श्री माणकेश्वर विष्णू मंदिर, पुणे

श्री माणकेश्वर विष्णू मंदिर, पुणे

श्री माणकेश्वर विष्णू मंदिर, पुणे –

शनिवार पेठेत रमणबाग चौकात अगदी वर्दळीच्या ठिकाणी श्री माणकेश्वर विष्णू मंदिर आहे, पण चटकन लक्षात येत नाही. हे मंदिर किती साली बांधले ह्याची नक्की माहिती नाही पण ते सरदार माणकेश्वर गंधे यांच्या घराण्यातील लोकांनी बांधले आणि त्यांच्या नावावरूनच मंदिराला हे नाव मिळाले. नारायण पेठेतून रमणबागेकडे जाताना डाव्या हाताला माणकेश्वर टी स्टॉल नावाचे दुकान आहे. त्या शेजारच्या सोसायटी मधून आत घेल्यावर डाव्या हाताला हे मंदिर लागते.

मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी विष्णू ची अतिशय सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. विष्णू मूर्तीच्या हातात गदा, परशू,  शंख, चक्र अशी आयुधे आहेत. तर लक्ष्मी देवीच्या उजव्या हातात कमळ असून डावा हात अभयहस्त मुद्रेत आहे. विष्णू लक्ष्मी यांच्या मूर्ती समोर खालच्या बाजूला गरुडाची हात जोडलेली मूर्ती आहे.

अंताजी माणकेश्वर गंधे यांची अधिक माहिती हवी असेल तर कौस्तुभ कस्तुरे यांचे सरदार अंताजी माणकेश्वर गंधे हे पुस्तक वाचू शकता.

संदर्भ – मुठेकाठाचे पुणे – प्र.के. घाणेकर.

पत्ता – https://goo.gl/maps/7BXHZ9v9bN5QQnNQ9

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here