पुस्तक परिचयलेखन

स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !

स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !

पुस्तकाचे नाव : स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !
लेखक : अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या : १५२
किंमत : १५० रुपये (₹)
माझे पुस्तकाचे रेटिंग : (५ पैकी)

नुकतेच स्टीव जॉब्स यांची चरित्रात्मक ओळख करून देणारे सदर पुस्तक वाचले. सदर पुस्तक अवघ्या ८ दिवसात पूर्ण केल्याचा लेखकांनी स्वतःच्या क्षमते बद्दल आणि रात्रीचा दिवस काम करून झपाटून काम केल्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख मनोगत मध्ये केला आहे. ते वाचून वाचकाच्या मनात पुस्तकाबद्दल एक अपेक्षांची छान प्रतिमा निर्माण होते.
८ दिवसांत झपाट्याने काम करून पुस्तक पूर्ण केल्याबद्दल लेखक द्वयींचे परिश्रम घेतल्याबद्दल अभिनंदन.
आता वळूयात पुस्तकाच्या दर्जाकडे माझ्यामते हे स्टीव्ह जॉब्स आणि ऍपल कंपनीची ओळख करून देणारे हे चांगले पुस्तक आहे. पण घाईघाईने पुस्तक बाजारात आणण्याच्या नादात हे पुस्तक पुरते फसले आहे. कसे ते थोडक्यात बघुयात.

१. संपूर्ण पुस्तक ज्याच्यावर आहे तो स्टीव्ह जॉब्स वयाच्या कितव्या वर्षी मेला हे पुस्तकात कुठेही दिसले नाही. विशेष म्हणजे स्टीव्ह जॉब्स च्या खऱ्या वडिलांच्या ८० व्या वर्षी मेला हे त्यात आले आहे.

२. पुस्तकात एके ठिकाणी प्रूफ रीडिंग करताना स्टीव्ह जॉब्स आणि ऍपल हे योग्य शब्द असल्यामुळे ऍपल ने म्हटले असे छापले गेले आहे. ते स्टीव्ह जॉब्स ने म्हटले असे हवे होते.
३. बोर्डरूम पुस्तकातून काही प्रमाणात उचलेगिरी केल्याचे लेखकांनी स्वतःच सांगितले आहे. पण हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाला जे कळते ते हे की ऍपल कंपनी सोडावी लागली आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी स्टीव्ह जॉब्स ने कसा संघर्ष केला , त्याचे मार्केटिंग आणि विक्री कौशल्य कसे अचंभित करणारे होते. वगैरे सर्व कॉर्पोरेट क्षेत्राची ओळख करून दिल्या सारखे दिसते. एकूण बोर्डरूम पुस्तकाचा प्रभाव पूर्ण पुस्तकावर दिसतो आणि स्टीव्ह जॉब्स या व्यक्तीचे कर्तृत्व दुय्यम दिसते.

४. कॅलिग्राफी हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता पण तो तितक्या परिणामकारक रित्या लेखकांना मांडता आला नाही. उदाहरण द्यायचे झाले तर ऍपल च्या प्रॉडक्ट्स साठी जी पांढरी शेड एक खास ऍपल ची म्हणून ओळख आहे त्या शेड साठी स्टीव्ह जॉब्स ने ऍपल मधील तज्ज्ञांना खूप फैलावर घेतले होते. जॉब्स ला जी शेड हवी होती ती मिळाल्यावरच त्याने प्रोडक्शन साठी परवानगी दिली होती. हीच गोष्ट त्याने सर्व ठिकाणी केली आहे.
यावरून स्पष्ट होते की स्टीव्ह जॉब्स हा फक्त उत्पादन छान दिसणे यावर फोकस करून विकणारा नव्हता तर बुद्धिमत्तेच्या कसोटीवर ऍपल ची उत्पादने सर्वश्रेष्ठ आणि काळाच्या पुढील ठरतील यासाठी त्याचे प्रयत्न होते.

५. एकूणच पुस्तकातून स्टीव्ह जॉब्स ची प्रतिमा उत्कृष्ट विक्रेता म्हणून निर्माण झालेली आहे जी चुकीची आहे. कदाचित जॉब्स चे महिमा गान करताना लेखकांच्या नकळत असे झालेले असू शकेल. पण जॉब्स हा उत्कृष्ट विक्रेता नव्हता तर उत्कृष्ट उत्पादने निर्माण करणारा होता. आणि की उत्पादने जशी बनवलेली आहेत तशीच ती लोकांसमोर सोप्या पद्धतीने तो मांडायचा. मुळात मालात दम असेल तर ग्राहक विकत घेतोच घेतो हा त्याचा मुख्य दृष्टिकोन होता.
आणि हा मूळ दृष्टिकोन मांडून स्टीव्ह जॉब्स ची एक बुध्दीमान आणि दर्जेदार उत्पादने निर्माण करणारा कुशल तंत्रज्ञ ही प्रतिमा निर्माण करण्यात हे पुस्तक काहीसे भरकटल्या सारखे वाटते.

एकूण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. पण ऍपल या कंपनीच्या इतिहासाची आणि कॉर्पोरेट युद्धाची सावली पुस्तकावर पडल्यामुळे स्टीव्ह जॉब्स चे कर्तृत्व जरासे झाकोळले गेल्यासारखे झाले आहे एवढेच. सुदैवाने स्टीव्ह जॉब्स चे अधिकृत चरित्र देखील मराठीत उपलब्ध झालेले आहे. ते वाचकांनी अवश्य वाचावे. म्हणजे मी काय म्हणतो आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येईल.
धन्यवाद,

सागर
माहिती साभार – पुस्तकांचा परिचय

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close