महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री पांढरीच्या मारुती मंदिरातील शिलालेख !

By Discover Maharashtra Views: 1197 2 Min Read

श्री पांढरीच्या मारुती मंदिरातील शिलालेख !

कऱ्हाड – विटा रस्त्यालगत कृष्णा नाक्यावर पूर्वाभिमुख असलेले श्री.पांढरीच्या मारुतीचे मंदिर आहे. पांढर – पांढरी म्हणजे गावच्या ज्या जागेवर मनुष्ये घरेदारे करून नांदतात तिला पांढरी “गावठाण” म्हणतात. शहर आणि परिसरात लहानमोठी बरीच मंदिरे आहेत. ह्यातल्या बऱ्यापैकी मंदिराचा समूह कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो. श्री.पांढरीच्या मारुती मंदिरात प्रवेश करत असताना सुंदर कमान असून डाव्या बाजूला दीपमाळ आपल्याला पहावयास मिळते. गेल्या काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असल्याचे मंदिराची देखभाल करणारे श्री गुरव (पुजारी) यांनी सांगितले.

नवीन बांधलेला सभामंडप आपल्याला बघायला मिळतो.गाभाऱ्यात प्रवेश करत असताना गणेशपट्टी वर सुंदर असा गणपती कोरलेला आहे.पुढे ध्यान उग्र स्वरूपाची श्री मारुतरायाची मूर्ती आपल्या समोर दिसते. डाव्या बाजूला गणरायाची मूर्ती तर उजव्या बाजूला शिवलिंग आहे.परिसरात अनेक जुने मंदिराचे अवशेष दगड पहायला मिळतात. त्याच बरोबर वीरगळी , नागशिल्प , शिवलिंग ही आहेत.मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर काही दगड आपल्याला पहायला त्यातील एका दगडावर शिलालेख आपल्याला बघायला मिळतो. या शिलालेखाची भाषा ही मराठी असून लिपी देवनागरी आहे.

काय आहे शिलालेख मध्ये?

बाबाजी “बिन्न” म्हणजे मुलगा दुसऱ्या ओळीत आडनाव असू शकते पाचंदकर तिसऱ्या ओळीमध्ये राहणार त्याच्या खालच्या कऱ्हाड शके शेवटच्या ओळीत शक आलेल्याचे दिसते १६०५ का असा उल्लेख शिलालेखात आहे. “ इतिहासाचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक

साधनांच्या स्वरूपात आढळणारे असे अनेक शिलालेख आहेत , ज्यांची माहिती अद्याप ही नाही.”

शिलालेखांबाबत.

  • या शिलालेखाची लांबी २५ सें.मी व रुंदी २० सें.मी
  • शिलालेख हा ५ ओळींचा असून काही ओळींतील अक्षरे जरा अस्पष्ट आहेत.
  • शिलालेखात कऱ्हाड असा उल्लेख आहे.
  • शिलालेखात शके १६०५ असा उल्लेख आहे.

शके १६०५ म्हणजेच इ.स.१६८३ – १६८४ चा हा शिलालेख आहे.

© संकेत फडके , कऱ्हाड

Leave a comment