शिवराई भाग १२

Discover Maharashtra

शिवराई भाग १२

दुदांडी शिवराई साधारणतः ‘श्री/ राजा’ आणि ‘छत्र/ पति’ अशी अक्षरे येतात हे आपण पाहिले. पण या दुदांडी शिवराईंवर त्याव्यतिरीक्तही इतर वर्षासन तसेच कित्तेक विविध चिन्हही येतात. आजपासुन पुढील १० दिवस १० विविध वर्षासन असलेली दुदांडी शिवराई नाणी आपल्यासमोर सादर करत आहे.
या शिवराईंवर १२३०, १३३१,१२३२, १२३३, १२३४, १२३९, १२४० अशी विविध फसलीतील वर्षासने येतात. या नाण्यांवरील वर्षासनांहुन हि नाणी कुणाची ? या प्रश्नांची उत्तरे आपण १० दिवसांच्या नंतर पाहु, त्याआधी हि सर्व नाणी आपण पाहुयात. आज सादर आहे फसली सन १२३० अंकीत असलेली शिवराई. १२३० या सनाच्या ० चे २ प्रकार आपल्याला शिवराईवर दिसतात, पहिला म्हणजे ३ नंतर फक्त बिंदु आणि दुसरा ३ नंतर एक गोल. या नाण्यांवर हे फसली सन पुढील बाजुवरील पहिल्या ओळीतल्या ‘श्री’ या अक्षराच्या पुर्वी कींवा नंतर येते तेही प्रकार आपण पाहु, या नाण्यावर बहुदा ते श्री च्या नंतर आले आहे. या फसली सनाच्या खाली दोन दांड्या आणि त्याखाली राजा तर मागील बाजुनी छत्र पति असा मजकुर आहे. ९.५ ते १०.०० ग्राम पर्यंत या नाण्यांचे वजन असते.
फसली सन १२३० असलेल्या या नाण्याचे इसवी सनात रुपांतर काय होइल ? तुम्ही करा आणि मला कळवा….


Website आणि Discover Maharashtra App चा मुख्य हेतू मराठी भाषेत महाराष्ट्राविषयी अज्ञात आणि ज्ञात माहिती व इतिहास प्रदान करणे हा आहे. सर्व सामग्री आणि प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती किंवा प्रतिमा आणि आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, कृपया [email protected] या इमेल वर आम्हाला संपर्क साधा आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here