खेळोजी भोंसले

कन्टेन्ट | गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ ३ ४ ५ ६ ७ | मौर्य सत्तेचा उदय | गड कसे पाहवे | संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर | जावळी मोहीम ६

खेळोजी भोंसले –

शहाजीराजेंचा खेळोजी भोंसले चुलतभाऊ असून विठोजीचा पुत्र होता. हा वेरूळकडे आपल्या जहागिरीच्या प्रांतीं रहात असे. त्याला निजामशाहींतून मनसब होती. शहाजहान जेव्हां निजामशाही बुडविण्याच्या नादीं लागला तेव्हा निरुपायानें जसा शहाजी हा शहाजहानला मिळाला तसाच खेळाजीहि आपले भाऊ मालोजी व परसोजी यांच्यासह शहाजहानला मिळाला (१६२९). शहाजहाननें त्याला पंचहजारी मनसव दिली. पुढें (१६३३) मोंगल हे जेव्हां दौलताबाद काबीज करूं लागले, तेव्हां खेळोजीनें त्यांची नौकरी सोडून आदीलशाहींत नौकरी धरली व मोंगलांशी लढूं लागला. या प्रसंगीं एकदां त्याची बायको गोदावरीवर स्नानास जात असतां तिला मोंगलांनीं पकडलें तेव्हां चार लाख रुपये दंड भरून त्यानें तिला सोडविलें.

शहाजहानचा व आदिलशहाचा तह झाल्यावर आदिलशहानें खेळोजीस नोकरीवरून दूर केलें तेव्हां तो पुन्हां आपल्या जहागिरींत राहून मोंगलांच्या मुलुखांत धुमाकूळ घालूं लागला. तेव्हां दख्खनचा सुभेदार औरंगजेब यानें मोठया मुष्किलीनें खेळोजीचें गुप्त ठिकाण शोधून काढून युक्तीनें त्याला पकडून १६३९ च्या आक्टोबरांत ठार मारलें. खेळोजीचा वंश वेरूळ प्रांतीं अद्यापि आहे.

[मराठी रियासत- पूर्वार्ध]

माहिती साभार  – मराठा स्वराज्यातील वीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here