महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

ब्रम्हपूरी प्रतिष्ठानपूरी पैठण

By Discover Maharashtra Views: 1681 3 Min Read

ब्रम्हपूरी प्रतिष्ठानपूरी पैठण –

दक्षिण गंगा गोदावरी नदी किनारी वसलेली प्राचीन नगरी पैठण महाराष्ट्राचे त्याचबरोबर दक्षिण भारताचे मुख्य स्थान मराठ्यांचे उगम स्थान दक्षिण काशी पैठण.

वैदिक पौराणिक महत्त्व:- पैठणचे वैदिक पौराणिक महत्त्व म्हटले तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग म्हणजेच पुराण काळामध्ये पैठणला ब्रह्मपुरी म्हणायचे ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा ब्रह्मदेवाने गोदावरी नदी किनारी पैठणनाग घाट या परिसरात महादेवाची तपश्चर्या केली त्यामुळे या नगरीला ब्रह्मपुरी असे नाव मिळाले. त्याचबरोबर इंद्रदेवाने देखील याच परिसरात महादेवाची तपश्चर्या केली त्यामुळेच स्वतः इंद्रदेवाने स्थापित केलेले इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आज देखील पैठण येथील नाग घाट परिसरात आहे.

ऐतिहासिक महत्त्व:- पैठणचे ऐतिहासिक महत्त्व म्हटले तर २६०० वर्षांच्या अगोदर जेव्हा या  हिंदुस्थानात महाजनपद पद्धती होती तेव्हा महाराष्ट्र हा अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजेच इश्वाकु वंशिय राजे राज्य करायचे आणि त्या अश्मक महाजनपदाची राजधानी देखील पैठण होती जिला प्रतिष्ठानपूरी म्हणायचे. त्यानंतर महाराष्ट्रात उदयाला आलेल पहिल क्षत्रिय मराठा घरानं म्हणजे सातवाहन या सातवाहन साम्राज्याची मुख्य राजधानी देखील प्रतिष्ठानपुरी म्हणजे पैठण ही होती उपराजधानी जुन्नर होती.

अध्यात्मिक महत्व:- पैठणचे अध्यात्मिक महत्व म्हटले तर संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज भगवान श्री विठ्ठल स्वतः ज्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात पाणी भरायला आले त्या श्री एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे पैठण गोदावरी नदी किनारी श्री एकनाथ महाराजांचा वाडा होता त्याच वाड्याचे आज मंदिरात रूपांतर झाले.

ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ठिकाण म्हणजे पैठण; पैठणमधील नागघाट या ठिकाणी आज देखील ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे ज्याठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ठिकाण म्हणजे नागघाट. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनीदेखील पैठणच्या भूमीत वास केला आणि त्यांच्या पंथीय कार्याला सुरुवात देखील पैठण या ठिकाणावरून झाली. जैन पंथीयांचे देखील एक प्रमुख देवस्थान पैठणयेथे आहे जिथे महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून लोक दर्शनासाठी येतात.

उत्तरेतले धर्मपीठ म्हणजे काशी तसेच दक्षिण भारताचे धर्मपीठ म्हणजे पैठण पैठणला दक्षिण काशी म्हणून ओळखले जायचे. संस्कृत आणि हिंदू धर्म शास्त्रांचा अभ्यास करणारे ब्राह्मण धर्मपंडित संत पैठणमध्ये होते पैठणच्या पंडितांचा निर्णय अखेरचा मानला जायचा. नवनाथांनी देखील पैठणमध्ये तपश्चर्या केली होती गोदावरी नदी किनारी नवनाथांच्या नऊ गुंफा आज देखील आहे.

पाहण्याची ठिकाणे:-

१) सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा पराभव करून जो विजयस्तंभ बांधला तो आज २००० वर्षानंतर देखील गोदावरी नदी किनारी उभा आहे आज त्याला तीर्थ खांब म्हणून ओळखले जाते.

२) संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर व त्यांचा वाडा गोदावरी नदी किनारी आहे.

३) सातवाहन राजांच्या महालाचे अवशेष कोरीव खांब व सातवाहन कालीन विहीर आहे. व अनेक प्राचीन वाडे देखील पैठणमध्ये आहे.

४) जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर देखील पैठण जवळ आहे.

५) संत ज्ञानेश्वर उद्यान जांभूळ बाग प्राचीन नागघाट आणि नाग घाटाच्या परिसरातील हनुमंताचे श्री दत्ताचे आणि इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर देखील पाहण्यासारखे आहे.

साडी प्रकारातील पैठणी हे नाव देखील पैठण या ठिकाणावरून त्या साडीला मिळाले आहे.

असे हे महाराष्ट्राचे मराठ्यांचे उगम स्थान महाराष्ट्राची पहिली राजधानी महाराष्ट्राची शान पैठण सर्वांनी नक्कीच पैठणला भेट द्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपा.

मराठा युग
आशिष इंगळे पाटील

Leave a comment