सहस्त्रबुद्धे दत्तमंदिर, पुणे

सहस्त्रबुद्धे दत्तमंदिर, पुणे

सहस्त्रबुद्धे दत्तमंदिर

#उपाशी_विठोबा मंदिरावरून चिमण्या गणपती चौकाकडे जाताना गोडबोले हॉस्पिटलसमोर उजव्या हाताला एक सुंदर लाकडी प्रवेशद्वार दिसते. तेच #सहस्त्रबुद्धे_दत्तमंदिर.

कै. डॉ. स. शि. सहस्त्रबुद्धे यांनी इ. स. १८९७ मध्ये हे दत्तमंदिर बांधले. वाड्यातून आत गेल्यावर दगडी चबुतऱ्यावरील दोन लाकडी खांबांमधून श्री दत्ताची मूर्ती अंगणातून दिसते. या मंदिरातला देव्हारा हा पितळ्याचा आहे. दत्त मूर्तीच्या उजव्या हातात डोक्याच्यावर जाणार त्रिशूल आहे. या मूर्तीचे वेगळेपण म्हणजे या दत्त मूर्तीला मिशा आहेत. देवळापुढे अंगणात एक छोटासा हौद आहे.  लहान मुलांनी पडू नये म्हणून त्यावर लोखंडी जाळी लावलेली आहे. सहस्त्रबुद्धे यांचे वंशज या मंदिराची व्यवस्था पाहतात. मंदिराचा परिसर भर वस्तीत असून सुद्धा शांत आणि रमणीय आहे. हे मंदिर खाजगी आहे.

संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित

पत्ता :
https://goo.gl/maps/AZkqoddoNpa6iUqf8

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here