यांपासून मंदिराच्या पूजेचा मान येरवडेकर कुटुंबाकडे आहे.

पत्ता : https://goo.gl/maps/8SuqLTKPwGkmBRAJ9

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment