शिवाजी महाराजांचे आरमार भाग ९

शिवाजी महाराजांचे आरमार | shivaji maharaj father of indian navy marathi

!! शिवाजी महाराजांचे आरमार !!

भाग:-९
(क्रमश्यः)

तिरकटी म्हणजे तीन लोडकाठ्यांचे जहाज. तरांडे, तारु, शिबाडे व मचवा ही जहाजे लहान असत. अगदि छोटी होडी म्हणजे पगार. “कल्याण भिवंडी खाडी, पनवेल, कुलाबा, विजयदुर्ग, मालवण येथे जहाजे बांधली जात.” जहाज बांधनी करिता लागणारा साग म्हणजे सागवाणी लाकूड कोकणात व विषेशतः वसईच्या आसपास चांगल्या प्रकारचा मिळत असे. शिवाजी महाराजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. व्यापाराचे महत्व ओळखून शिवाजी महाराजांनी {वासंतिक नौदल} तयार ठेवले होते.

“मस्कत व मोचा या अरबांच्या बंदराशी व्यापार करण्यासाठी त्यांनी तीन डोलकाठ्यांची जहाजे बांधली होती.” आरमाराचे संरक्षण किनारपट्टीवरील किल्ले व खाड्या यांच्या आश्रयाने होत असे. शांततेच्या काळात तुफानापासुन बचावाकरीता खाड्या उपयोगी असतात. युद्धकाळात किल्ले व खाड्या यांना मोक्याचे ठिकाण म्हणून महत्व असते. हे ओळखून शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील किल्ले दुरुस्त केले व नवे किल्ले बांधले. सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांचा उत्तम नमुना आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पारदी व इतर यांचा भरणा असे.

शिवाजी महाराजांच्या आरमाराचे वाटत असलेले महत्त्व आज्ञापत्रात स्पष्ट पणे उमटलेले आहे. “आरमार म्हणजे एक स्वतंत्र राजांगच आहे, त्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वत त्याचे आरमार त्याचा समुद्र. या करती आरमार अवस्यमेव करावे.” तसेच पुढिल भागात शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र पाहणार आहोत.

संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला

{क्रमश्यः}

माहीती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य गडकोट समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here