छत्रपती शिवाजी महाराज स्थापित श्री जगदीश्वर मंदिर आणि पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे समाधी

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित श्री जगदीश्वर मंदिर आणि पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे समाधी…

पिरंगुट हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून च गाव आहे, प्रियंगुवात किंवा प्रियवंतन चा अपभ्रंश होऊन पिरंगुट हे नाव पडले आहे. हिंदवी स्वराज्याचे पाहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचं गाव, समाधीस्थळ आहे.गावात छत्रपती शिवाजी महाराज स्थापित श्री जगदीश्वर मंदिर देखणं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस पिलाजी गोळे यांच्या वाड्यावर मुक्कामी होते.

हिंदवी स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात मिर्झाराजे चे मुघली सैनिक धुमाकूळ घालत होते, काळ भयाण होत चालला होता. राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज व सर्व अष्ठप्रधान मंडळ चर्चा मसलत करत होते. चोहो बाजूनी स्वराज्य वर संकट उभे राहिले होते. इ स 1665 मार्च महिन्यात कोकणातून राजगडावर येणारी रसद दोन वेळा शत्रू च्या तावडीत सापडली होती. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज अनेक ठिकाणी, आघाडीवर झुंज देत होते, जागोजागी रणसंग्राम होत होते, पारडं आपलंच भारी होतं होत, पण मिर्झाराजे हा वयाने आणि अनुभवाने छत्रपती पेक्षा मोठा होता, शिवाय लाखो मुघलांच्या सैनिकांच्या मानाने आपले मावळे फारच कमी होते पण हार मानणारे नव्हते …. तोडीस तोड आणि जशास तसे उत्तर देत होते .. . राजगडावरून निघालेली आज्ञा म्हणजे प्रत्येक मावळ्यांना एक प्रकारे पराक्रम करण्यासाठी प्रेरणा व ऊर्जा मिळत असे.

अशाच उन्हाळ्यात मार्चचा तो महिना होता, हनुमान जन्मोत्सव स्वराज्या मध्ये गावोगावी साजरा होत होता. पण पिरंगुटला नरवीर सरदार पिलाजी गोळे त्यावेळी नव्हते ते मंगळगडच्या परिसरात मोहिमेत अडकले होते. पिरंगुटला त्या दिवशी  संताजी गोळे आणि त्यांचे इतर भाऊ, भावकी मधील पैलवान मंडळी होती.

राजगड वरून लखोटा आला होता, की पौड, ताम्हिणी भागात कुतुबुधीखान, आणि दाऊदखान हे स्वतः आणि 20 हजार फौज घेऊन धुडगूस घालत होते, या दोघांनाही अनेक निरपराध लोकांना कैद करून त्यांची संपत्ती आपल्या ताब्यात ठेवली होती. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज लोहगड वर पोहचून मोठ्या फौजा फाटा घेऊन चालून येत असलेल्या बातम्या मिर्झा राजे ना समजल्या, मिर्झाराजे नी त्याच्या या सरदार ना आज्ञा देऊन लोहगड च या दिशेने रवाना केले, हे दोघे मुघली सरदार लोहगड जवळ पोहोचतच मराठा किल्लेदाराने गडाचे दरवाजे उघडून 500 मावळ्यांना त्यांच्या अंगावर तुटून पडायला सांगितले, रणसंग्राम झाला.

एकच कापाकापी सुरू झाली, पण लगेचच रायसिंह, अचलसिंह, आणि कुतुब खान यांनी आघाडी सांभाळून जोरदार हल्ला केला, या बळकट हल्ल्याने मराठयांनी माघार घेतली, दुर्दैवाने या हल्ल्यात मराठयांच्या नुकसानीत वाढ झाली, लोहगड, तुंग, तिकोना ,, विसापूर, मोरगिरी, हा संपूर्ण प्रदेश , दाऊद खानाने लुटून जाळून टाकला, या नंतर मुघली सैनिक पुणेत परतले, पण मराठयांच्या काही तुकड्या पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असल याचे समजले मिर्जाराजाने, दाऊद खानाने पुन्हा पौड खोऱ्यात हल्ला केला, घोटावडे, मूलखेड, दारवली, सावरगाव हि गावे बेचिराख झाली, पण पिरंगुटला संताजी गोळे आणि त्याच्या पैलवान मावळ्यांनी निकारची झुंज दिली पण शत्रू भारी पडला, यशस्वी माघार घेऊन मागे फिरले या लढाईत जवळपास 300 माणसे आणि 4500 जनावरे कैद करून दाऊद खान पुणेत गेला.

