इतिहासशिवराई

शिवराई भाग २४

शिवराई भाग २४

मित्रांनो,
काल ‘राजा’ शब्दाच्या नंतर पाहिलेल्या नाण्यावर असलेल्या फुलाचे आणखीही प्रकार नजरेस आलेले आहेत, ते माझ्या संग्रही ही आहेत पण ते आता न पहाता आपण नंतर पाहुयात. आज पाहुयात ‘छेत्र’ शब्दाच्या मागे असलेले फुल. नाण्याच्या पुढील बाजुवर श्री आधी गोलाकार चिन्हही आपल्याला पहायला मिळते. तर मागील बाजुवर ‘छत्र’ ऐवजी ‘छेत्र’ असुन त्याच्या आधी फुल पहायला मिळते तर त्या शब्दावरही कुठलेतरी चिन्ह असल्याचे जाणवते पण ते स्पष्ट नाही. या नाण्यावरील ‘छे’ या अक्षराचे वळनही काहीसे वेगळे असल्याचे आपल्याला पहायला मिळते. बाकी मजकुर सामान्य दुदांडी नाण्याप्रमाणेच आहे. नाण्याचा धातु तांबे असुन काळाच्या ओघात धातुबरोबर झालेल्या chemical reaction मुळे धातुवर हिरव्या रंगाची एक परत चढलेली आपल्याला पहायला मिळते. नाण्याचे वजन ९.५ ग्राम आहे.

पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close