महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,36,506

आग्रा ते बनारस !

Views: 1
5 Min Read

आग्रा ते बनारस !

फार्सी
दर अय्याम की मुहर्रीर सवानी दर बंदर सुरत बूद बन्हा नाम जुनारदार तबीब पेशे नकल मी नमूद की, “चूं दर कौम-ए मा जाबीते अस्त की बराए तहसील-ए इल्म-ए नुजुम व तबाबत व शासतर बरहामनान बी सज़ ओ माये अज दूर व नजदीक ब-बनारस रफ्ते. यकी अज़ बरहमनान औंजा रा उस्ताद-ए खुद करार मी-दहन्द व नज्द-ए ऊ दर्स मी-ख्वानंद. सुबह व शाम अज़ तरफ उस्ताद-ए खूद किनार-ए आब-ए गंगा रफ्ते.(आग्रा ते बनारस)

मवाफीक दाबी की मुकर्रर अस्त मरदमी रा की बराए घुस्ल मी आयंद. ब-दस्तुर व आईन मुकर्ररी खिदमत मी नुमायंद व हर ची अज़ आन ब-हमरसद बिला तसर्रुफ व खियानत नज्द-ए उस्ताद-ए खुद मी बुरंद व खोच खुराकी व पोशाख शागीर्दान बर जिम्मे उस्तादस्त की ब-कदर-ए कफाफ-ए ज़रूर खबर मी गीरंद.

मन बे बनारस रफ्ते मुद्दत सी चहार साल खिदमत यकी अज़ बरहमनान मी-नमुदम व हरचे गुजार दरया ब-दस्तुर दिगरान ब-हम मी-रसानंदम दर खिदमत-ए उस्ताद मी-बुरदम व ऊ बिसयार बे तंगी व सख्ती खबर कुव्वत-ए मन मी-गिरफ्त. ता ऑंकी रोजी की हनुज असर तारीकी बूद गुजार आब दस्तुर हर रोज रफ्तम. शख्सी दस्त मरा गिरफ्ते मुश्ती पर अज़ जवाहर व अशरफी व हून ब-दस्त-ए मन दारद. गुफ्त मुश्त रा वा मी कुन व मरा जुद अज़ लवाज़ीम-ए घुस्ल फारीग़.कुन. मन अज़ खुशवक्ती दर जामे न गुंजीदे. नजर मुजम्मील बरान अंदाख्तम सिवाए जवाहर व अशरफी ब-नजर नियामद व जल्द ब-तराशीदन रीश व घुस्ल दादन ऊ परदाख्तम.

हनुज फारीग़ अज़ खिदमत-ए ऊ न-शुदे बुदम की ग़ौगाए गिरफ्त व गीर व रसीदन गुर्जबरदारान ब-राए सीवा बुलंद गरदीद. ता खबरदार शुदम शख्सी की खिदमत-ए ऊ मी-नमुदम दर तरफ्ती-अल-आईन अज पेश-ए रु व नज़र गायब शुद व दानीस्तम की हमान सीवा बूद व बाज नज़र बर कम्मीयत मबलग़ अन्दाख्तम. नू जिन्नस जवाहर व नू अशरफी व नू हून ब-शूमार आमद व मसलहत दरीन दानीस्तम की दीगर सुरत-ए उस्ताद न दीदम राह-ए वतन इख्तियार नुमाईम व खुद रा बे बंदर सुरत रसानीदम. हवेली मुल्की की दारम अज़ हमान जर अस्त.

मराठी
ज्या दिवसांत हा लेखक (खाफीखान ) सुरतेच्या बंदरात मुक्कामास होता तेव्हा त्याने व्यवसायाने वैद्य असलेल्या “बन्हा” नावाच्या एका ब्राह्मणाकडून पुढील हकीकत ऐकली.

” माझ्या (म्हणजे बन्हाच्या) समाजात अशी प्रथा आहे की गरीब निर्धन ब्राह्मण खगोलविज्ञान, वैद्यकी आणि शास्त्राच्या अध्ययनाकरिता लांबच्या आणि जवळच्या प्रदेशांमधून बनारस येथे येतात. बनारस येथील एखाद्या ब्राह्मणाला गुरु करून ते त्याच्यापाशी शिकतात.
आपल्या गुरुच्या वतीने ते दररोज सकाळी व संध्याकाळी गंगेच्या काठावर जातात आणि रिती रिवाजानुसार तिथे स्नानासाठी येणाऱ्या लोकांची सेवा ते करतात. यात्रेकरू जे देतील ते, कुठलीही लपवाछपवी किंवा लबाडी न करता आपल्या गुरुला ते आणून देतात. आपल्या शिष्यांना कपडेलत्ते आणि जेवणखाण पुरवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते व ते शिष्यांना जरुरी पुरते अन्न-वस्त्र पुरवतात.

मी देखील (म्हणजे बन्हा) बनारस येथे जाऊन तीन-चार वर्षे एका ब्राह्मणाची सेवा केली होती. ज्याप्रमाणे इतर शिष्यगण नदीच्या तिरावर जे मिळेल ते आपल्या गुरुला नेऊन देत असत, त्याप्रमाणे मी देखील मला मिळेल ते माझ्या गुरुला नेऊन देत असे. परंतु माझा गुरु अत्यंत कठोर आणि कंजूष होता व तो मला पुरेसे अन्न देत नसे.

अखेर एके दिवशी अजून उजाडायचे असताना, रोजच्या प्रमाणे मी गंगेच्या तीरावर गेलो तेव्हा एका माणसाने माझा हात पकडला आणि माझ्या मुठीत काही हिरे, मोहरा आणि होन कोंबून त्याने माझी मुठ बंद केली आणि म्हणाला,
“तुझी मुठ आता उघडु नकोस ! आणि मला पटकन स्नानाचे रितीरिवाज सांग !”
माझा आनंद गगनात मावेना ! कारण मी माझ्या बंद मुठीवर एक नजर फेकली तेव्हा मला हिरे, मोहरा व होनांशिवाय अन्य काही दिसत नव्हते ! मी घाईघाईने त्याची श्मश्र्रु (दाढी) करुन त्याला स्नानाचे रितिरिवाज सांगतोय न सांगतोय तोच शिवाला पकडण्यासाठी आलेल्या शाही गुर्जबरदारांचा, “पकडा ! अटक करा !” असा गलका ऐकू आला.

काय घडतंय हे कळण्याच्या आत माझ्या समोर उभा असलेला माझा यजमान, माझ्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तिथून अदृश्य झाला !
मला लक्षात आलं की तो दुसरा-तिसरा कोणी नसून दस्तुरखुद्द ‘शिवा’ च (छत्रपती शिवाजी महाराज) होता !

त्यानंतर मी त्याने मला दिलेली दक्षिणा पाहिली. त्यात नऊ हिरे, नऊ मोहरा आणि नऊ होन होते ! हे सगळं आपल्या गुरुला दाखवण्याऐवजी आपल्या घराचा रस्ता धरण्यातच शहाणपण आहे हे मला कळून चुकले, त्यामुळे मी तडक सुरतेला आलो. आत्ता मी ज्या हवेलीत राहतो ती शिवाने (छत्रपती शिवाजी महाराज) दिलेल्या दक्षिणेतूनच मी बांधली !”

~ मुन्तखबुल्लुबाब, खाफीखान, खंड २, फार्सी पृ. २१९-२०

फार्सी वाचन आणि अनुवाद
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे

Leave a Comment