अपरिचित इतिहासआम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाचीइतिहास

आवर्जून वाचावे असे काही

आवर्जून वाचावे असे काही

पानिपत झाले मराठे पडले आणि मराठा स्वराज्याला उतरती कळा सुरु झाली आणि मग तिथून पुढे इंग्रजांचे अंमल भारतावर चालू झाले, मुळात पानिपतानंतरच मराठ्यांनी जी गरुड भरारी घेतली त्याला इतिहासात तोड नाही.,

हिंदुस्थानचा पाटील म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या अलिजाबहाद्दर महादजी शिंदे यांच्या जीवावर मराठा स्वराज्याची गरुड भरारी म्हणायला हरकत नाही.

१७८४च्या ऑक्टोबर महिन्यात, ग्वाल्हेरहून आग्रा येथे महादजी शिंदे आले, तेव्हा मोगल सरदार अफरासियाबखान याने त्यांचे वीरोचीत स्वागत केले. पण हे मुह्हमद बेग हमदानी या मोगल अधिकाऱ्यास आजीबात सहन झाले नाही. त्याने अफरासियाब खान याची ३ नोव्हेंबर रोजी हत्या घडवून आणली. यामुळे मराठे सावध झाले शिंद्यांचा सरदार अम्बुजी इंगळे यांनी हमदानीवर आक्रमण केले. व त्याला पकडून आग्र्याचा किल्ल्यात अतिशय कडक बंदोबस्तात कैदेत डांबले.

महादजीच्या आग्रा आगमनाचे वृत्त कळताच, मोगल सम्राट शहाआलं खुद्द जातीने दिल्लीहून आग्रा येथे आला. शहाआलम आणि महादजी यांची फत्तेपूर सिक्री येथे १४ नोव्हेंबर १७८४ आतिशय थाटात भेट झाली. यावेळी महादजी यांनी १२१ सुवर्ण मोहरा शहाआलम यास नजर केल्या काही दिवसांनी शहा आलम आणि महादजी शिंदे राजधानी दिल्ली वापस आले बादशहाणे महादजीला वकील-इ-मुतालिक (साम्राज्याचा सर्व श्रेष्ठ प्रशासकीय अधिकारी) या पदावर नेमले..

आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा डौलाने फडकू लागला मार्च २६ १७८५ पासून डिसेंबर १८०३ पर्यंत दिल्ली – आग्रा हा प्रदेश शिंद्यांच्याच आमला खाली आला.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close