महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 92,23,853

राजश्री जयाजीराव शिंदे | मराठे दौलतीचे स्तंभ

Views: 1461
3 Min Read

मराठे दौलतीचे स्तंभ | सरदार राजश्री जयाजीराव शिंदे –

।।श्री।।
श १६७३ जेयष्ठ शु ९
ता २२-५-१७५१

राजश्री जयाजी शिंदे गोसावी यांसि

छ.  अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य  स्नो। बाळाजी बाजीराव प्रधान  आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित असिलें पाहिजे विशेष तुम्ही जयनगरहुन निघालियावर एक पत्र आले त्या आलीक पत्र येऊन वर्तमान कळत नाही तुमची  व नवाब वजीर यांची भेट जाली,  यमुना पार होऊन कादरगजा जवळ दहा हजार पठाण सरदार सुध्दा बुडविला,  तेंही वर्तमान परभारेच येऊन पोचले तदोत्तर  अहमदखा पठाण बगास प्रयागास आसरा करून होता तो उठऊन फरोखाबादेस येऊन लढाईस नमूद जाहाला अहमदखा बगशानी  फरोकाबाद सोडून गंगातीरास बेहडा अडचण जागा पाहून आराबा रचून त्याची तुमची नित्य लढाई होऊ लागली तथापि वर्तमान लिहिले नाही याजवरून अपूर्वता आश्चर्य वाटले प्रस्तुत राजश्रा दामोदर महादेव याचे पत्र छ ७ जमादिलाखरचे छ  ७५रजबी  येऊन पावले की,

“अहमदखा बगस बाहादुरखा रोहिल्यास शरण जाऊन त्यास दहा बारा हजार स्वार व प्यादे यांजसी कुमकेस आणिले सरदाराची फौज व जाटाची फौज व नवाब  वजीराची फौज गंगापर होऊन छ३ जमादिलाखरी लढाई जाली बाहादूरखा  रोहिला बुडविला हजारो  घोडी घेतला हत्ता पाडाव  केले हे  वर्तमान बगसानी ऐकुन घाबरा जाला दुसरे दिवशी पळुन गंगापर गेला लष्कराच्या लोकांनो घोडी पाडाव फार आणली तोफखाना पाडाव केला “म्हणोन लिहिले ते श्रवण होऊन संतोषाच्या  कोटी जाहाला शाबास तुमच्या हिमतीची व दिलरी- रूस्तुमीची व शाबास लोकाची। आमच्या दक्षिणच्या फौजांनी यमुना गंगा पार होऊन रोहिले पठाणांसी युध्द करून आपण फत्ते पावावे हे कर्म लहान सामान्य न जाले।  तुम्ही एकनिष्ठ, कृतकर्मै सेवक या दौलतीचे स्तब आहा  ।।जे चित्तावर धरिता ते घडून येतात पहिली यशावह कर्मे सपादिलीत ततोअधिक हे यश सपादिलेंत या यशास जोडास नाही। परंतु केल्या मनसुबियाचा अर्थ किमपि लिहीत नाही ऐसे नसावे  सर्वदा आपले कुशल वृत्त लिहीत जाणें तेणें करून संतोष होत जाईल मोठा मनसबा कठीण होता इरान +तुरान पावेतो  लौकीक जाला की,  वजीर मोडला,  पळाला असता फिरोन फत्तेच्या मनसदीवर बसविला याजहुन यश कोणते अधिक आहे  “या उपरि तेथील रग भरून स्वकार्य साधून,  आपले मुलुखांत येणे योग्य आहे छ७रजब बहुत काय लिहिणे

लेखनसीमा

शिक्का

बाजीराव प्रधान

मराठ्यांच्या।   इतिहासातील हे महत्त्वाचे पत्र आहे   कारण प्रधानांनी  अंत्यत कमी शब्दांत  जयाजीराव शिंदे व मराठे फौजांनी यमुना च्या  पलीकडे मिळविले विजय  म्हणजे एक असामान्य  व अवघड गोष्ट आहे हे  याठिकाणी  दिसून येत  पण सरदार राजश्री जयाजीराव शिंदे  यांनी यमुना व गंगा नदीच्या पलीकडे जाऊन दिल्लीतील वजीर व बनारसाची नवाब, अहमदखा पठाण बंगश,  रोहिला म्हणजे नजीबखान  यांची पराभव केला ……….

वरील तिन्ही सरदार हे तत्कालीन कालखंडात  अहमदशहा अब्दुल शी संधान बांधून आहे त म्हणून या विजयामुळे  जयाजीराव  शिंदे यांची पराक्रमीची किर्ती इरान व तुर्कीस्तान  पर्यत  झाले  असे  प्रधान लिहितात  मराठ्यांच्या इतिहासातील यांची नोंदी खूप महत्त्वाचे आहे  हे स्पष्ट होत संतोषाच्या कोटी जाहाला  हे शब्द विशेषतः जयाजीराव शिंदे यांच्या मुत्सद्देगिरी व पराक्रमाची  श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे.

संतोष झिपरे

Leave a Comment