महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,64,675

शिवराई भाग १७

Views: 3796
1 Min Read

शिवराई भाग १७…

श्री १२३४ लिहीलेली शिवराई तशी काही प्रमाणात कमीच मिळते. नाण्यावरील श्री बऱ्याचदा नाण्याबाहेर जातो तर काही वेळी ४ अंक काहीसा बाहेर गेलेला दिसतो फक्त ४ ची गाठ बऱ्याचदा दिसते त्यामुळे तो ० असल्याचाही भास होतो. या नाण्यातही २ प्रकार येतात १२३४ आधी श्री आणि १२३४ नंतर श्री. आज सादर आहे श्री १२३४. अगदी स्पष्ट असे १२३४ नाण्यावर अंकीत आहे. राजा च्या जा नंतर फुल ही कधी कधी नाण्यावर दिसते. तर मागील बाजुवर छत्र ऐवजी छेत्र असुन त्र नंतर ही काही चिन्ह दिसते. सर्वसाधारण शिवराई प्रमाणेच या नाण्याचा आकार आणि वजन आहे आणि बाकी मजकुरही तसाच आहे.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a Comment