महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 92,65,687

शिळेवरील धनुष्यबाण । इतिहासाच्या पाऊलखुणा

Views: 72
3 Min Read

शिळेवरील धनुष्यबाण । इतिहासाच्या पाऊलखुणा

मध्ययुगात कोकणचे दोन भाग मानले गेले होते. दक्षिण कोकण उत्तर कोकण या भूमिला पूर्वी अपरांत असे म्हटले गेले आहे. कोकण ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. परशुरामाची माता कुंकणा (रेणुका)यावरुन कोकण हे नाव पडले असावे असे मानले जाते परशुरामाने जिंकलेली भूमी ब्राह्मणांना दान दिल्यानंतर आपणास रहावयास जागा उरली नाही हे पाहून परशुरामाने समुद्र शंभर योजने मागे हटवून अपरान्ताची भूमी निर्माण केली असे ग्रंथ सांगतात.(शिळेवरील धनुष्यबाण)

सुरवातीला मानव जंगलात आणि गुफेत राहत होता . तो लहान मोठ्या प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस तो भक्षण करीत असे .शिकार आणि अन्न गोळा करणे हे मानव जातीचे पहिले नैसर्गिक मूळ व सर्वात टिकाऊ यशस्वी अनुकूलन होते त्यातील 90 टक्के लोक हे शिकार करत पुढे शेतीचा शोध लागल्यावर तो त्यांच्यावर उदरनिर्वाह करू लागला

प्राचीन भारतात शिकारी साठी विविध शस्त्रे मानव वापरीत . प्राण्यांचा धावण्याचा वेग व मानवाची स्वतःची क्षमता नुसार तो शिकारीत दीर्घ धावत असे .शिकार करताना तो काही शस्त्रे वापरीत त्यात दगडी कुऱ्हाडी .शिंगापासून बनवलेली हत्यारे, भाले,धनुष्यबाण अशी शस्त्रे तो वापरीत असे .पारंपरिक पद्धतीने धनुष्याची दोरी वनस्पतीच्या तंतूपासून बनवले जात असे तासलेले दगड, प्राण्यांची हाडे किंवा धातूपासून तयार केलेले बाण बनवून त्याचा वापर वेगावर नियंत्रण ठेवून शिकारीसाठी केला जात असे .
राजापूर येथील दगडावर बाण आणि कमानीच्या चिन्हाचे चित्रण हे कदाचित पुरातत्वीय व ऐतिहासिक चित्रण कला आहे. गुहेतील चित्रांमध्ये किंवा दगडी आश्रयस्थानांमध्ये आढळणारी अश्या प्रकारची चिन्हे प्रागैतिहासिक कालखंडापासून ऐतिहासिक काळापर्यत मानवी जीवनातील विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात शिकार, युद्ध आणि कदाचित आध्यात्मिक पद्धतींचा समावेश आहे. विशिष्ट अर्थ कलाकृतीच्या संदर्भावर आणि ती निर्माण करणाऱ्या स्थानिक संस्कृतीवर अवलंबून असतो.

• शिकार आणि युद्ध:
प्राचीन काळी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि युद्धासाठी बाण आणि धनुष्य हे प्रमुख शस्त्र होते. या चिन्हांची उपस्थिती शिकार, लढाई किंवा या क्रियाकलापांचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व दर्शवू शकते.
• प्रतीकात्मक अर्थ:
त्यांच्या व्यावहारिक वापरापलीकडे, बाण आणि कमानी यांचे प्रतीकात्मक अर्थ देखील असू शकतात. उदाहरणार्थ, काही संस्कृतींमध्ये, बाण दिशा, हालचाल किंवा संरक्षण दर्शवू शकतो, तर कमान प्रवेशद्वार, रचना किंवा अगदी खगोलीय घटनेचे प्रतीक असू शकते.
• सांस्कृतिक संदर्भ:
या प्रतीकांचे विशिष्ट अर्थ संस्कृती आणि कालखंडानुसार बदलतात. उदाहरणार्थ, काही संस्कृतींमध्ये, धनुष्यबाण हे आध्यात्मिक पद्धती आणि ज्ञानप्राप्तीशी जोडलेले होते. तसेच राशी, नक्षत्रचिन्ह व खगोलीय अभ्यास शास्त्राचा भाग असू शकते.
• इतर प्रतीकात्मक प्रतिनिधित्व:
बाण आणि कमानी धार्मिक किंवा पौराणिक प्रतीकात्मकता यासारख्या इतर विविध संदर्भांमध्ये तसेच चिन्हे आधुनिक संदर्भांमध्ये आढळू शकतात.

राजापूर जवळील जंगलामध्ये नव्याने शोधलेले बाण आणि धनुष्य यांची प्रतिकृती चितारलेला कातळ महाराष्ट्राच्या पुरातत्वीय आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यांच्या सखोल अभ्यासातून आपल्याला कोकणातील मानवी इतिहासातील जीवनशैली, राहणीमानाचा व सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्वाचा टप्पा अभ्यासता येईल.

© अनिल दुधाणे

Leave a Comment