परिसरात वातावरण गंभीर झाले होते. संताजी गोळे आणि इतर गोळे मंडळी पेटून उठले होते …..
सरदार पिलाजी गोळेना मंगळगडावर बातमी कळली संताजी, गोदाजी, आणि इतर गोळे मंडळीना निरोप पाठवला की आरपार ची लढाई झाली तरी बेहत्तर माघार घेऊ नका, इकडची छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली कामगिरी चोख बजावून मी स्वतः नव्या दमाची फौज घेऊन येतो तोपर्यंत पौड खोरं शत्रू च्या ताब्यात जाता कामी नये ….

मग काय पिलाजीरावांची अशी प्रेरणा मिळाली …. गोळेंच्या अंगात 12 हत्तीचं बळ संचारल होतं …

हनुमान जन्मोत्सव (1665), च्या आदल्या दिवशी निवे (मुळशी तालुका), कोकण मधून येणारी रसद दाऊद खान पुन्हा लूटमार करणार होता. संताजी आणि त्यांची फौज उरवडे, बेलावडे, चिंचवड, कोंढवळे, अकोले करत मुळशीचा डोंगर चढून आपल्या येणाऱ्या रसद वर लक्ष ठेवत प्रवास करत होते, आणि अचानक काही समजण्याच्या आत मुघली सैनिक वांद्रे, वडस्ते कडून घुसले. एकच खळबळ उडाली, तलवार, भाले कचाकचा चालले होते, कापाकापी उडाली, शत्रू 8000 च्या आसपास होता आणि संताजी आणि त्याचे साथीदार 700 होते, रसद बरोबर 100 जण असतील असे 800 विरुद्ध 8000 घमासान रणसंग्राम उडाला …

संताजीची तलवार म्हणजे पिलाजी गोळेच्या तलवारी सारखी चालली होती, रक्ताच्या पिचकाऱ्या उडत होत्या, गोळे आणि इतर सगळे मावळे एकत्र जोरात लढत होते, मुघली सैनिक अचंबित झाले होते, काय हे चिवट मावळे ….

शत्रूच्या घोटत हाहाकार माजलं होता, सहज रसद मिळवणे हे त्यांचं स्वप्न जवळपास धुळीला मिळालं होतं डोंगर दरीचा दांडगा अनुभव, असल्याने सरशी आपलीच होत होती. पण शत्रूच्या संख्येत वाढ झाली त्यानं नव्या दमाची कुमक मिळाली होती शिवाय आपली कुमक गेले 12 ते 13 दिवस धावपळीमुळे तशी थकलेली होती पण माघार घेणारी नव्हती अखेर शेवटी घमासान लढाईत वीर संताजी गोळे यांना वीर मरण आले अनेक मावळे कामी आले. पण पराक्रम झाला. सर्व  रणझुंझार मावळ्यांना मानाचा मुजरा.

पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरंदर लढाई आणि इतर अनेक पैलूंचा विचार करून पुरंदरचा तह केला. पुढचा इतिहास आपल्याला माहीतच आहे.

पण काळाच्या ओघात या अपरिचित लढाईत वीर योद्धा संताजी गोळे मात्र मनात कायमचं घर करून गेला …..

या लढाई नंतर गोळे घराणे ने त्या लढाईच्या ठिकाणी भैरवनाथ ची मूर्ती बसवली …. म्हणतात की भैरवनाथ स्वतः आशीर्वाद देऊन मावळ्यांना एक प्रकारे ऊर्जा देत होते.

Maruti Gole 

 

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here