काळकाई खिंडीतील सरनोबत जावजी लाड़ स्मारक

काळकाई खिंडीतील सरनोबत जावजी लाड़ स्मारक

१० जानेवारी १७३३.छत्रपती शाहूराजांचे सैन्य, पेशवे बाजीराव सैन्य आणि चिमाजी आप्पाचे सैन्य यांनी संयुक्तपणे किल्ले रायगडास घेरा घालून बसलेल्या शिद्दी अंबर अफवाणी बरोबर रायगडवाड़ी येथे युद्ध मांडले. त्या युद्धात मराठ्यांची सरशी होत आहे. हे किल्ले रायगड वरून सोमवंशी क्षत्रिय कुलोत्पन्न सोमवंशी क्षत्रिय कुळ भूषण किल्ले रायगडचा सरनोबत जावजी लाड़ याने पाहिले.

आणि किल्ले रायगड महादरवाजालगतच्या बुरुजांवरील भांड़ीयांतू आग ओकून. किल्ले रायगडाच्या महादरवाजाशी लगट करू पाहणाऱ्या शिद्दी अंबरच्या शिदद्यांस जाळून भाजून काढले. किल्ले रायगडचा महादरवाजा करकरत आसमंतात गरजला आणि त्या दरवाजातून रणभैरव सरनोबत जावजी लाड़ आपल्या सैन्यासह विरश्रीच्या आवेशांत किल्ले रायगडच्या मदारेवरील सिद्दीच्या चौकीवर झेपावला.

ती शिद्दीची चौकी त्याने उधळून लावली. शिद्दीचे लोक वाळुसुरे खिंड़ीकड़े पळू . रणझुंजार जावजी लाड़ त्यांच्या पाठलागावर निघाला. त्यांच्या पाठी पहात वाळुसुरे खिंड उतरला. पाचाड़कड़े मराठ्यांनी रण मांडलेले पाहून शिद्दीचे पळपुटे काळकाई खिंड़ीकड़े वळले. रणनवरा जावजी लाड़ काळकाई खिंडीकड़े वळला आणि घात झाला.

काळकाई खिंडीतील शिद्दी च्या चौकीची कुमक पळून आलेल्या शिदद्यानां मिळाली आणि त्यानी एकत्रितपणे उलटून झुंज दिली किल्ले रायगडचा वीर अभिमन्यू जावजी लाड़ शिद्दीच्या चक्रव्यूहात सापडला आणि आणि या युध्दांत किल्ले रायगडचा सरनोबत जावजी लाड़ शामलाच्या हस्ते मारला गेला.

असे पेशवे दप्तर ३३ मधील लेख क्रमांक १६८ सांगतो . हनुमानोड़्ड़ाण करणाऱ्या सरनोबत जावजी लाड़ याची प्रतिमा आहे. त्या शिळेवर अंगभूत पणती आहे. पण सांप्रत त्यात तेल -वात करण्यास मराठी हात नाहीत. वाळुसुरे गावांत लाड़ आहेत. असे म्हणतात. शिवरायांच्या पायदळांतील हजारी सरदारांच्या नामावळीत विठोजी लाड़ उल्लेखित आहे.

वाहतुकीची -शेतीची जनावरे घोड़े -बैल यांची क्रयविक्रय करणाऱ्या माणसाला लाड़ ही संज्ञा आहे. लाड़ ही विशिष्ट जात नाही तर तो एक पेशा आहे. म्हणूनच सावस्वत, मराठा वाणी सोनार सोमवंशी क्षत्रिय जातीत लाड़ हे उपनाम आढळते. वाळुसुरे गावांतील लाड़ सोमवंशी क्षत्रिय आहेत, असे म्हणतात.

 

!! ऐतिहासिक वारसा समुह !!

सह्याद्री वेड़ा… स्वप्निल गाडेकर

ना नावासाठी ना प्रसिद्धीसाठी आम्ही तड़फड़ करतोय फक्त गड़कोट व ईतिहास जगवण्यासाठी


Website आणि Discover Maharashtra App चा मुख्य हेतू मराठी भाषेत महाराष्ट्राविषयी अज्ञात आणि ज्ञात माहिती व इतिहास प्रदान करणे हा आहे. सर्व सामग्री आणि प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती किंवा प्रतिमा आणि आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, कृपया [email protected] या इमेल वर आम्हाला संपर्क साधा आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here