महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,50,272

अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध लढलेल्या दोन अनामिक मराठा स्त्रिया

Views: 1
2 Min Read

अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध लढलेल्या दोन अनामिक मराठा स्त्रिया –

थोर इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी “इसामीचे फारसी महाकाव्य” या लेखात इसामीने वर्णन केलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरीवरील स्वारीच्या काही भागाचे भाषांतर दिले आहे. त्यातील रंजक भाग पुढील प्रमाणे:-

अल्लाउद्दीन खिलजीचे सैन्य लाजूऱ्याचा घाट ओलांडून आले. तेथे कान्हा नावाचा यादवांचा सरदार होता. त्याने तुर्कांनी फेकलेले बाण घेऊन रामदेवाकडे प्रयाण केले आणि त्याला म्हटले की, “तुर्कांची फौज लाजूऱ्याचा घाट ओलांडून जाताना दिसली. हे पहा त्यांनी फेकलेले बाण” असे म्हणून त्याने ते बाण रामदेवरावाला दाखवले. पण त्यावर विश्वास न ठेवता रामदेवरावाने त्याची टिंगल उडवली.

ते पाहून कान्हा तेथून निघाला आणि लाजूऱ्याजवळ त्याने तुर्कांची गाठ घेतली. तेथील लढाईत , कान्हाच्या सैन्यात दोन स्त्रिया होत्या, त्यांनी अप्रतिम शौर्य गाजवून तुर्कांना चकित केले. ” परंतु शेवटी कान्हाचा पराभव झाला आणि महाराष्ट्र गुलामगिरीत पडला !

इसामीच्या मूळ फार्सी काव्यात त्या दोन स्त्रियांच्या पराक्रमाचा उल्लेख पुढील शब्दांत आला आहे:-
फार्सी – “शुनीदम दो औरत दरान रोज़गार-इ फौज चुस्त बुदंद दर कारज़ार शुनीदन्द चूं तुर्क ब-गुजाश्त हद !”
मराठी – (कान्हाच्या) फौजेतल्या त्या दोन चपळ लढवय्या स्त्रियांचा पराक्रम पाहून तुर्क आश्चर्यचकित झाले !

पुढे इसामी लिहितो, या दोन बायकांचा पराक्रम ऐकून अल्लाउद्दीन खिलजी आपल्या सैन्याला म्हणाला –

*फार्सी*
बे मुल्की की हिंदू ज़नान न-ताबंद अज़ पेश-इ शेर-इ-अफगनान ची दानीम की मर्दान-इ इन खुश दियार ची बाज़ंद बर मा की कारज़ार

*मराठी*
ज्या मुलुखातल्या हिंदू स्त्रियांपुढे अफगाण सिंह तेजोहीन होतात
त्या मुलुखातले पुरुष रणांगणात आपलं काय करतील हे मी कसं सांगू ?

~ फुतुह उस सलातीन, इसामी, पृ.२३२

सत्येन सुभाष वेलणकर
पुण

Leave a Comment