Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # Discover Maharashtra: महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राचे वैभव, इतिहास, घराण्यांचा इतिहास, स्वराज्याचे शिलेदार, अपरिचित मावळे, महाराष्ट्राचे शिल्पकार, यशोगाथा, जीवनचरित्र, महाराष्ट्रातील संत, प्रवासवर्णन, गडकिल्ले, लेण्या गुहे, धबधबे, अभयारण्ये, समुद्रकिनारा, तलाव, मंदिरे/तीर्थक्षेत्रे, नदी, साहित्य, पारंपरिक गाणी, गावची जत्रा, ग्रामदेवता, पुस्तक परिचय, नाटक, पारंपरिक प्रथा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, दागदागिने, छायाचित्र, इतर लेख. आणि बरंच काही जगाला दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. - अजिंक्य महादेव निंबाळकर ## Sitemaps [XML Sitemap](https://www.discovermh.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [शिवजन्माच्या नोंदी](https://www.discovermh.com/records-of-shivaji-maharaj-birth/): १९ फेब्रुवारी १६३० शुक्रवार , शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया शिवनेरी गडावर स्वराज्याच्या सूर्य उगवला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाच्या नोंदी अनेक समकालीन व उत्तरकालीन साधनांमध्ये आढळून येतात . सदर शिवजन्माच्या नोंदी लेखात निरनिराळ्या साधनांचे लेखनवर्ष व त्या साधनांत आढळून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म नोंदी व त्यातील त्रुटी यांचा उल्लेख करण्यात आला आहे . कालगणनेनुसार शके १५४९ रोजी प्रभव संवत्सर , वैशाख शुक्ल १ रोजी शुक्रवार , वैशाख शुक्ल २ रोजी शनीवार , वैशाख शुक्ल ५ रोजी मंगळवार , वैशाख शुक्ल २ रोजी भरणी नक्षत्र होते . खालील निरनिराळ्या साधनांत ह्याबाबत चुकीच्या नोंदी आढळून येतात . सदर शिवजन्माच्या नोंदी लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाच्या नोंदी व त्यातील त्रुटी या विषयापुरताच मर्यादित आहे. - [छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ](https://www.discovermh.com/shivaji-maharaj-garad-with-meaning/): शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. सनई चौघडे वाजले. नगारे, नौबती वाजल्या. तोफा झडल्या. इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी पुढे सरसावले आणि छत्रपती शिवरायांची गारद देण्यात आली. - [कसे दिसायचे शिवाजी महाराज?](https://www.discovermh.com/shivaji-maharaj-look/): छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. जशी परकीयांना शिवाजी महाराज यांनी भुरळ घातली होती तशी आजच्या तरुणाईला देखील घातली आहे. इंटरनेट मुळे आज सर्वत्र हे घ्या शिवाजी महाराज यांच ओरिजिनल चित्र, किंवा हा बघा शिवाजी महाराज यांच लंडन येथील चित्र अशे आशयाचे हजारो message फिरत राहतात. पंरतु नक्की शिवाजी महाराज दिसत कसे होते? समकालीन लोकांनी काही नोंदवून ठेवले आहे का? शिवाजी महाराज यांचे चित्र उपलब्ध आहे का? अश्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. - [शिवाजी महाराजांचे ५ मास्टरस्ट्रोक](https://www.discovermh.com/5-masterstrokes-of-shivaji-maharaj/): History of the marathas च्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. पूल नेहमी म्हणायचे की 'शिवाजी महाराजकी' असं म्हटल्यावर जो 'आपसूकच 'जय' म्हणतो ना तो खरा मराठी माणूस. पण शिवाजी महाराजकीच फक्त जय का? काय वेगळं होत शिवाजी महाराजांमध्ये आणि बाकीच्या राजा किंवा बादशाहांमध्ये? ते मराठी आणि आपणही मराठी फक्त म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आणि आत्मीयता वाटते का? - [श्री शिवशंभू प्रतिष्ठाण](https://www.discovermh.com/shri-shivshambhu-pratishthan/): श्री शिवशंभू प्रतिष्ठाण ही केवळ एक संस्था नाही, तर हिंदू धर्म, स्वराज्य आणि मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या शिवभक्तांची एक अखंड चळवळ आहे. - [भारतीय हत्ती आणि सांस्कृतिक महत्व](https://www.discovermh.com/the-indian-elephant-and-its-cultural-significance/): हत्ती हा प्राणी भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. जैन,हिंदू आणि बौद्ध या भारतीय धर्मियांमध्ये हत्तीबद्दल अपार श्रद्धा आहे. इंद्र ही देवता ऐरावत नावाच्या हत्तीवर स्वार असते असे मानलं जात.हत्ती पर्जन्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात पावसाच्या हादगा या राशीला हत्ती हे वाहन असते. जो पाऊस हत्तीसारखाच प्रचंड प्रमाणात पडतो अशी जन मनात भावना आहे. - [हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा देदीप्यमान वारसा](https://www.discovermh.com/hyderabad-muktisangram/): १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांनांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली.मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर संस्थान आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. - [श्री गणपतेश्वर मंदिर, पुणे | उमामहेश्वर](https://www.discovermh.com/umamaheshwar-temple-pune/): शुक्रवार पेठेतील प्रसिद्ध राजा केळकर संग्रहालयाच्या समोर एक प्राचीन मंदिर आहे. सध्या हे मंदिर उमामहेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. पण याचे मूळ नाव श्री गणपतेश्वर मंदिर होय. काही वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोधार झाला आणि त्याला सध्याचे भव्य रूप प्राप्त झाले. त्या पूर्वी हे देऊळ फारसं भव्यही नव्हत आणि प्रसिद्धही नव्हत. पण या देवळाला ऐतिहसिक महत्त्व तर आहेच, पण ते एका प्रचंड बागेची आठवणही जपत आहे. - [नाणेघाटातील हरवलेले ऐतिहासिक पुतळे](https://www.discovermh.com/lost-historical-statues-of-naneghat/): हे तुटलेले पुतळे केवळ दगड नसून, महाराष्ट्राच्या एका अत्यंत वैभवशाली इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. - [गिरवी येथील शाळीग्रामचा मनोहर गोपाळकृष्ण](https://www.discovermh.com/gopalkrishna-temple-girvi/): सर्वात महत्वाचे म्हणजे गोपाळकृष्ण हे शिवपिंडीच्या साळुंखे वर विराजमान आहेत. अशा रीतीने ही मूर्ती हरिहर प्रतिकच आहे आणि यामुळेच समोरील छोट्या मंदिरात गरुड आणि नंदी दोन्हीही विराजमान आहेत. या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन आपण मंदिरास प्रदक्षिणा घालताना बाजूस आपण ओसरी पहातो आणि मंदिराच्या मागच्या बाजूस तळघरात जाणारा छोटासा दरवाजा दृष्टीस पडतो. दाराशेजारी सुंदर हनुमान मूर्ती भिंतीवर कोरलेली दिसते. दरवाज्यातून काही पायऱ्या उतरून आपण मंदिराच्या गर्भगृहाखाली पोहोचतो जेथे बाबुराव महाराज यांची समाधी आणि छायाचित्र याचे दर्शन होते. समोरच एक शिवलिंग स्थापित केलेले आहे. - [वैशाखरे: एका प्राचीन व्यापारी पडावाचा सुवर्णइतिहास](https://www.discovermh.com/vaishakhare/): सह्याद्रीच्या कुशीत, नाणेघाटाच्या पायथ्याशी वसलेले 'वैशाखरे' (सध्याचे मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा) हे आज जरी एक सामान्य आणि शांत गाव वाटत असले, तरी दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी हे गाव महाराष्ट्रातील अर्थकारणाचे आणि व्यापाराचे एक अत्यंत गजबजलेले केंद्र होते. इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स.च्या तिसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सातवाहन काळात या गावाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक सुवर्णकाळ अनुभवला आहे. - [अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध लढलेल्या दोन अनामिक मराठा स्त्रिया](https://www.discovermh.com/two-anonymous-maratha-women/): थोर इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी "इसामीचे फारसी महाकाव्य" या लेखात इसामीने वर्णन केलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरीवरील स्वारीच्या काही भागाचे भाषांतर दिले आहे. त्यातील रंजक भाग पुढील प्रमाणे:- - [निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेच्या कुशीतील उनकेश्वर](https://www.discovermh.com/unkeshwar-shiva-mandir/): किनवटच्या रस्त्याला एक वेगळीच सवय आहे… तो तुम्हाला सरळ गंतव्यापर्यंत पोहोचवत नाही; आधी थोडं मनाशी बोलायला लावतो. उनकेश्वर शिवमंदिरच्या दर्शनाला जाताना सारखनीहून मांडवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पळसाच्या झाडांनी आजूबाजूचं माळरान अक्षरशः केशरी करून टाकलेलं दिसलं. जणू निसर्गाने शांतपणे रंगांची उधळण केली आहे. दूरवर पसरलेली ती भगवी छटा डोळ्यांना सुखावणारी आणि मनाला प्रसन्न करणारी वाटत होती. - [धाराशिव जिल्ह्यातला भुईकोट किल्ला परंडा](https://www.discovermh.com/paranda-fort/): धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहिल्यानगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत. प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी या सर्वांचा नाश करणाऱ्या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो. त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स.११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे... - [शिवरायांचे आरमार : डच साधनांमधला तपशील](https://www.discovermh.com/shivajis-army/): यंदाची २०२६ ची शिवजयंती ३९६ वी आहे. अर्थात चारशेव्या शिवजयंतीला फक्त चार वर्षे उरलीत. शिवकाळानंतर इतकी अफाट स्थित्यंतरे होऊन आलेल्या सद्यकाळात आपण शिवचरित्राकडे कसे पाहणार आहोत, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. याचे एकच एक उत्तर नाही. राजकीय अजेंडे काय, पक्षपरत्वे आणि सोयीपरत्वे बदलत राहतात. मात्र अजेंडा अर्थात दृष्टी कोणत्याही प्रकारची असली तरी काही मूलभूत तथ्ये महत्त्वाची आहेत, ती कधीही विसरता कामा नयेत. तीनेक वर्षांपूर्वी मी शिवजयंतीनिमित्त दै. लोकसत्तेत एक लेख लिहिला होता. त्यात हाच विषय मांडला होता की शिवछत्रपती त्यांच्या हयातीतच ग्लोबल झाले होते, हे आपण मुलांना कधी शिकवणार ? लंडन गॅझेटसारख्या तत्कालीन वृत्तपत्रातला उल्लेख असो, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नोंदी असोत, या गोष्टींचे महत्त्व स्वयंस्पष्ट आहे आणि सध्याच्या ग्लोबल युगात इतर कशापेक्षाही यांना अधोरेखित करण्याची गरज आहे. आजही माझे याविषयीचे मत आजिबात बदललेले नाही. पण गेल्या वर्षभरात डच साधनांमधला एक नवा तपशील हाती आला, ज्यामुळे आरमाराचा आणि एकूणच स्वराज्याचा दरारा किती दूरवर पसरला होता, याची जोरकस प्रचीती येईल. - [खाफीखानाचा सर्जा](https://www.discovermh.com/the-head-of-the-khafikhan/): ~मुन्तखबुल्लुबाब, खाफीखान, फार्सी, पृ. २२२-२३ - [अहिल्याबाई होळकर अन्नछत्र (धर्मशाळा), लोणार](https://www.discovermh.com/ahilyabai-holkar-dharamshala-lonar/): सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतभर लोककल्याणकारी कार्य फक्त अहिल्याबाईनीच केली. अहिल्याबाई चे राज्य कालौघात नष्ट झाले परंतु त्यांनी भारतात ऊभे केलेले धर्माचे राज्य आजही त्यांच्या कार्य रूपाने टिकून आहे. हिंदू धर्मशास्त्रात तिर्थयात्रा करणे हे महत्त्वाचे काम मानले जाते. त्या काळात प्रवासाची साधने मर्यादित होती. राजे,संस्थानिक, धनिक, मध्यम वर्गीय व सामान्य आपआपल्या परीने तिर्थयात्रा करीत असत. धर्मशाळा दान, एक काम्य दान, प्रवासी लोकाचा प्रवास सुखावह व्हावा यासाठी धर्मशाळा बांधुन व आवश्यक त्या सोयी ऊपलब्ध करून ती धर्मशाळा दान करणे याला 'धर्मदान' म्हणत होते.(अहिल्याबाई होळकर अन्नछत्र) - [अहकाम ए आलमगिरी: औरंगजेबाच्या छत्रपती शाहू महाराजांविषयीच्या धोरणाची दोन महत्त्वाची पत्रे – ](https://www.discovermh.com/ahkam-e-alamgiri/): अहकाम ए आलमगिरी हा औरंगजेबाच्या पत्रांचा एक अप्रकाशित संग्रह आहे. या संग्रहाविषयी ज्येष्ठ इतिहासकार व फार्सीचे उत्तम जाणकार श्री सेतू माधवराव पगडी यांचा अभिप्राय पुढील प्रमाणे आहे :- - [श्री हरिहर मंदिर, शेगाव, बुलढाणा](https://www.discovermh.com/harihar-temple-shegaon/): श्री गजानन महाराज मंदिर संस्थान मुळे आज शेगाव प्रसिद्ध आहे. या शेगावची ओळख आधी शिवगाव म्हणून होती ती येथील शिव मंदिरा मुळे. याच मंदिरामुळे गावाचे शिवगाव असे नाव पडले होते. नंतर ते शेगाव झाले. या मंदिराला हरिहर मंदिर म्हणून ओळखले जाते. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. हे मंदिर खूप पुरातन होते. मंदिराच्या जुन्या फोटो आणि बांधकाम शैलीवरून हे मंदिर अंदाजे बाराव्या शतकातील असावे. या मंदिराचा आधीच तीन वेगवेगळ्या काळात जिर्णोध्दार झाला आहे, त्यामुळे मंदिराचे बांधकाम शैलीत फरक जाणवतो. नंतर शेगाव संस्थानने जुन्या शिवालयाचा जिर्णोध्दार करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधून श्री विष्णुमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणुन नावारूपास आले आहे. - [पळसदरी-कर्जत येथील अल्पपरिचित वर्णे लेणी](https://www.discovermh.com/varne-cave-palasdari/): वर्णे लेणी ही प्राचीन बोरघाट उतारावर असून कर्जतजवळील सोपारा, कल्याण,चौल तसेच उरण या बंदरांशी जोडणाऱ्या मार्गावर स्थित आहे. या समूहातील प्रथम लेणं हे भिक्खूनिवास स्वरूपातील दुहेरी रचना असलेले विहार असून यामध्ये ६ x ६ फूट रुंदीचे बाहेरील दालन व आतमध्ये सुमारे २ ते ३ फूट लांबीची आतील भिक्खूनिवास आहे. यामध्ये दगडी बाकाचे भग्न अवशेष असलेले दिसून येतात. हा दगडी बाक २.५ फूट रुंद २ फूट उंचीचा आहे. आतील दालनाच्या दरवाजा बसवण्याची जागा ही २.३ फूट इतकी रुंद आहे. या विहाराची उंची सध्या गाळ साचलेला असल्यामुळे गाळाच्या थरापासून छतापर्यंत ६.५ फूट इतकी आहे. समूहात असलेल्या इतर लेण्यांपेक्षा सदर विहार हे त्यामानाने चांगल्या स्थितीत असलेले व आकारमानाने मोठे (अंदाजे ९ फूट लांब ) आहे. दुसरे लेणं हे विहार असून त्याचे आकारमान ६.५ x ६.५ फूट लांबी रुंदी असलेले असून गाळाच्या थरापासून छतापर्यंत चे अंतर ६.११ म्हणजे अंदाजे ७ फूट उंच आहे. या विहाराला दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली असलेली दिसून येते. छताकढील बाह्यबाजूस २.३ फूट रुंद प्रवेशद्वार रचना दिसून येते. यामध्ये समोरील दगडी बाकाचे अवशेष असलेले दिसून येतात परंतु; आता केवळ त्याच्या खुणा शिल्लक आहेत. दगडी आसन संपूर्णतः नष्ट झाले आहे. - [गोंदियाचा प्रतापगड | Pratapgad, Gondia](https://www.discovermh.com/pratapgad-gondia/): विदर्भामध्ये काही उल्लेखनीय किल्ले आहेत यातील काही डोंगरी किल्ले असून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत. विदर्भातील प्रतापगड हा सुद्धा एक वनदुर्ग आहे. गोंदियाचा प्रतापगड | Pratapgad, Gondia. - [हरिहर : एक देह, दोन तत्त्वे](https://www.discovermh.com/harihar-shilparup/): भारतीय देवप्रतिमांच्या परंपरेत काही संकल्पना अशा आहेत की त्या केवळ शिल्परूप म्हणून पाहाव्यात अशा नसतात; त्या अनुभवाव्या लागतात. “हरिहर” ही त्यापैकीच एक अद्वितीय आणि गूढ संकल्पना आहे. शिव आणि विष्णू . - [आग्रा ते बनारस !](https://www.discovermh.com/agra-to-banaras/): मवाफीक दाबी की मुकर्रर अस्त मरदमी रा की बराए घुस्ल मी आयंद. ब-दस्तुर व आईन मुकर्ररी खिदमत मी नुमायंद व हर ची अज़ आन ब-हमरसद बिला तसर्रुफ व खियानत नज्द-ए उस्ताद-ए खुद मी बुरंद व खोच खुराकी व पोशाख शागीर्दान बर जिम्मे उस्तादस्त की ब-कदर-ए कफाफ-ए ज़रूर खबर मी गीरंद. - [मराठा आरमार ⚓ | Maratha Navy](https://www.discovermh.com/maratha-navy/): 5) किल्ल्यांच्या आश्रयाने आरमारी जहाजे समुद्रात गस्त घालून व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ लागली ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की ह्यात कसलीही कमतरता मराठा आरमारात जळपती शिवाजी महाराजांनी केली नाही. उलट कोकण किनारपट्टी ही किती मजबूत होईल ह्यावर महाराजांनी जास्त लक्ष दिले. - [Konkanatil Gavrhati | कोकणातील गावऱ्हाटी](https://www.discovermh.com/konkanatil-gavrhati/): पुस्तकांची लिंक  - https://sahyadribooks.com/konkanatil-gavrhati/ - [काठीकार | चोपदार](https://www.discovermh.com/kathikar/): बऱ्याच वेळा इतिहासातील काही पदे दुर्लक्षित राहिलेली दिसतात. अशाच एका ऐतिहासिक पदाचा उल्लेख आजच्या काळात फारसा होत नाही, तो म्हणजे ‘काठीकार’ किंवा‘चोपदार’. अहिल्या नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे सापडलेला एक विशेष वीरगळ हा या पदाच्या प्राचीनत्वाचा एक ठोस पुरावा आहे. या वीरगळावर काठीकाराचे शिल्प आढळते. - [चाकणची कत्तल](https://www.discovermh.com/chakans-slaughter/): दख्खनी आणि पठाणी मुसलमानांतील तेढ विको पास जाऊन तिचा स्फोट चाकण येथील कत्तलीच्या स्वरूपानें झाला. त्याची हकीकत थोडक्यांत अशी आहे. हिजरी ८४९ ( शके १७६७) मध्यें अल्लाउद्दीन अहमदशहाच्या कारकीर्दीत सल्फ मलिकतुजार यानें संगमेश्वरबंद हस्तगत करण्याचा विचार केला. याचें कारण त्या बाजूस दाट जंगल असल्यामुळे त्याच्या आश्रयास राहून पुष्कळ चोर व दरवडेखोर छापे घालीत, यामुळे त्या मागांतून जाणाऱ्या येणान्या मुसलमान यात्रेकरूंस नेहमी भय वाटत असे. मलिकनुजारार्ने प्रथम एक किल्ला घेऊन तेथील किल्लेदार शिर्के यास केंद केले, तेव्हां शिर्षांनें मुसलमानी सैन्याशी गोडी लाऊन असें चोलणें चालविले की " मला इकडील जंगल व प्रदेश याची बारकाईची माहिती आहे. तेव्हां माझ्या बरोबर तुन्ही सैन्यासह याल तर तुम्हांस नेमके संगमेश्वरच्या पायथ्याशीं पोंचवितों; म्हणजे तुम्हास तै बंदर सहज घेतां येईल." मलिकानें शिक्यांच्या म्हणण्यास मान्यता दिली; आणि सैन्यांतील लोक नाखुष होते तरी त्यांचे म्हणणें न ऐकतां शिक्यांनीं दास-विलेल्या वाटेनें निबिड जंगलांतून व डोंगरांच्या दऱ्या खोऱ्यांतून जातांजाता है मुसलमानी सैन्य एका अत्यंत कठिण जागी येऊन पोंचलें. त्या ठिकाणीं तीस चाळसि हजार हिंदु सैन्य आधीच दबा धरून राहिलें होतें; आणि त्यांच्या तडाख्यां-तून या मुसलमानी सैन्याची सुटका होणे अशक्य झालें. शिवाय मलिक तुजार त्याचवेळी फार आजारी पडला, सारांश हिंदु सौनिकांनीं त्या मुसलमानी सैन्यांतील बहुतेक सैन्याची कत्तल केली. व त्यांत मलिकतुजार व बरेच सय्यद लोक प्राणास मुकले. कांहीं थोडे लोक या प्रसंगांतून निभावले ते मलिकाच्या ठाण्याचे ठिकाण चाकण येथे गेले.(चाकणची कत्तल) - [खान्देशातील दुर्ग आणि किल्ले भाग १](https://www.discovermh.com/forts-of-khandesh-part-1/): अर्थात: जो समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयच्या दक्षिणेला स्थित आहे त्या खंडाला भारतदेश म्हटले जाते. ज्याचा विस्तार ९ हजार योजन असून स्वर्ग आणि अपवर्गाला प्राप्त करणाऱ्यांची ही कर्मभूमि आहे. या जम्बूद्वीपात भारतच सर्वश्रेष्ठ आहे कारण ही कर्मभूमि आहे. उर्वरित देश फ़क्त भोगभूमि आहे. पूर्वजांनी वर्णनेली ही या भूमीची थोरवी आहे. 'भारत' शब्द मानस पटलावर उमटत्याक्षणीच निबिड़ अरण्य , गगनस्पर्श पर्वतराजींचा, अफाट वेगाच्या नद्यांचा , थल च्या वाळवांटाचा, वेद-पुराण, स्मृति , रामायण महाभारत सारख्या महाकाव्यांचा , 'गीता' सारख्या अलौकिक तत्त्वज्ञानाचा असा अचंभित करणारा राष्ट्रपुरुष समोर उभा ठाकतो. सहस्रकांच्या कालचक्राच्या गतीत शेकडो वंशसाम्राज्य उदयोलयित झाली. काळ पुरुषाने जरी त्यांचे अस्तित्व गिळले असेल तरी त्यांच्या अस्तित्वांच्या भौतिक खाणाखुणा आजही आसेतु हिमालय विखुरलेल्या आहे. या खुणा थेट सिंधु संस्कृती पासून ते मराठा साम्राज्याच्या लया पर्यन्त काळ पटलावर उमटलेल्या आहेत.(खान्देशातील दुर्ग आणि किल्ले | forts of Khandesh) - [महाभारतापूर्वीचे महाभारत](https://www.discovermh.com/mahabharata-before-mahabharata/): महाभारतापूर्वीचे महाभारत मिट्ट काळोखात मुसळधार पाऊस कोसळत असताना, मुळातच हिमालयातील उगमाने हिमवत थंड झालेल्या पाण्याचे लोट घेऊन येणारी परुष्णी नदी आज तिचे भलतेच प्रलयंकारी रुप दाखवत होती. एखादा चवताळलेला केसरी भयंकर गर्जावा आणि त्याच्या त्या गर्जनेने जंगलात गोंधळ माजण्याऐवजी स्मशान शांतता पसरावी तशीच शांतता लाटांच्या आणि मेघांच्या निरंतर गर्जनेतही परुष्णीच्या काढावर दाटली होती. परुष्णीच्या लाटा जणू काठावरील महाकाय खडक भेदू पाहत होत्या, पण तरीही त्या खडकांना खऱ्या अर्थाने भेदत होती ती एक करारी नजर.. त्या नजरेत साठला होता विश्वासघात, अपमान आणि.. आणि प्रतिशोध..! परुष्णीच्या काठावर ऋषीच्या वेशात तो पुरुष पर्वतासारखा पाय रोवून निश्चल उभा होता. त्याचा वेश जरी ऋषीचा असला तरी चेहऱ्यावरचे तेज मात्र त्याच्या क्षत्रियत्वाची ठळक ग्वाही देत होते. तो होता.. क्षत्रिय महर्षी विश्वामित्र..! भरतवंशाचा भूतपूर्व पुरोहित... हो भूतपूर्वच ! कारण नुकतेच भरतवंशी राजा सुदासने दरबारातील सर्वात प्रमुख असलेले (प्रधानमंत्री) पुरोहित पद विश्वामित्राकडून काढून घेत तिथे महर्षी वशिष्ठाची नियुक्ती केली होती. काही काळापूर्वी आपल्याच मार्गदर्शनाखाली ज्या नवख्या सुदास राजाने अश्वमेध यज्ञ करुन 'चक्रवर्ती' उपाधी धारण केली होती, त्याच सुदासाने आपले पद अशा रितीने काढून घेतल्याने चवताळलेला विश्वामित्र उफाळती परुष्णी लांघून एक अभूतपूर्व इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला होता... तर, हि कथा आहे आजपासून ३५०० (साडेतीन हजार) वर्षांपूर्वीची. अर्थात पूर्व वैदिक काळातील प्रसिद्ध दशराज्ञ युद्धाची..! ऋग्वैदिक काळात सप्तसिंधुंच्या खोऱ्यात वैदिक संस्कृती आपला विस्तार करत होती. नद्यांच्या काठांवर विविध समुहांच्या (कुळ) रुपात अनेक लहानमोठी राज्ये उदयास येत होती. त्यातील प्रमुख पाच वैदिक राज्ये 'पंचजन्य' म्हणून ओळखली जात असत. ज्यात पुरु, अनु, दृह्यू, तुर्वश आणि यदु यांचा समावेश होता. तसेच आणखी एक प्रबळ वैदिक राज्य होते ते म्हणजे भरत. याचसोबत त्या परिसरात अनेक अवैदिक राज्ये देखील होती‌. या सर्वच राज्यांची आपापसात अनेक कारणांवरून लहानमोठी युद्धे होत असत, ज्यात सुपिक जमीन व नद्यांच्या पाण्यावरील अधिकार हे एक प्रमुख कारण होते. अशाच एका युद्धादरम्यात भरतवंशी राजा दिवोदस याने पुरुवंशी राजा संबर यास हरवून त्याची हत्या केली आणि पुरुंची ९९ शहरे नष्ट केली. याच राजा दिवोदसचा पुत्र सुदास याने आपला पुरोहित विश्वामित्र याच्या मार्गदर्शनाखाली अश्वमेध यज्ञ करुन पंचजन्यासह सप्तसिंधूंवर आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. भरतवंशी त्रुत्सू कुळातील सुदास पैजवान हा शूर, महत्वकांक्षी आणि विस्तारवादी होता. अश्विनीकुमारांनी त्याचा विवाह आपली कन्या सुदेवी सोबत केला होता. त्याच्या अश्वमेध यज्ञाने आर्यावर्तात भरतांचे वर्चस्व सिद्ध झाले होते आणि तेच वर्चस्व सप्तसिंधुंच्या पाणी वाटपातही त्यास हवे होते. त्याच्या विस्तारवादी धोरणास सुरुवातीस विश्वामित्राचीही साथ होती पण सुदासचे धोरण जसजसे आणखी तिक्ष्ण होऊ लागले तेव्हा दोघांमध्ये अनेकदा मतभेद होऊ लागले व परिणाम स्वरूप त्याने राजाच सर्वोच्च असतो हे विश्वामित्रास दाखवून दिले‌. पण आता झालेल्या अपमानाचा डाग मनात घेऊन त्याचा भूतपूर्व पुरोहित पुरुराज्यात दाखल झाला होता. सप्तसिंधूच्या खोऱ्यात भरतांनंतर सर्वात प्रबळ शक्ती पुरु राज्याची होती. हे तेच पुरु होते ज्यांच्या राजाचा वध करुन भरतांनी यांच्या राज्यातील शहरे नष्ट केली होती. पुरु आपला हा अपमान अजूनही विसरु शकले नव्हते आणि आता भरतांची वाढती ताकद पुरुंना पुन्हा आव्हान देत होती. परुष्णी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातच पुरु आणि भरत ही दोन्ही राज्ये पसरलेली होती व त्यामुळे या नदीच्या जल वाटपावरुन सुरु असलेला सुप्त संघर्ष आता उघड रुप धारण करु लागला होता. संवरण हा आता पुरुंचा नवा राजा होता. तो भरतांचा राजा सुदासचा समवयस्कच होता आणि तितकाच शक्तीशाली आणि महत्वकांक्षी सुद्धा..! चिडलेला विश्वामित्र थेट पुरुंच्या दरबारात आला. त्याला पाहून सभेतील सर्वच मंत्रीगण आश्चर्यचकित झाले. संवरणाने लगबगीने उठून महर्षींना प्रणाम केला. त्यांचे आदरातिथ्य झाल्यानंतर विश्वामित्राने उघडपणेच आपल्या येण्याचे प्रयोजन सभेस स्पष्ट केले, तसेच भरतांचे वाढते सामर्थ्य पुरुंच्या ताकदीस व पंचजन्यांच्या स्वायत्ततेस कसे आव्हान उभे करत आहे हे देखील पटवून दिले. संवरणास या गोष्टी पटल्याने त्याने त्वरित पंचजन्यांची महासभा आयोजित केली. यदु, अनु, दृह्यू, तुर्वश व पुरु अशा पंचजनांनी एकमतानेच भरतांचा कायमचा बिमोड करण्याचा ठराव मंजूर केला, तसेच यासाठी स्वतः विश्वामित्रांनीच आपल्याला मार्गदर्शन करावे अशी त्यास विनंती केली. पंचजन एकत्रितपणे आता युद्धास सज्ज झाले होते‌. पण भरतांची वाढती ताकद पंचजन्यांसह सप्तसिंधुतील इतरही अनेकांना धोकादायक वाटत होती. पंचजनांनी भरतांविरुद्ध ठोकलेल्या शड्डूचा आवाज लवकरच संपूर्ण सप्तसिंधूत गरजला आणि एकेक करुन अलिन, पख्त, भलान, वैशनिन आणि शिव ही अवैदिक राज्ये (कुळे) देखील या युद्धात सामील झाली आणि अशा प्रकारे पंचजनांचा हा लढा आता दहा राजांचे युद्ध अर्थात 'दशराज्ञ युद्ध' म्हणून प्रसिद्ध झाला. पण भरतांविरुद्धचा रोष एवढ्यावरच थांबणार नव्हता. यात लवकरच वैकर्ण, मत्स्य, सिम्यू, दास इत्यादी आणखी अवैदिक राज्ये सहभागी झाली. तसेच भृगू व कवश या वैदिक राज्यांनी (कुळांनी) युद्धविजयासाठी यज्ञाहूती देत दशराज्ञ गटाच्या बाजूने युद्धात उडी घेतली. अशा रितीने संपूर्ण आर्यावर्तच सुदासच्या आणि त्याच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधात आता एकवटले होते‌. आपल्याविरुद्ध एवकटलेली ही प्रचंड ताकद पाहून सुदास घाबरला नसता तरच नवल..! अशावेळी वसिष्ठ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आपल्या मंत्रोच्चारांच्या बळावर आपण तुला नक्कीच विजय प्राप्त करुन देऊ असे आश्वासन त्याने सुदासास दिले. खरेतर युद्धाचे एक प्रमुख अंग वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यातील सुप्त संघर्षाचे देखील होते. दोघेही वैदिक 'मंत्रद्रष्टे' ऋषी होते. तथापि वसिष्ठ अधिक तपोसिद्ध होता आणि म्हणूनच सुदासने त्यास आपला पुरोहित नेमले होते. आता आपल्या मंत्रोच्चारांच्या जोरावर या दोघांपैकी जो कोणी इंद्र व वरुण या सर्वश्रेष्ठ वैदिक युद्धकर्त्या देवतांना प्रसन्न करुन घेणार व त्यांचा आशीर्वाद मिळवून युद्धास विजयाची दिशा देणार तोच