महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,54,293

खंडोबा मंदिर, कसबा पेठ

Views: 1492
1 Min Read

खंडोबा मंदिर, कसबा पेठ –

कसबा पेठेमध्ये गुंडाच्या गणपती जवळ एक फारसे प्रसिद्ध नसलेले खंडोबा मंदिर आहे. मंदिर सुमारे २०० ते २५० वर्षे जुने दगडी बांधणीचे आहे. पूर्वी मंदिरासमोर वाडा होता त्यामुळे मंदिर सहज लक्षात येत नसे. वाडा पडल्यामुळे मंदिरासमोर मोकळी जागा उपलब्ध झाली.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिरामध्ये काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये खंडोबाबरोबर म्हाळसा आणि बानू या दोघींच्या मूर्ती आहेत. बानुबाईने एक कोकरू उचलून कमरेवर घेतलेलं आहे. खंडोबाच्या वरच्या एका हातात शंख तर दुसर्या हातात त्रिशूल आणि डमरू आहे. तर खालच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हाताने म्हाळसाला पकडले आहे. खाली जेजुरीसारखी पंचलिंग आहेत.

संदर्भ: मंदार लवाटे

पत्ता : https://goo.gl/maps/LqDVWMGkx2mtW92S9

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment