गड किल्ले संवर्धन मोहिमामहाराष्ट्राचे वैभव

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

आज काल जपतोय जो तो आपल हीत,
झालाय बघ तुझ्यातल्या क्षात्रतेजातला अस्त।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

गनिम आजही फारतायेत घेऊन रुप मस्त,
उभ्या स्वराज्याला संपवायला घालतायेत गस्त,

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

घडाया लागली नव नविन गड्या अपरित गोष्ट,
गड राजधानीचा घेतोय श्वास शेवटचा होईल आता अस्त।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

ऊठ चल ऊठ आहेत अजुनही मावळे शिवबाच्या एकनिष्ठ
जागव पुन्हा एकदा रायगडा घेऊन बघ एकदा कष्ट,

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

चंद्र कोर,भगवा गंध लावुन काही जण
करतायेत बघ संस्कृती स्वराज्याची फस्त।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

शिवबा माहीत गड्या अनेकांना पण जपले त्यांनी जे कील्ले,
आज त्याच गडांवर स्वयंघोषित मावळे दारु  पिऊन होतायेत मदमस्त।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

येतील पुन्हा फीरंगि,बारा टोपिकर करण्या तुझ्या मातृभुमीवर ताबा,
घालुन ठेवलेयत रे कोट हे गडकोट उगवत्या सुर्यास्ता।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

केला होता प्रण सह्याद्रीच्या सह्य राजे शिवबा व राजे संभाजींनी अखंड स्वराज्याचा,
होतायेत तुकडे स्वराजाचे तु नकोस नादी लागु गड्या फीतुरांच्या खाऊ नकोस त्यांच उष्ट।

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

आपल्या राजानी दिलाय भगवा हातात जप त्याला,
ज्याच्यासाठी अनेक जीवांचा झालाय रे अस्त
तु ही इतरांसारखा होऊ नकोस भ्रष्ट….!!!!

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

आले उरावरी कीती ते अनेक सुलताने ऐ आलमगिर
पण भेटले त्यांना याच भुमित दोन हात करणारे वीर
जागव तु तोच वारसा कर क्षात्रतेजाचा तु पुरस्कार,
नाहीतर होईल डोळ्यासमोर शिवबाचे राज्य नष्ट…!!

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

होतायेत बलात्कार या स्वराज्यात हेच का तुझ्या स्वराज्यातील सुख स्वास्थ,
असे कसे जन्मले या भगव्या आभाळी षंढ,
आरे केला शिवबाने चौरंग रांझ्याच्या पाटलाचा
केली होती आई-बहीणीची आब्रु भ्रष्ट……!!!

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

कुणी विदर्भ मागतोय वेगळा कुणी बेळगाव सिमाभाग म्हणतोय आपुला,
आता उठ गड्या जागव तुझ्यातले सळसळते रक्त….
राजकारणी करतायेत यावरच राजकारण करुन जनतेला भ्रमिष्ट……!!!

आरे उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

सांगुन गेले शिवराय मारली गेली जरी गर्दन तरी होऊ नको बेईमान भगव्याला,
पण,त्यांच्याच रक्ताचे पाईक सरसावलेत आज करण्या
स्वराज्य नष्ट….!!!

आरे उठ की गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र।

लेखन-नवनाथ आहेर
(चुकभुल देणे घेणे)
धन्यवाद….!!
जय शिवराय……!!

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close