पौन मावळ | पवन मावळ

पौन मावळ | पवन मावळ

पौन मावळ | पवन मावळ –

हिंदवी स्वराज्यातील बारा मावळ पैकी एक असलेले आणि पवना नदीचे खोरे म्हणजे पौन मावळ किंवा पवन मावळ. ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आणि भौगोलिकदृष्ट्या उपयुक्त असे हे खोरे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घनदाट अरण्य आणि बख्खळ जैवविविधता असलेला हा प्रदेश. पूर्वी कोकणात असलेल्या व्यापारी बंदरावरून घाटमाथ्यावर येण्यासाठी वेगवेगळ्या घाटवाटा होत्या. बोरघाट, सवाष्णीचा घाट, कुरवंडे घाट ह्या त्यापैकीच काही. या वाटांच्या संरक्षणासाठी व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी इथल्या गडकोटांचा उपयोग झाला.

या फोटोमध्ये लोहगडाच्या दक्षिणेला डावीकडे दिसणारा वितंडगड (तिकोना), त्यामागे दिसणारी नाणेगाव-डोंगरगाव-वळणे-नांदिवली-शिरवली-शेडाणी-चांदीवली-अजीवली या गावांच्यामध्ये असणारी डोंगररांग. या डोंगररांगेच्या पलीकडे मुळानदीवर बांधलेले मुळशी धरण व त्यामागे कैलासगड आहे.  तिकोनाच्या उजव्या बाजूला दिसतोय तो पवना जलाशय. त्यासमोर भिंतीसारख्या दिसणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी अजीवली देवराई आहे.

जलाशयाच्या उजव्याबाजूला सुळक्यासारखा दिसणारा कठीणगड (तुंग). त्यामागे पोमगाव-शिळींब-कोळवली-विसाखार-देवघर-घुसळखांब-मोरवे या गावांच्यामध्ये असणारी डोंगररांग. त्यामागे अंबे व्हॅली व पुसटसा दिसणारा सपाटमाथ्याचा कोरीगड. त्याबाजूला सुळक्यासारखा दिसणारा मोरगिरी गड आणि सर्वात उजव्याबाजूला दिसणारा लोणावळ्यातील कुरवंडे गावाच्या वरचा भाग (टायगर फॉल्स, लायन्स पॉईंट 2). इथूनच पलीकडे दिसणाऱ्या टायगर व्हॅलीमध्ये मृगगड आहे व एका बाजूला कुरवंडे घाट. हा घाट लोणावळ्यापासून सुरू होतो व समरभूमी उंबरखिंडीतून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो.

(Best view in Landscape mode)

Instagram – @shaileshg1806

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here