महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्र👈 Website Views: 94,34,184

Konkanatil Gavrhati | कोकणातील गावऱ्हाटी

Views: 6
4 Min Read

Konkanatil Gavrhati | कोकणातील गावऱ्हाटी –

कोकण म्हणजे परशुरामाने निर्माण केलेली भूमी अस मानलं जातं. कोकण हे नाव परशुरामाच्या दुसऱ्या मातेवरून कुंकणा देवी वरून पडले असे मानले जाते. तर कोकण व नागलोक या लेखात वि का राजवाडे कुकण नावाच्या नागांच्या कुळाचा उल्लेख करतात या नावावरूनच कोकण हे नाव आले असावे असे काहींचे मत आहे. कोन म्हणजे डोंगर कोळकोण म्हणजे कोळी लोकांचा डोंगर अशीही त्याची व्याख्या केली जाते. उत्तर कोकणाला चौदा ताल कोकण म्हणतात. ताल म्हणजे शतक. चौदा ताल म्हणजे चौदाशे. चौदाशे गाव असलेलं ऊत्तर कोकण. दक्षिण कोकणातही तेवढीच गावे असण्याची शक्यता आहे.(कोकणातील गावऱ्हाटी)

कोकणातील गावऱ्हाटी या पुस्तकाचे लेखक श्याम धुरी हे धार्मिक व ईश्वर भक्त मनुष्य आहेत. त्यामुळे पुस्तक जरी श्रद्धेच्या पातळीवर लिहिलेलं असलं तरीही पुस्तकात वेगवेगळ्या संशोधित पुस्तकांचे संदर्भ आहेत. त्यांची अन्य पुस्तके म्हणजे ‘संपूर्ण श्रीगणेश’ व ‘जन्मापासून मृत्यूपर्यंत’ ह्यात ही धार्मिकतेशी जोडलेल्या बाबी आहेत.

कोकणातील गावरहाटी ह्या पुस्तकात त्यांनी कोकणच्या बारा पाचाचा संप्रदाय या बद्दल माहिती दिलेली आहे. हा बारा पाचाचा संप्रदाय म्हणजे बारा दैवतांचा संप्रदाय. त्यात बाराचा पूर्वस (मायेचा पूर्वस) हे एक दैवत. दुसरा दैवत विठ्ठला देवी ही राजसत्ता सांभाळणारी देवी आहे. तिसरे दैवत गाव चालवणारा गावडा. चौथे स्थळ गांगो. पाचवे स्थळ खातया (सुतारदेव). सहावे स्थळ मडवळ. सातवे स्थळ जैन (लिंग) आठवे स्थळ ब्राह्मण. नववे स्थळ कुळ (पाण्याने भरलेली झारी). दहावे स्थळ भराडी (भद्रकाली, भावई) अकरावे स्थळ बेळा व बारावे स्थळ पान. अश्या बारा दैवतांचा मिळून बारा पाचाचा संप्रदाय निर्माण झाला.

बारा पाच मधील बारा दैवते व ज्या पाच गटांनी ह्याची स्थापना केली ते पाच गट यांनी मिळून हा संप्रदाय निर्माण केला.
रवळनाथ व सांतेरी हे येथील प्रमुख दैवत. रवळनाथ हा इथला इंद्र म्हणजे राजा आहे. त्याला पिशाच्च लोकांचा धनी म्हणतात. हा रवळनाथ पंढरीचा विठ्ठल ह्यात लेखकाला साम्य वाटते. विठ्ठलाची मत्स्य कर्ण कुंडल ही तो समुद्र संबंधी देव असावा असा निर्देश करते. कोल्हापूरच्या रत्नागिरी डोंगरावर असणारा जोतिबा व रवळनाथ एकच आहे असे रा. ची. ढेरे म्हणतात.

लेखकाच्या मते कोकणातील गाव रहाटी मध्ये महार, परब, राऊळ, घाडी, गुरव आणि गावडे यांचं प्राबल्य आहे. त्यातील सर्वात आधी कोकण भूमीत ज्यांनी प्रथम प्रवेश केला ते महार. (महार ही कोळू लोकांची आदिवासी जमात होती) त्यामुळे बाराचा पूर्वस ज्याला म्हणतात तो महारवस आहे. महारांनी कोकणात गावर्हाटी ची स्थापना केली आणि त्यामुळेच बर्याच धार्मिक क्रिया या महाराशिवाय पूर्ण होत नव्हत्या. ज्याने गावाच्या सीमा आखल्या तो सोम वंशाचा पुरुष त्यालाच गावरहाटी मध्ये पूर्वीचा म्हार असा शब्द वापरला जातो. तोच गाव आखता आणि गाव जोडता आहे. याच्याच हाती गावरहाटीतील दांडा आहे. तोच चव्हाट्याचा मालक आहे.

बाराचा पूर्वस हाच मायेचा पूर्वस असल्यामुळे भराडी देवीची किंवा कोणत्याही देवतेचा पूजा स्वीकार महाराशीवाय पूर्ण होत नाही असे लेखकाला वाटते. लेखक म्हणतो- ‘ही शक्ती या समाजाचा एक तरी मनुष्य असल्याशिवाय आपल्या कार्याची पूर्तता करवून घेत नाही.’
पण महारांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आता या प्रथा बंद झाल्यात. (लपून छपून काही महार करत असतील तरच काही ठिकाणी चालू असतील)
बेल (महार) व पान (महार) ह्या महार समाजातील पोटजातीतील ही बारा पाच संप्रदायातील दोन दैवते

दांडेकर हे दैवत पूर्वीच्या महाराने गावच्या सीमा आखून ज्याच्या हाती दांडा दिला तो दांडेकर. सीमेच्या आतील जमीन सर्व दांडेकराची. स्मशानात जे पैसे ठेवले जातात ते महाराला देतात. कारण तोच त्या स्थळाचा मालक ठरतो.
पुस्तकात चाळा, देवचार, नितकारी, अभाईत, चव्हाटा, इर्तिक, मेळेकार, तरंग, गाऱ्हाणे, पातोळी, ,लोपाचार, देसरूढ , डाळप या सर्व संकल्पानांचे स्पष्टीकरण दिले आहे. धार्मिक असाल तर बर्याच परंपरांची माहिती पुस्तकात मिळेल. अभ्यासासाठी संदर्भ मिळू शकतात या पुस्तकात.
कोकणचा राजकीय व पुराण इतिहासही ह्यात मांडला आहे.

पुस्तकांची लिंक  – https://sahyadribooks.com/konkanatil-gavrhati/

शोध इतिहासाचा Facebook Page

Leave a Comment