शिवराई भाग १९

शिवराई भाग १९

शिवराई भाग १९…

१२३९ च्या नंतरची मिळणारी शिवराई आहे १२४० अंकित शिवराई. या शिवराई वर श्री नंतर १२४० अंकित केलेले असते. पण सादर नाण्यावर १२४० आधी श्री न दिसता वर्तुळ दिसत आहे बहुदा त्या वर्तुळाआधी श्री असावा. आणि बाकी मजकूर सारखाच म्हणजे ‘० १२४०/ राजा’ आणि ‘छत्र/ पति’ असा आहे. पुढील बाजूवर फक्त १२४० दिसत असून बाकी मजकूर नाण्याबाहेर गेलेला आहे. नाण्याचे वजन १० ग्राम असून धातू तांबे आहे. १२३० पासुन १२४० पर्यंत सन अंकीत नाणी आपल्याला मिळतात पण त्यातील १२३५, १२३६, १२३७, १२३८ अजुन मिळालेली नाहीत, मी पाहिलेली नाहीत. तर १२४० हि शेवटची सन असलेली शिवराई. १२४१ आणि त्यापुढील सन अंकीत नाणी मी पाहिलेली नाहीत.

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here