शरभशिल्पं | Sharabhashilpa

शरभशिल्पं | Sharabhashilpa

शरभशिल्पं | Sharabhashilpa –

प्राचीन मंदिरं,किल्ले यांच्या प्रवेशद्वारावर किंवा इतर ठिकाणी बहुतांशी करून दिसणारे शिल्प म्हणजे शरभशिल्पं. काही पुराणकथांनुसार शरभाला शिवशंकराचा अवतार मानलेलं आहे. मनुष्य,प्राणी आणि पक्षी यांच्या एकत्रित संगमातून घडवण्यात आलेलं काल्पनिक शिल्प म्हणजे शरभ.समारांगण सूत्रधार,अपराजितपृच्छा,आकाशभैरवकल्पम अशा प्राचीन ग्रंथांमध्ये शरभशिल्पं(Sharabhashilpa) किल्ल्याच्या किंवा मंदिराच्या कुठल्या भागात असावीत याचं वर्णन केलेलं आहे.

एखाद्या राजघराण्यातील व्यक्तीची किंवा मोठ्या सरदाराची समाधी असेल तर त्यावर इतर राजचिन्हांसोबत शरभदेखील पहायला मिळतो.समाधीवरील किंवा किल्ल्यांवरील शरभ हा त्या राजघराण्याच्या शौऱ्याचं प्रतिक मानला जातो.शरभशिल्पामध्ये शरभाने आपल्या चार पायांनी चार हत्तींना दाबून ठेवलं आहे असं दाखवलेलं असतं.या शिल्पामध्येदेखील पायांनी दाबलेले चार हत्ती,शेपटीत पकडलेला एक आणि आपल्या तोंडाने पकडलेला एक अशा सहा हत्तींचं अंकन आहे. काही मंदिरांवर फक्त शरभ असतो त्यामध्ये इतर कुठलाही प्राणी नसतो त्याला एकल शरभ असं म्हणतात.

हे सुरेख कोरीव शिल्पं साताऱ्याजवळ संगम माहुली येथील समाधीवर आहे.ही समाधी साताऱ्याचे छत्रपती शहाजी महाराज अर्थात आप्पासाहेब महाराज ( १८०२ – १८४८ ) यांची आहे.

© आदित्य माधव चौंडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here