महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,73,990

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, कोडीत

By Discover Maharashtra Views: 4051 2 Min Read

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, कोडीत

निसर्गरम्य असा पुरंदर किल्ला आणि त्याची डोंगर रांग, वाऱ्यावर डोलणारी पिके, हिरवीगार वृक्षराजी यामुळे हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.

श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या भक्तीला पावून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीरहून कोडीतला आलेले आहेत. आज ज्या ठीकाणी मंदिर आहे. तेथील श्री जोगेश्वरीची ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या मुर्ती आहेत. येथे दर अमावस्येला श्रीनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. भक्तांना अन्नदान, भंडारा असतो.

मंदिराच्या २ एकर १ गुंठे क्षेत्रफळापैकी ५०,००० चौरस फुटात मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे दगडात बांधकाम केलेले आहे. शिखराची उंची ७१ फूट आहे. मुख्य मंदिरासमोर ४१ x ८१ फुटाचा सभामंडप असून सभामंडपासमोर १४ x १४ वाहन मंडप (नवसाई मंदिर) आहे. मंदिराचे प्रवेशद्वार – दिंडी दरवाजांची उंची ५१ फूट असून प्रवेशद्वारा खाली ३०,००,००० (तीस लाख) लीटर पाण्याची टाकी आहे.

प्रवेशद्वाराला दांडेली सागवानाचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. लाकडी दरवाजावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले आहे. मंदिराच्या सभोवताली २७० x २१ फूट आणि १७१ x २१ फूट अशा ओवार्याग बांधलेल्या आहेत. ओवारीसह संपुर्ण मंदिरावर अतिशय सुंदर – सुबक नक्षीकाम करून मूर्ती बसविण्यात आलेल्या आहे. मंदिराचे काम करताना भारतातल्या बर्याुच मंदिर शैलींचा वापर केला आहे. उदा. सोमपुरा शैली, दाक्षिणात्य शैली, द्रवीडी शैली, हेमाडपंथी शैली, महाराष्ट्रीयन शैली इत्यादी.

मंदिराचे संपूर्ण काम समस्त श्रीनाथ भक्तांच्या सहभागातून – ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारले आहे. श्रीनाथांवर अपार श्रद्धा असलेला समस्त श्रीनाथ भक्त, जर एकवटला तर तो काय करू शकतो हे पहायचे असेल तर आपणाला कोडितला यायलाच पाहिजे. कारण कोडित येथे साकारलेलं श्रीनाथांच भव्य-दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे. मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचा कार्यक्रम १ मे २००९ रोजी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.

माहिती स्त्रोत : http://saswad.in

कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराला जाण्याचे दोन मार्ग आहेत पुणे – सासवड – कोडीत असा मार्ग आहे तसेच आपण पुणे – कापूरहोळ – केतकावळे – नारायणपूर – कोडीत या मार्गाने ही जाऊ शकता.

 

माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

Leave a comment