महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मल्लिकार्जुन मंदिर, शिरंबे

By Discover Maharashtra Views: 1756 6 Min Read

मल्लिकार्जुन मंदिर, शिरंबे –

जर मुंबई गोवा हायवे प्रवास करत असाल तर , चिपळूण ला साधारण पाच तासात पोहचता आणि फ्रेश होवून पुढे निघता . पुढे जाताना प्रवासाचा शीणवटा घालवायचा असेल आणि , ‘ बिग बाजार ‘ ‘इन ओर्बिट ‘ ‘डी-मार्ट ‘ या मॉल संस्कृतीतून ‘निसर्गाच्या मॉल ‘ मध्ये घुसून अधाशा सारखी खरेदी करायची असेल तर , सरळ चिपळूण पासून १७ किमी वर सावर्डे गाव लागले कि उजवीकडे ‘ वहाळ ‘ फाटा पकडा . हा फाटा तुम्हाला थेट निसर्गात नेवून सोडतो त्यातील पहिला , ‘ निसर्ग मॉल ‘ म्हणजे श्रि. देव मल्लिकार्जुन मंदिर . सावर्डा फाट्यापासून १५ किमी वहाळ आणि पुढे तीन किमी शिरंबे गाव तिथे मल्लिकार्जुन मंदिर आहे .

तसे मंदिर लांबून एवढे आकर्षक वाटत नाही , पण जवळ जाताच भर मार्च मध्ये सुद्धा पाण्याने भरलेले कुंड दिसतात आणि हे कुंड पूर्ण चौकोनात आहे मध्य भागी , श्री . देव मल्लिकार्जुन म्हणजे शंकराचे मंदिर आहे . महाराष्ट्रात जी काही मोजकी जलमंदिर आहेत हे एक मंदिर आहे . कुंडाची रचना विशिष्ठ पाणी साठ्वानुकीपर्यंत आहे त्याच्या वर पाणी गेले कि आपोआप दुसर्या कुंडात पाणी जाते , तिथे जनावरांना पाणी पिण्याची सोय आहे .

सदर मंदिरातील शिवपिंडी  १४०० वर्ष जुने असून , शिवकाळात स्वतः छत्रपती शिवरायांनी विशेष रक्कम अदा करून सदर मंदिराचे बांधकाम केले असे स्थानिक रेफ्रेंस मिळतात . मंदिरातील गाभा आणि शंकराची पिंडी पूर्णतः पाण्यात असून बाहेरील जलकुंडाशी समपातळीत आहे . मंदिराच्या सभोवताली श्रि. वरदान मंदिर , श्रि. चंडिका देवी , यांची स्वतंत्र मंदिरे आहेत .

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला , ग्रामदेवेतेच्या एका विशिष्ठ खांबाला बांधून ठेवतात आणि नगारे वादन करतात व बाजूला तळ्यातील पाणी ठेवतात व काही कालावधीतच व्यक्तीला उतार पडतो असे स्थानिक लोक सांगतात . फाल्गुन महिन्यात देवाचा उत्सव असतो .

मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे गणपती ते दिवाळी या दरम्यान , सर्व हिरवाई तृप्त असते आणि निसर्ग खुललेला असतो . तिथून तृप्त झालात कि थोडे मागे परत फिरायचे आणि पुढे तीन किमी वर वीर गावातील एका अदभूत निसर्गात प्रवेश करायचा. सध्याच्या भाषेत निसर्गाचे वाटर वर्ल्ड इम्याजीका .

श्रि. लक्ष्मी मल्ल्मर्दन मंदिर .

वीर गावात देवपाट नदी ओलांडल्यावर , दोन डोंगराच्या खोबणीत मंदिर विसावलेले आहे जणू काही निसर्गाने आपल्या अजस्त्र बाहुनी मंदिर छातीशी धरून ठेवले आहे . मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर जांभा दगडाची कमान स्वागत करते . सभामंडप साधारण २०० स्क़ेअर फुटाचा आहे . तिथून गाभार्यात साधारण तीन फुट खोल उतरले की  श्रि. लक्ष्मी मल्ल्मार्दानाची सुंदर मूर्ती स्वागत करत झटकन आपल्या वेगळे पणामुळे नजरबंदीचा खेळ करते .

श्रि. लक्ष्मी मल्ल्मर्दन म्हणजे भगवन श्रि. कृष्ण . अतिशय कलात्मक अशी कोरीव काम केलेली सदर मूर्ती महारष्ट्रातील एकमेव्द्वितीय ठरावी . पूर्ण काळा पाषाण वापरला असून मूर्तीची उंची साधारण ४ ते ५ फुट असावी . एकूण सहा भागात मूर्तीचे पाषाण एकमेकावर ठेवून मूर्ती पूर्ण रुपात प्रकट केली आहे . मूर्तीच्या पायाशी १०८ शिवलिंग आहेत . मध्य भागी प्रत्यक्ष श्रि. लक्ष्मीमर्दन आहे . आणि तिरक्या स्थितीत बसवलेला आहे . दोनही बाजूला जय – विजय शिल्पे आहेत . भगवान श्रि. कृष्णाने ८ मल्लाचा नाश केला त्यांची माळ गळ्यात घातलेली आहे . अग्रभागी श्रि. देवी महालक्ष्मी , महासरस्वती व महाकाली यांच्या उग्र रुपाची एकत्रित डोक्यावर पाषाण कमान आहे . मंदिरातून नदीत उतरायला जांभ्या दगडाच्या पायऱ्या आहेत आणि बारमाही जुळी कुंड आहेत .

मूर्तीच्या कलाकुसरीवरून सदर मूर्ती राष्ट्रकुट काळातील असावी असे माझे मित्र व इतिहास संशोधक श्री . सुधांशू नाईक यांचे मत आहे . स्थानिक लोक सांगतात कि साधारण साडेचारशे वर्षापूर्वी जयगड खाडीतून एक प्रवासी जहाज सदर मूर्ती घेवून प्रवास करत होते आणि जहाज बुडू लागले त्यामुळे जहाजावरील सर्वात जड वस्तू म्हणून सदर मूर्ती पाण्यात सोडून दिली आणि गावातील एका व्यक्तीस झालेल्या दृष्टांतानुसार मूर्ती पाण्याच्या बाहेर काढली गेली आणि वीर गावात स्थापना केली गेली .

मूर्तीचे एक वैशिठ्य असे कि सदर मूर्तीच्या पायाची एक छोटा १० इंची खड्डा आहे . त्या खड्ड्यात आपोआप पाणी साठते . मूर्तीला कुठेची पाण्याची लिंक नाही . पण पाणी साफ करून जागा कोरडी केली तरी रात्रभरात आपोआप पाणी साठते . कदाचित दगड विशिष्ठ प्रकारचा असावा हवेतील दमट पण शोषून घेणारा

१९४० साली मंदिराचे नुतनीकरण झाले . पुण्याच्या सुप्रसिद्ध लकडी पुलाचे वास्तुरचनाकार श्रि. विष्णुपंत वीरकर यांनी या मंदिराची रचना केली आहे . मंदिराकडे पुरातत्व खात्याचे पूर्ण दुर्लक्ष आहे . जर मूर्तीवर वज्रलेप चढवला तर एक सुंदर मूर्ती प्रकट होईल यात काही शंका नाही . पण दोनही मंदिरांकडे स्थानिक लोकांचे पण लक्ष नाही . किंवा सदर स्थाने विकसित करावीत अशी ग्रामेच्छ पण दिसून येत नाही .

तर अशा या , निसर्गाच्या मॉल मध्ये जरूर शिरा . खरेदीचे समाधान कोणत्या अत्युच्च दर्जाचे असते ते कळून येते . सुयोग्य काळ गणपती नंतर दिवाळी पर्यंत . कारण हिरवा रंग आपली सर्वोच्च शेड पेश करत असतो आणि आजूबाजूला हजारो कास पठरासारखी फुले फुललेली असतात .

पराग

Leave a comment