भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग २

भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग ३, २, 1

भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग २

मागील भागात आपण पुणे व सभोवताल च्या प्रदेशातले प्राचीन संदर्भ पाहिले या पुढे राजकीय पार्श्वभूमी मांडत आहे.भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग २ –

४- याच काळात म्हणजे इ.स ७५८ सालचा राष्ट्रकुट राजा कृष्णराज चा एक ताम्रपट दृष्टिक्षेपात येतो हा कृष्णराज म्हणजे दांतिदुर्ग चा पुतण्या होय याने देखील एक गाव इनाम दिल्याचा दिसते. यात पुण्याचा उल्लेख पुण्यविषय असा येतो तसेच भेसउरी म्हणजेच सध्याचे भोसरी हा सुद्धा उल्लेख मिळतो.

५- राजा कृष्णराज राष्ट्रकुट चा आणखी एक ताम्रपट तळेगाव ढमढेरे येथे सापडला होता. हा  ७६८ मधील ताम्रपट आहे ज्यात राष्ट्रकुट वंशाची कृष्णराज पर्यंतची माहिती दिली आहे तसेच पूनकविषय(पुणे परिसर) मधील काही गावे दान दिली आहेत ज्यामध्ये अलंदिय (आजची आळंदी)तसेच थिउरग्राम अर्थात थेऊर होय.

६- निरा नदीच्या तीरावर वसलेल्या भोर गावात राष्ट्रकुट राजा धारावर्ष ध्रुवराज म्हणजेच कृष्णराज याचा मुलगा इ.स ७८० मधील ताम्रपट मिळतो ज्यात त्याने कऱ्हाड मधील वासुदेवभट्ट यास एक खेडे दान दिले आहे.यातील ‘श्रीमाल विषय ‘ म्हणजे आजचे शिरवळ आहे.

राष्ट्रकूट राजांचे पुणे हे त्यांच्या कडील प्रदेशापैकी  एक मुख्य ठिकाण म्हणावे लागेल कारण अमोघवर्ष च्या कालखंडात पातळेश्वर लेणी चे काम करण्यात आले असे अभ्यासकांचे मत आहे. इ.स ९७३ पर्यंत पुणे व परिसर राष्ट्रकुट राजसत्तेच्या अंमलाखाली होता असे दिसते,कारण पुढे कल्याणी चालुक्यांनी राष्ट्रकुटांची सत्ता उलथवत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित केली.

७-शिरवळ प्राचीन काळातील ( श्रीवलय ) येथे एक घराणे राज्य करीत होते जे कल्याणी चालुक्यांचे मंडलिक होते.भोर मध्ये याच शाखेतील खंब नावाच्या मंडलिक व्यक्तीचा ताम्रपट सापडला आहे,ज्याने देखील विंग(वाई ?)नावाचे गाव दान दिले आहे.

(क्रमशः)

©- इतिहासदर्पण – Aashish Kulkarni
Image credits- mr. Traveler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here