हांडे देशमुखांच्या शोधात

हांडे देशमुखांच्या शोधात

हांडे देशमुखांच्या शोधात –

जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे हांडे परिवाराच मुळगाव. तिथला एक पुरूष देवराव हांडे याने तलवारीच्या जोरावर देशमुखी मिळवली व मौजे नळवणे ता.जुन्नर या गावी कोट बांधुन देशमुखी करू लागला.नळवणे येथेच आमचे कुलदैवत श्री मार्तंड यांचे देवालय आहे. या देवराव हांडे देशमुख याने ‘पातशहाची पिछाडी मारली व मालकावर वार केला’ अशा प्रकारचा उल्लेख वंशावळींमध्ये आहे.(हांडे देशमुखांच्या शोधात)

देवराव हांडे देशमुख यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इ.स. १६५७ साली औरंगजेबाचा सरदार मुर्शीदकुलीखान याने जाखोजी हरजी हांडे देशमुख यांना जुन्नर सरकारमधील १७ तरफांतील ३५९ गावची देशमुखी दिल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शाहु महाराज यांच्या काळात देखिल रायाजी हांडे या लढाऊबाण्याच्या व्यक्तीचा उल्लेख आढळतो. सन १८१८ साली हांडे देशमुख घराण्याकडे ५६२ गावची देशमुखी असल्याचे संदर्भ आहेत आणि ती पुणे , नगर व नाशिक जिल्ह्यात आहेत. त्याचबरोबर मौजे उंब्रज ,मौजे पिंपळगाव जोगा व मौजे रिसे येथील पाटिलक्या हांडे घराण्याकडे होत्या. त्याचबरोबर जुन्नर ,करडे व पुणे पुरालेखागार येथुन वंशावळी प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार माझ्यापर्यंत २४ पिढ्यांची वंशवेल उपलब्ध झाली आहे.

मौजे नळवणे येथे देवराव हांडे देशमुख यांची समाधी आहे.तसेच पारनेर व पळवे येथे देखिल समाध्या आहेत. ही माहिती टाकण्याचा उद्देश असा की अजुनही माझा शोध संपलेला नाही.मला तुमच्या सर्वांच्या मदतीची व मार्गदर्शनाची  गरज आहे. ही माहिती टाकण्याचा उद्देश असा की अजुनही माझा शोध संपलेला नाही.

हर्षद रमेश हांडे देशमुख

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here