महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,63,059

शिवराई भाग २१

Views: 3806
1 Min Read

शिवराई भाग २१…

शिवराई वर विविध शेकडो चिन्ह आणि विविध प्रकारचे बिंदू येतात आणि आपल्याकडे आता #स्वराज्याचे_चलन च्या #30ShivraiOn30Days या सिरीज मध्ये दिवस बाकियेत फक्त १० ! आणि विविध चिन्ह पाहायचे म्हटल्यास ते शक्य वाटत नाही त्यामुळे आपण १ च चिन्ह घेऊन त्याचे विविध १० प्रकार या १० दिवसात पाहुयात. तर यासाठी आपण चिन्ह निवडलंय ‘फुल’, आता पुढचे १० दिवस शिवराई वरील विविध १० प्रकारचे आणि नाण्यावर विविध ठिकाणी अंकित ‘फुल’ हे चिन्ह पाहुयात.
आजच्या नाण्यावर ‘फुल’ चिन्ह अंकित आहे नाण्यावर ‘श्री’ या अक्षराच्या ‘आधी’. हे काहीसे वेगळे नाणे मला पाहायला मिळाले. या नाण्यावर श्री आधी फुल हे चिन्ह सरळ नसून उलटे अंकित आहे आणि त्यावर बाजूनी बिंदुमय वर्तुळ असल्यासारखे देखील वाटत आहे. बाकी मजकूर दुदण्डी शिवराई नाण्याप्रमाणे ‘श्री/ राजा’ आणि ‘छत्र/पति’ असाच आहे. नाण्याचा धातू तांबे असून वजन ९.५ ग्राम आहे. मागील बाजूवर ‘छ’ आणि ‘त्र’ या दोन अक्षरांमध्ये बिंदू हि पाहायला मिळतो.
पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a Comment