महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 92,28,444

कल्याणसुंदर

Views: 2816
2 Min Read

कल्याणसुंदर –

“शिव पार्वती विवाह” सोहळ्यास “कल्याणसुंदर” या नावाने ओळखले जाते. उपरोक्त शिल्पाकृतीत “पाणिग्रहणाचे” दृश्य दिसते. ‘उत्तर भारतात’ ही अधिकतर पाणिग्रहणाचे शिल्पपट दिसून येते. ‘बंगाल’ मध्ये “सप्तपदी” चे शिल्पांकन तर ‘जावा’ कडे “आशीर्वादाचे” शिल्पांकन दिसून येते.

शिव हा उजवीकडे असून पार्वती डावीकडे आहे. सहसा शिव द्विभुज किंवा चतुर्भुज दोन्ही रुपांत दिसतो, मात्र या ठिकाणी तो चतुर्भुज आहे. तसेच पौरोहित्य करणारे ब्रम्हदेव अग्नीच्या मुखात आहुती टाकताना दिसतात. क्वचितच येथील अग्नी हा पुरुष रुपांत दाखवला जातो. तसेच दक्षिण भारतात पार्वती च्या बाजूस हाती पाण्याची झारी घेऊन, विष्णू उभा दाखवतात. परिवार देवतांत नवग्रह, अष्टदिक्पाल, गणपती, स्कंद इतर शिवगण दाखवले जातात.

कल्याण सुंदर चे अन्य ही प्रकार पाहावयास मिळतात. अलिंगन मुर्ती आणि कल्याण सुंदर यांचा अप्रतिम मिलाफ पाहावयास मिळतो. (झाशी संग्रहालय) शिव एका हाताने पार्वती चे पाणिग्रहण करत असून दुसऱ्या हाताने तिच्या स्तनांना स्पर्श करत आहे. तर काही ठिकाणी, पार्वती शिवाला एका हाताने अलिंगन देत असून, दुसरा हात शिवाच्या हाती देत असल्याचे दृश्य असून, खालील बाजूस ब्रम्हदेव पौरोहीत्य करताना दिसतात. अन्य ठिकाणी शिवाने पार्वती चे पाणिग्रहण करत, हनुस्पर्श केला आहे. अशी अनेक रुपे कल्याणसुंदर मुर्ती मध्ये अंकीत केल्याची दिसून येतात.अन्य ठिकाणी शिवाने पार्वती चे पाणिग्रहण करत, हनुस्पर्श केला आहे. अशी अनेक रुपे कल्याणसुंदर मुर्ती मध्ये अंकीत केल्याची दिसून येतात. केल्याची दिसून येतात.

Shrimala K. G.

Leave a Comment