वाळसुरे खिंड अन खिडींतील भुयार अन सरनोबत जावजी लाड स्मारक

वाळसुरे खिंड अन खिडींतील भुयार अन सरनोबत जावजी लाड स्मारक

खुबलढा लढा बुरूज त्याच्या डाव्या हातास लगट करणारे नामशेष झालेला चित्त दरवाजा पाहुन झाला की .
तसेच पुढे चलावे .
रायरीच्या डोगंराकडे आत्ता सरकत असताना पायाखाली सपाटी लागते अन आपल्या उजव्या हातास एक सुटा डोंगर लगट करत राहतो.

पुढे जिथे ती सपाटी संपते अन पुढे छातीवर येणारा रायरीचा डोंगर येतो .
वर डोईवर हिरकणी कडा आ वासुन भिती दाखवतो तिथेच उजवीकडे रायरीच्या डोगंरास चिरफाकळ्या करत एक खिंड खोलवर 2 ते 3 मैल अंतरावर वाळसुरे गावाकडे पळत गेली आहे .
तिच हि “वाळसुरे खिंड ”
शिवराज्याभिषेक समयाच्या आगोदर प्रतापगडाच्या भवानी देवीस सोन्याचं छत्र अर्पण करण्यास शिवराय येथुनच प्रतापगडाकडे गेले होते असा कागदोपत्री उल्लेख आढळतो .
साप्रंतसमयी ती वाळसुरे खिंडीतील अनघड वाट प्रतापगडाकडे जाणारी वाट होती.
त्या खिंडीत एखादा दरवाजावजा बंदोबस्ताची चौकी नक्कीच असेल .
आजही वाळसुरे अन हिरकणीवाडीतील ग्रामस्थ ह्याच खिडींतुन रायगडातुन खाली मार्गस्थ होतात .

वाळसुरे खिडींतील उजव्या डोगंराच्या पश्चिमेला पायरीमार्गाच्या विरूद्ध दिशेला एक अपरचित नैसर्गिक भुयार आहे.

11 जुन 1988 ला मुंबईच्या श्री. नरेंद्र जाधव ह्यांचा नेतृत्वाखाली ” द नेचर लव्हर्स मालाड मुबंई ” च्या काही धाडसी गिर्यारोहकांनी हे 50 मीटर खोलीचे गाळाने भरलेल्या भुयाराचा शोध लावला.
ह्याच वाळसुरे खिडींतील मार्गावर छुपी नजर ठेवण्यासाठी ह्या भुयाराचा वापर होत असावा.

काळकाई खिडींतील सरनोबत जावजी लाड स्मारक

10 जानेवारी 1733 ला छ. शाहु महाराज , थोरले बाजीरावअन चिमाजीआप्पांनी एकत्रितपणे रायगडवाडी मटकावुन बसलेल्या सिद्दी अंबर अफवानी विरूद्ध युध्द मांडले.
तेव्हा महादरवाजावर लगट करणा-या सिद्दीस जावजी लाडने तोफानीं भाजुन काढले .
व मदार मोर्चाही ताब्यात घेतला .आपला जीव मुठीत घेऊन वाळसुरे खिंडमार्फत पळणा-या सिद्दीस जावजी लाडने गाठले .
मोठे रणताडंव झाले . मात्र पुढुन काळकाई खिडींतुन मराठ्यांकडुन सपाटुन मार खाल्लेल्या सिद्दीचे सैन्य अन मंदार मराठीतून पाळुन गेलेले सिद्दीचे सैन्य ह्यांच्या कात्रीत ते सरनोबत जावजी लाड सापडले .
जावजी लाड अभिमन्युसम लढले परंतु ते अखेर रणी पडले.
( संदर्भ – पेशवे दफ्तर लेख क्रमांक. 168)
आज काळकाई खिडींत एका औरसचौरस घडीव शिळेवर ढाल हात घेऊनी हनुमानऊड्डान करणारी सरनोबत जावजी लाडची प्रतिमा आहे .
परंतु त्या शिळेची पुजा करणारे आज कुणी ईतिहासभक्त दिसतंच नाहीत.

खिडींपुढे वर डोईवर हिरकणी कडा भिती दाखवतोय.
त्याच कड्याखाली आमचे रायगडबंधु श्री . संतोषराव काशिद ह्यानीं आपल्या चक्षुनीं कड्यांत निसर्गनिर्मित रायगडवरील 06 वा हनुमान पाहिला होता.
डावीकडे रायगडवाडी कडे गोदावरीचे वृदांवन लक्ष वेधुन घेते त्या वाळसुरे खिडींतच औकीरकरांचे एक नारळ झावळी पोतडे अथंरलेले एक छप्परवजा हाॅटेल ??
( अतिथीगृह ) आहे .
चार दोन थंड पाण्याचे पेले पोटात रिचवा .
अन दोन क्षण विश्रांती घेत गडे हो पुढे चला .

सह्याद्रीवेडा सतिश शिंदे.


Website आणि Discover Maharashtra App चा मुख्य हेतू मराठी भाषेत महाराष्ट्राविषयी अज्ञात आणि ज्ञात माहिती व इतिहास प्रदान करणे हा आहे. सर्व सामग्री आणि प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती किंवा प्रतिमा आणि आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, कृपया [email protected] या इमेल वर आम्हाला संपर्क साधा आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here