महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,250

शिवराई भाग २५

By Discover Maharashtra Views: 3546 1 Min Read

शिवराई भाग २५…

मित्रांनो,
आपण शिवराई वरील विविध प्रकारचे असलेले ‘फुल’ चिन्ह मागील ५ दिवसापासून पाहत आहोत. काल ‘छ’ अक्षराआधी असलेले एक प्रकारचे फुल आपण पहिले आज त्यातला दुसरा प्रकार आपण पाहुयात.काल पाहिलेले फुल हे काहीसे कमळासारखे दिसत होते आज सादर फुल हे बिंदुंचे बनलेले आहे. ‘छ’ आधी पाच जोडलेल्या बिंदुंचे फुल नाण्यावर अंकीत आहे. बऱ्याच सुटसुटीत जागेत हे चिन्ह अंकीत आहे. पुढील बाजुवरही राजा आधी २ बारीक बिंदु तर श्री आधी ३ बिंदु दिसतात. बाकी नाण्यावरील मजकुर हा सामान्य दुदांडी नाण्याप्रमाणेच असुन नाण्याचे वजन ९.७ ग्राम आहे.

पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a comment