आर्यावर्तातील सर्वात श्रेष्ठ व ताकदवान ऋषी ठरणार होता. संदर्भ: ऋग्वेद मंडल ७ व ऋग्वेद मंडल ३ स्वप्नील महेंद्र जाधवराव - [नागपूरकर रघुजीराजे भोसले यांचे सरदार भवानीपंत काळू यांनी बांधलेले बालाजी मंदिर, वाशीम](https://www.discovermh.com/shri-balaji-temple-washim/): नमस्कार! महाराष्ट्राच्या विदर्भ भूमीत वसलेलं एक असं ठिकाण, जिथे साक्षात तिरुपती बालाजीचा आशीर्वाद कायम असतो. आपण बोलत आहोत वाशीम शहराच्या गौरवशाली आणि प्राचीन श्री बालाजी मंदिराबद्दल! दक्षिण भारतात तिरुपती बालाजीला 'टेकड्यांचा साहूकार' म्हणतात, पण आपल्या वाशीमच्या या मंदिराला 'वाशीमचा जागीरदार' म्हणून ओळखले जाते. - [आमच्या संस्कृतीशी जुडलेली आमची घट्ट नाळ आम्ही कधीही सोडत नाही…](https://www.discovermh.com/our-strong-connection-to-culture/): आम्ही कितीही प्रगत झालो,कितीही आधुनिक किंवा आजच्या भाषेत माॅडर्न झालो तरि आमच्या संस्कृतीशी जुडलेली आमची घट्ट नाळ आम्ही कधीही सोडत नाही. आम्ही अतिशय टोकाचे विज्ञाननिष्ठ असोत वा टोकाचे सनातनी पण आमचे देव-देवता,सण-समारंभ नि आमच्या चालिरिती,पंरंपरा आजही आम्ही तितक्याच तन्मयतेने नि मन्मयतेने पुजतो, साजरे करतो. आजही मांसाहार केला तरि मंदिर नि पवित्र ठिकाणी जाण्याचे आमच्या मनात येत नाही. आजही आमच्या भगवंताच्या वेशात जरि कोणी दिसला तरि आमचे आपसुकच हात जोडले जातात. आजही कुठेही अगदी कुठेही शेंदुर माखलेल्या दगडासमोर आम्ही नतमस्तक होतो. बर्याच जणांना वाटत की आमचे देव दगडाचे आहेत.. - [पांगरे बुद्रूक येथे सापडला शिलाहार कालीन शिलालेख](https://www.discovermh.com/stone-age-inscription-found-at-pangre-budruk/): राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक या गावात एक शिलाहारकालीन शिलालेख उजेडात आला आहे. सदर लेखाची शिळा गावातील श्री हरिहरेश्वर मंदिर परिसरात एका ओट्यावर ठेवलेली आहे . आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या लेखाचे वाचन पुण्यातील इतिहास संशोधक श्री. अनिल दुधाणे यांनी केले त्यांना श्री. अथर्व पिंगळे यांचे सहकार्य लाभले असून त्यातून तत्कालीन राजकीय व धार्मिक परिस्थितीची माहिती मिळाली आहे. पांगरे बुदृक येथील श्री हरीहरेश्वर मंदिराचा पाया शिलाहार राजाने शके १०८२ म्हणजे सन ११६० साली घातल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे . त्यामुळे राजापूर तालुक्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत झाले आहे . - [सेनासाहेबसुभ्याचे पद](https://www.discovermh.com/the-post-of-senasaheb-subha/): सेनासाहेबसुभा हे पद १८ व्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासामुळे विशेष प्रसिद्धीस आले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात औरंगजेब बादशाह दक्षिणेत उतरला त्यावेळी मराठा राज्यात अंधाधुंदी माजली होती. अनेक सरदारांच्या निष्ठा या काळी डाळमळीत झाल्या. अनेकांचे मुजरे छत्रपतीं समोर न झडता बादशाह समोर झडू लागले. अश्यावेळी नवी मनगटे राजकुळाच्या सेवेस तत्पर झाली. यातील अनेक घराणी पुरातन होती, शिवछत्रपतीं पासून कार्यरत होती. परंतु नवी घराणी पराक्रमाच्या योग्य संधीची वाट पाहत आपल्या समशेरीला पाणी पाजून अधिक धारदार करीत होती. अनेक नव्या घराण्यांचे पराक्रम विशेषकरुन छत्रपती राजाराम काळात उत्स्फूर्तपणे दिसू लागले. यातील हिंगणीकर भोसल्यांची शाखा विशेषरूपाने पुढे आली अन आपल्या पराक्रमाने मराठ्यांचे डळमळीत झालेले सिंहासन स्थिरावण्यास मदत करती झाली. - [सुपे येथील मल्लिकार्जुन मंदिर स्तंभ लेख](https://www.discovermh.com/mallikarjuna-temple-pillar-article-at-supe/): सुपे येथील मल्लिकार्जुन मंदिर स्तंभ लेख !!!! उपलब्धी व स्थळ :- हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मौजे सुपे येथील सुपे काऱ्हाटी रस्त्यालगत असलेल्या मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या एका स्तंभावर कोरलेला आहे.सध्या तो खांब याच रस्त्यावर असलेल्या श्री गिरमे यांच्या घरासमोर एक झाडाखाली आणून ठेवला आहे . सदर शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून १० ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून त्यावरील मजकुराची अक्षरे सुवाच्च रेखीव, व एकसारखी असून त्यांचा रेखीवपणा आजही कायम आहे.लेख उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून काही अक्षरे पुसट झाली असून काही ठिकाणी अक्षरे तुटली आहेत. थोडया प्रयत्नाने शिलालेख अगदी सहजपणे वाचता येतो. ================================== शिलालेखाचे वाचन : १.श्रीगणेशायानमः स्वस्ति २.श्रीनृप शालिवाहन शके ३.द्वेपंचसाइंदु कीं॥ हे साधा ४.रण आद्धमास दुसरा शुक्ल ५.त्रितीया नी की ते काळी म ६.लिकार्जुनालय सुपा ग्रामि ७.सुमंतें किजे॥ हृत्कोसी रघुना ८.थ नंदन सिवाओ नंदना त्वा ९.किजें॥१॥ छ संहिता श्रीगणेशायन्मः स्वस्तिश्रीनृपशालीवाहनशकेद्वेपंचसःईदुकीं ॥ हेसाधारणआद्धमासदुसराशुक्लत्रितियानिकी ॥ तेकाळीमलिकार्जुनालयसुपःग्रामिसुमंतेंकिजे ॥ हृत्कोसीरघुनाथनंदनसिवाआनंदनात्माभजे ॥१॥ छ अर्थ. श्री गणेशाला नमन करून शालिवाहन शके १६५२व्या वर्षी साधारण नाम सवंतसरात अदमासे म्हणजे अधिक महिना असलेल्या भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजेच १९ ऑगस्ट १७३० बुधवार या दिवशी मौजे सुपे गावात रघुनाथचे पुत्र आनंदराव सुमंत (डबीर )यांनी श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिराची (देवालयाची) उभारणी करून. प्रभु रामचंद्राला आणि गणपतीला हृदयाच्या कोशात ठेवा अशी विनंती करून शिलालेखाचा शेवट करण्यात आला आहे. शिलालेखाचे महत्व : देवाला आपल्या हृदयात ठेवा याचा अर्थ असा आहे की देवावर पूर्णपणे विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवावी. त्याच्यावर भक्तिभावाने प्रेम करा.आपल्या जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करा.त्यांच्या शिकवणी आणि तत्वांनुसार जीवन जगा केवळ धार्मिक अर्थाने नाही तर भावपुर्ण भक्तीने प्रार्थना करा.अडचणीच्या काळात देवावर विश्वास ठेवा तो तुम्हाला मदत करेल.जेव्हा तुम्ही चांगल काम कराल तेव्हा तो तुम्हाला बळ आणि शक्ती देऊन योग्य दिशा दाखवेल,देवाच्या उपस्थितीची आणि त्याच्या प्रेमाची जाणीव सतत आपल्या हृदयात ठेवली तर जीवनात आनंद आणि शांती टिकून राहील. शिलालेखाची सुरवात गणेश स्तुतीने झाली आहे . लेख शक सवतसर मास तिथीने युक्त असून शक लिहण्याची पद्धत ही शशांक अक्षर स्वरूपात आहे . शिलालेखात आलेले सुमंत (डबीर )हे नाव शिवकाळापासून प्रचलित असून या घराण्यातील सोनोपंत डबीर(सुमंत) हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते .या घराण्याने स्वराज्याची खूप मोठी सेवा केलेली आहे .श्री सुमंत आनंदराव यांनी सुपे गावात श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर बांधून श्री रामाला आणि गणेशाला स्वतःच्या हृदयात ठेवा असा संदेश दिला आहे .यावरून हे घराणे सामाजिक व आध्यात्मिक आणि धार्मिक वृत्तीचे दिसून येते ..आजही सुपे गावात सुमंत आडनावाची लोक राहतात.एखाद्या ठिकाणी मंदिर बांधून त्याची द्वारे जनमाणसा साठी खुली करून त्यांच्या हृदयात देवाचे स्थान निर्माण करून त्या माहितीची लेखी स्वरूपात नोंद करून ठेवणे हे या शिलालेखाचे विशेष महत्व आहे... =================================== गावाचे नाव : मु पो.सुपे, ता.बारामती, जि.पुणे. जी.पी.एस. : N-१८. ३२५८७४,W-,७४.३८१६८९ शिलालेखाचे स्थान : पूर्वी मल्लिकार्जुन मंदिरात स्तंभांवर कोरलेला होता सध्या तो स्तंभ श्री गिरमे यांच्या घरासमोर ठेवलेला आहे. अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे लिपी व भाषा : देवनागरी - लिपी मराठी भाषा प्रयोजन : अधिक महिन्यात श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर बांधकाम पूर्ण केल्याची स्मृती जपणे. मिती / वर्ष : शके १६५२ साधारण नाम संवत्सरी भाद्रपद शुद्ध तृतीया काळ वर्ष : अठरावे शतक पूर्वाध– १९ऑगस्ट १७३० बुधवार कारकीर्द:छत्रपती थोरले शाहू महाराज ग्रामनाम:सुपे ग्रामदेवता :- श्री गणेश, ,श्री मल्लिकार्जुन व्यक्तिनाम : श्री सुमंत ,रघुनाथ आनंदराव शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे. अथर्व पिंगळे संक्षेप :- द्वेपंचसाइंदु –दोन पाच सहा एक(१६५२), शुक्ल-शुद्ध , ग्रामि-गाव ,नंदन –पुत्र ,हृत्कोसी-हृदयात सुमंत डबीर घराण्याच्या इतिहासात आलेल्या नोंदी आणि त्यांचे कार्य शिवकाळ :- १.शके १५८३ सन १६६१ इसवीचे सुमारास शिवाजीमहाराजानी आपले लष्करात व्यवस्थे करतां अष्टप्रधान केले त्यांत सोनोपंत म्हणून त्याचे लष्कारांत होता त्यास डबीर हें पद दिले. सोनोपंत हा शिवाजीचे लष्करात शके १५६३ सन १६४१ पासून होना. २.शके १५८५ सन १६६४ इसवीचे सुमारास शिवाजीमहाराज दिल्लीकडे गेले त्याजबरोवर सोनोपंत यांचा मुलगा त्रिंबक सोनदेव हा होता त्याणें शिवाजीमहाराजा बरोबर पुष्कळ हाल सोसून परत आला शके १५९६ सन १६७४ इसची साली राज्याभिषे-क झाला तेव्हां अष्टप्रधानांची नांवें संस्कृतभाषेत ठेवि लीं त्यांत डबीर यांस सुमंत असे पद ठरवून तेपद् जनार्दन नारायण हणमंते यांस दिलें. ३.सुमंत यांचे राजमंडळांत असें काम होते की त्याणीं परराज्यातील वकिलाचे काम करावें आणि राज पत्रावर दरखाचे संबंधानें समत सुमंत हे निशाण करावें राजानें यांस पत्र लिहिणें त्यावर राजश्री नाव लिहून पंडित असें लिहून शेवटीं बहुतकाय लिहिणें सुज्ञ असा असें लिहिण्याची चाल होती . सुमंत पदांची वस्त्रे खालीं लिहिल्या प्रमाणें महाराजाकडून होत होती. वस्त्रे : १ प्रथम भेटीचे वेळेस चादर छडीदार १ पदाची वस्त्रे - मंदील, जामेवार, चादरछडीदार किनखाप, पटका. १ शिक्के करार १ शस्त्रे –ढाल, तलवार. १ हत्ती, घोड़ा. १ जवाहिर - शिरपेच, चौकडामोत्याचा कंठीमो-त्याची, तुरा मोत्याचा १ चौरीरुप्याचे दांडीची. १ कलमदान नाडीचे. या प्रमाणे देण्याची चाल होती सुमंत याणी महाराजास भेटीचे वळेस कांहीं मोहरा नजर कराव्या लागत बहुत करून दहा मोहरा नजर कराव्या लागत छत्रपती संभाजी महाराज काळ :- १.शके १६०२ सन १६८० चेसुमारें जनार्दन नारा यण याणें संभाजीमहाराजांस कोल्हापुरचे किल्ल्यावर वर कैद करण्याची मसलत केली म्हणून संभाजीनी त्यास रायगडास आल्यावर कैद करून त्याचे पायांत बेडी घातली. २.संभाजीमहाराज यांस मोगलानी धरून नेल्यावर राजाराममहाराज कर्नाटकांत गेले तेव्हां त्यांणी जनार्दन नारायण यांस कैदेतून सोडविलें तो महाराजां बरोबर कर्नाटकांत गेला. ३.