इतिहासाचे साक्षीदार – दुर्लक्षित जटवाडा
इतिहास अभ्यासक म्हटले की तो कुठल्याही ठिकाणचा इतिहास जानण्यासाठी इच्छुक असतोच आणि एखाद्या जवळच्या ठिकाणाबद्दल कुणी काही सांगीतलं की मग तर विचारायलाचं नको. असचं काही दिवसांपुर्वी मित्राकडुन ऍकण्यात आलं की “जटवाडा” गावात काही पुरातन अवशेष आहेत,उत्कंठा शिगेला होती आणि मग 8 मे ला जाण्याचे ठरवले. जटवाडा हे गाव औरंगाबाद पासुन 8 ते 10 कि.मी. दुर आहे, जाताना मनात बरेच प्रश्न होते, आणि मग निघालो…..
बोलता बोलता हे 8-10 कि.मी. कसे गेले कळालेही नाही, जाताना औरंगाबादच्या लेण्यांचा डोंगर दिसत होता ते पहात पहात जटवाडा गावात पोहचलो. समोर दिसत होते ते जैन मंदीर पण तिथे मी थांबलो नाही आणखी पुढे गेलो, गावातुन बाहेर पडताना काही पडलेल्या खांबांचे अवशेष नजरेस पडले, हे अवषेश इथे घडलेल्या इतिहासाची साक्ष देत होते, डोंगराला लागुन असलेले हे गाव. वर तळपता सुर्य होता, भयंकर उन होते, कुठे सावलीही दिसतं नव्हती आणि अशा परिस्थितीत तिथुन 2 की.मी. वर असलेल्या जोगवाडा गावात मी पोहचलो.
30-40 घरांचे हे “जोगवाडा” गाव, गाव फ़िरत फ़िरत मी गावाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो आता मात्र पुढे रस्ता नव्हता आणि अचानक ज्यासाठी इथवर आलो ते नजरेस पडले, हा होता “घोड्याचा भव्य असा तबेला ?”.आज लोक या वास्तूस घोड्याचा तबेला असल्याचे सांगतात. हा तबेला कुनी बनवला कधी बनवला याची काहीही माहीती स्थानिकांकडुन मिळाली नाही. पण आजची त्याची अवस्था मात्र दयनिय झालेली आहे, आणि सुरुवातीला दिसला तो म्हणजे या तबेल्याचा पडलेल्या अवस्थेत असलेला बुरुज, आज त्या बुरुजातुन अगदी पिंपळाचे झाड उगवलेले होते आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत गुर-वासरं बांधलेली होती, पुढे दिसले त्या तबेल्याचे भव्य असे प्रवेशद्वार, द्वाराची कमान होती पण द्वार काही नव्हते, तबेल्यात आत शिरल्यानंतर पाहीले ते अगदीच दयनिय होते, प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजुला भिंतिवर जाण्यासाठी पायर्या होत्या व त्या पायर्यांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत गुरांचा चारा भरुन ठेवलेला होता.
इतिहासाचे साक्षीदार – दुर्लक्षित जटवाडा


हे सर्व पाहुन या जोगवाड्यातुन मी आता बाहेर पडलो आणि परत निघालो जटवाड्याकडे, भयंकर उन्हात पुन्हा निघालो, रस्त्याच्या कडेला सावलीही दिसत नव्हती, हवा तर अजिबात नव्हती. आणि जटवाडा गावात पोहचलो, प्रथम मी गेलो तेथील जैन मंदिरात, मंदिर सुंदर होते, खालच्या मंदिरात दर्शन घेउन मी पायर्यांनी वर गेलो आणि वर पाहील्या प्राचीन जैन मुर्ती, तेथिल स्थानिकांना या बद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अशा 21 जैन मुर्ति काही वर्षांपुर्वी येथे मिळाल्या होत्याआणि त्या सर्व मुर्ति आज या मंदिरात ठेवलेल्या आहेत,या जैन मंदिराच्या समोरचं 2 विष्णुच्या दगडी मुर्तिही दिसल्या, विचारल्यावरत्यांनी सांगितले की येथे जवळचं या मुर्ति मिळाल्या होत्या, मग ती जागा मी पहायला गेलो. ज्या ठीकाणी या मुर्ति मिळाल्या होत्या आज ती जागा दगडांनी बंद करण्यात आलेली आहे.
इतिहासाचे साक्षीदार – दुर्लक्षित जटवाडा

आज इथे मिळालेल्या मुर्ति, पुरातन जैन मंदिर, पडलेल्या वाड्याचे अवशेष, तो तेलाचा घाना आणि तो भव्य असा घोड्याचा तबेला हेआहेत इथे घडलेल्या “इतिहासाचे साक्षिदार”………
