महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,259

शिवाजी महाराजांचे आरमार भाग ७

By Discover Maharashtra Views: 3690 3 Min Read

!! शिवाजी महाराजांचे आरमार !!

भाग ७
(क्रमश्यः)

१० संप्टेंबर १६७९ या तारखे आठ गुराबा खांदेरीच्या कुमकेस येत असल्याची आवई उठली. १४,१५ व १६ वादळी पावसाचा फायदा घेऊन मराठ्यांनी इंग्रजांच्या जहाजांना गुंगारा देऊन खांदेरी ला कुमक पोहोचवली. व मराठ्यांनी गनिमी काव्याचा डाव चांगलाच वापरला. १९ सप्टेंबर ला आरमारी चकमक होऊन लेप्टनंट थाॅरपे, जाॅन ब्रॅडबरी व हेन्री वेल्चे हे इंग्रज अधिकारी मराठ्यांनी मारले, व कॅप्टन चे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. मराठ्यांचा उत्साह मात्र द्विगुणित झाले. इंग्रज मात्र फार सचिंत झाले. २० सप्टेंबर ला कॅप्टन मिनचिन याचा बेटाजवळ मानसे उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला, तो प्रयत्न फसला. आॅक्टंबरमध्ये कॅप्टन रिचर्ड केनविन याची नेमनुक होऊन जादा दोन गुराबा पाठवण्यात आल्या. इंग्रजांची एकंदरीत आठ लढाऊ जहाजे वेढ्यात अडकली होती व त्यावर २०० मानसे होती.

१८ ऑक्टोबर ला एक जोरदार लढाई झाली. तांबडे फुटताच मतलईचा फायदा घेऊन नागावच्या खाडीतुन शिवाजी महाराजांचे आरमार किणारपट्टीच्या आश्रयाने इंग्रजांच्या दिशेने वल्ही मारीत पुढे गेले. तळापर्यंत गेल्यावर मराठ्यांच्या जहाजांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला चढविला, तो इतक्या द्रुतगतीने, चलद कि इंग्रजांना त्यांच्या तोफा ही डागता आल्या नाहीत. त्यांची जहाजे मागे पडली. कॅप्टन केगविनचे गुराबा व दुसरे एक गुराब इतर आरमारा पासुन वेगळी पडली. या मुळे इंग्रजांनी ताकत दुभेगली व मराठ्यांनी इंग्रजांना दुबळे बनवले. त्यांची मराठ्यांच्या एकुन चाळीस छोट्या मोठ्या जहाजांशी गाठ पडली. बरोबर मराठ्यांची जहाजे याच्याविरुध्द दिशेला असल्याने ते नागावच्या खाडीकडे गेले. कॅप्टन केगविनच्या मदतीसाठी असलेले गुराब व पाच तारवे मराठ्यांनी पकडुन नेली.

इंग्रजांना नामोहरम करण्याकरीता शिवाजी महाराजांनी कल्याण जवळ मोठे सैन्य जमविले. पनवेल जवळ मुंबईवर हल्ला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ४,००० सैन्य जमविल्याची बातमी मुंबईस पोहोचली. २२ ऑक्टोबर ला इंग्रजांनी मराठ्यांची तीन गुराबे बुलविली. ऑक्टोबरच्या १८ तारखेस फाॅरच्यून जहाज व दोन शिबाडे, मानसे व युद्धसाहीत्य भरुन पाठवले. २२ ऑक्टोबरला मराठ्यांच्या बारा गलबतांनी व २५ ऑक्टोबरला ७ तारवांनी खांदेरी बेटावर साहीत्य पुरवले. पुनः २८ तारखेस एक अठरा गलबते खांदेरीकडे निसटली. मराठ्यांनी योजिलेली पळापळीची पद्धत व सुरत लुटनारा शिवाजी मुंबईवर हल्ला करनार ही आवई मुळे इंग्रज चांगलेच जेरीस आले. मराठ्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांना दिशाभुल करत आपले बेत आखून इंग्रजांना पुरते नामोहरम केले होते.

संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला

{क्रमश्यः}

माहीती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य गडकोट समिती
Leave a comment