खांदेश्वर शिवमंदीर

खांदेश्वर शिवमंदीर

खांदेश्वर शिवमंदीर –

मुळात आपल्या आजूबाजूला काय असत हेच आपल्याला माहीत नसत. पनवेल शहर म्हटल की आपल्याला आठवत ऐतिहासिक अस बंदर,ऐतिहासिक लष्करी ठाणे अन पनवेल मधी असणार्या बर्याच ऐतिहासिक अशा वास्तू,मंदीरे,वाडे. आज रविवार,मुळात आज बाहेर कुठैही भटकंती ला न जाता आज पनवेल मधील च भटकंती,निवड केली ती पनवेल मधील खांदैश्वर येथिल खांदेश्वर शिवमंदीर शिवमंदीराची.

पनवेल शहरापासून जवळपास दोन ते तीन किमि वर असलेले हे खांदेश्वर ठिकाण.नुतनीकरणार्या रुपात खांदेश्वर ला एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहै,येथून च चंदेरी,माथैरान कडे जाण्यासाठीचा रस्ता आपल्याला पहायला मिळतो.जवळ चा पुणे-बेंगलौर महामार्ग आहै.पनवैल कडे येणार्या महामार्गालगत च है खांदेश्वर शिवमंदिर आपल्याला बघायाला मिळते.भव्य असा तलाव,तलावाशेजारीच असणारै हे शिवमंदिर,दगडी विहीर,कासवाच्या पाठीवर आरुढ झालेली मंदीराच्या बाहेर असलैली दगडी दीपमाळ अस मंदीराच स्वरुप.

मंदीरात प्रवैश करतेवैळी आपल्याला कमानीवजा गार्डन च्या गेटमधून आत जावै लागते.गार्डन असल्यामुळ येथे बरेच भटके फिरावयास व देवदर्शनास ही येतात. गेटमधून आत गेल्यावर आपल्याला १५-२० पावले चालल्यानंतर समोरच मंदीरा निदर्शनास पडते.मंदीराच्या बाहैरच डाव्या हाताला गोल घुमटाकार अवस्थैत असणारी दगडी बांधणितील विहीर आहे.
वीहीरीत कचरा पडू नये म्हणुन त्याला गोल लोखंडी गजांची टोपी बसवण्यात आलेली आहे.मधौमध मंदीर,डाव्या हाताला दगडी विहिर अन उजव्या हाताला मंदिरासमोर दगडी बांधणितिला दिपमाळ अन नवीन दीपमाळ अशी मंदीराची रचना आपल्याला पहायाला मिळते.

मंदीर हे सध्या नुतनीकरण केलेलै असुन मंदीराचा गाभारा हा दगडी बंधणितला अजून मंदिराचे सभागृह हृ माञ नवीन आहे. मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला समोरच दगडी बंधणितला नंदी पहायला मिळतो.समोरच गाभार्यातील प्रवेशद्वार असून डाव्या बाजुला एक देवडीत गणपती अन उजव्या बाजुला देवडीत संकटमोचन हनुमानाची मुर्ती बघायला मिळते(हीच रचना तर गाभार्यातून पाहीली तर बाहेरुन उजव्या बाजुच्या देवडीत गणपती अन डाव्या बाजुच्या देवडीत हनुमानाची मुर्ती पहायाला मिळते).

गाभार्याच्या प्रवेशद्वारावर वरती गणेशाची मुर्ती अन खाली किर्तीमुख पहायला मिळत.गाभार्यात प्रवेश केल्यावर आपल्याला महादेवाची पिंड पहायला मिळतै.जागृत अन नावलौकिक असलेला हे महादेवाच मंदिर फार प्रशस्त असून महाशिवराञी ला येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात महोत्सव असतो.पनवेल शहरात ckp समाजाचा वापर फार मोठ्या प्रमाणत पहायला मिळतो.ckp समाजात वावरणारै अन वकीली करणारे व पनवेल शहरात राहणारे बाबा पतकी यांनी खांदेश्वर महादेव मंदीरातील शिवलिंगाचा शोध लावला.

असच सहज फेरफटका मारुन पाहता येण्यासारख पनवेल तालुक्यातिल खांदैश्वर महादेव शिवमंदीर सर्वानी आवर्जून पहाव.

Sunil Sanas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here