लेण्याद्री लेणी

लेण्याद्री लेणी

लेण्याद्री लेणी..!!

दगडाच्या देशा, दक्खन म्हणजे श्रीमंती मग ती कशाची हीं असो इथलं स्थापत्य पाहिलं की माणसाचं मन मोहून जातं, उत्कृष्ट अश्या लेणी चा समूह हा जुन्नर शहरातआहे. ह्या सह्याद्रीच्या रांगेत लेण्याचा खुप समूह कोरला गेला आहे, ह्या बेसाल्ट च्या खडकात हें उत्कृष्ट असं काम झाल  आहे. जुन्नर मध्ये खुप मोठा लेण्याद्री लेणी समूह आहे, त्यातील लेण्याद्री, ह्यात जवळपास 20 निवासकक्ष आहेत,मध्ययुगातील 17 व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला तिथे “गिरिजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने प्रसिद्ध करण्यात आला .

पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट सभामंडप हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.

सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच बौद्ध सभामंडप आहे. या ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार.

इथं उर पाण्याच्या चार टाक्या आहेत, त्यात वर्ष भर पिण्याच्या पाण्याचा साठा असतो.

संदर्भ :- नेट आणि पुरातन माहिती संग्रह…

@ अशोक बालाजीराव शिनगारे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here