शके १६१४ सन १६९२ साली राजाराममहाराज याणी जिंजी मुकामी अष्टप्रधान केलें त्यांत महादजी जनार्दन हणमंते यांस सुमंत पद दिलें. आणि जनार्दन नारायण यांस आमात्य पदवी दिल्ली. ४.शाहुमहाराज मोंगलाचे कैदेतून सुटून दक्षणेत येत असतां शके १६२८ सन १७०६ इस सन सुमारें औरंगाबाद मुकामी आनंदराव रघुनाथ भोपळे हे औरंगाबादेत सुखवस्तु राहात होते ते येऊन भेटले तेव्हां ते हुशार व चतुर असें पाहून शाहुमहाराजांनी त्यांस आपणाबरोबर आणले. ५.शके १६२९ सन १७०७ साली ताराबाईसाहेव यांजकडील सातारा वगैरे किल्ले शाहु महाराजानी घेतलें तेव्हां आनंदराव याणे चांगला शूरपणा व हुशारी दाखविली. ६.महादाजी जनार्दन ताराबाईसाहेब यांस मिलाफी होते म्हणून त्यांजला काढून शके १६३२ सन १७१० चे सुमारे शाहुमहाराजानी आनंदराव यांस सुमंत पदाची वस्त्रे दिलों व कऱ्हाड प्रांतापैकी नाङगोंडीचें-वतन रुपये ५००० आणि खेरिज इनामीसरंजाम १००४१२॥ रुपयांचा दिला. छत्रपती थोरले शाहू महाराज रोजनिशी यात आलेल्या सुमंत डबीर पदाच्या नोंदी :- १. बाळकृष्ण वासुदेवः- अशर मया अलफांत यांस सुमंत असे लिहिल्याचे कागद आहेत. २. महादाजी गदाधरः- इसने अशरीन सालीं यांस सुमंत असे लिहिल्याचे कागद आहेत. ३. अनंदराव रघुनाथः पासी सुमंती सांगून पांच सनंग दिले, छ २३ रबिला अर्बा अशरीन पौष बहुल दशमी भृगुवासर. (म्हणजे सन१७२५ साल) ४विठ्ठलराव - यांस पद दिल्याबद्दल वगैरे कागद दप्तरी नाहींत, परंतु हे सुमंत होते अशा-विषयी प्रतापसिंह महाराज यांनीं एक यादी केली आहे त्याजवरून समजते. ५. मल्हारराव कृष्णः- यांस पद दिल्याबद्दल वगैर कागद दप्तरी नाहींत, परंतु हे सुमंत होते अशाविषयीं प्रतापसिंह महाराज यांनीं एक यादी केली आहे त्याजवरून समजते. ६. जिवनराव विठ्ठलः- यांस पद दिल्याबद्दल वगैरे कागद दप्तरी नाहींत, परंतु हे सुमंत होते अशाविषयीं प्रतापसिंह महाराज यानीं एक याद केली आहे त्याजवरून समजतें. ७. महिपाजी आनंदरावः- इहिदे सलासिन सालीं. ८.सुमंत यांचे दिमतीचे व फडणिशीचे व मुतालकीचे वगैरे इतर लोक होते तेः- १ यादो- गोपाळ मुतालिक, १ नारोराम फडणीस, १ नारो काशी.पारसनीसः- १ घनःशामदास कावन, १ भगीरथ, १ लाला भगीरथ. ९.इ. स. १७४०-४१.इहिये अर्खेन मया व अलफ.मोहरम २०.छ २३ रोजी सोमवारी मंत्री राजश्री आनंदराव सुमंत यांची रवानगी नबाब किलीब खान याजकडे केली, शिरपाव दिल्हा. संदर्भ :- १.(IE VI -२६३) २.सुपे परगणा-श्री विश्वास देशपांडे.पान –नो १२२ ३. छत्रपती शाहू महाराज रोजनिशी ४. सातारा छत्रपती घराणे :- ©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे. सदर कार्यात मराठा इतिहासाचे संशोधक श्री प्रवीण भोसले सर ,श्री विश्वास देशपांडे,श्री विनोद खटके,श्री मनोज कुंभार श्री जयराम सुपेकर यांचे महत्वाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. - [रामचंद्र यादवांचा तळेगाव ढमढेरे शिलालेख](https://www.discovermh.com/talegaon-dhamdhere-inscription-of-ramchandra-yadav/): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे नावाचे एक ऐतिहासिक गाव आहे. या गावात काही वर्षांपूर्वी बांधकाम करत असताना एक तळेगाव ढमढेरे शिलालेख असलेला गधेगाळ सापडला. वरच्या भागात चंद्र, सूर्य प्रतिमा मधल्या भागात शिलालेख आणि शेवटी गाढवाचा स्त्रीशी संकर असे याचे स्वरूप आहे.या संदर्भातील बातमी दैनिक सकाळ आणि दैनिक दिव्य मराठी व इतर प्रमुख मराठी या वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. बातमीतील माहिती नुसार हा शिलालेख मंदिर निर्माण आणि देखभाली संदर्भातील आहे. याचे वाचन केले असता तो स्थानिक कराशी संबंधित असल्याचे लक्षात आले. या शिलालेखाचे मी केलेले वाचन असे- - [अहमदाबादची लूट – मिरात-ए अहमदी (गुजरातचा इतिहास) मधून भाग १](https://www.discovermh.com/ahmedabad-loot/): *फार्सी* (अहमदाबादची लूट) - [हौशगिरी गोसावींची समाधी आणि अनाजी जनार्दन देशाधिकरी यांचे इनाम लेखपत्र](https://www.discovermh.com/mausoleum-of-haushgiri-gosavi/): वाई तालुक्यातील सिद्धनाथवाडी हे गाव प्राचीन काळापासून संतपरंपरेचे आणि सेवा-भक्ती परंपरेचे केंद्र राहिले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावाने अनेक आध्यात्मिक परंपरांना साक्ष दिली असून, विशेषतः गोसावी संप्रदायाशी जोडलेली परंपरा येथे खोलवर रुजलेली आहे. सिद्धनाथवाडीतील सिद्धेश्वर मंदिरातील हौशगिरी गोसावींची समाधी आणि अनाजी जनार्दन देशाधिकरी यांचे इनाम लेखपत्र एक दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा नव्याने उजेडात. अलीकडेच येथे सापडलेला शके १६४२ (इ.स. १७२०) आश्विन वद्य ८ रोजी लिहिलेला एक दुर्मिळ ऐतिहासिक दस्तावेज – इनाम लेखपत्र – या परंपरेला ऐतिहासिक अधिष्ठान प्राप्त करून देतो. - [करंबळीचे विष्णू मंदिर](https://www.discovermh.com/vishnu-temple-of-karambali/): महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर इतिहास कथन करणारी अनेक छोटी छोटी गावं लपलेली आहेत.गेल्या दहा वर्षात या ना त्या कारणाने या भागात आमची भटकंती सुरू आहे. करंबळी.. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव.या गावात नारायणाचं एक छोटं मंदिर आहे. स्थापत्य बघितलं तर करंबळीचे विष्णू मंदिर अंदाजे पंधराव्या/सोळाव्या शतकात बांधलेलं असावं.गाभाऱ्यातली ही मूर्ती अतिशय सुबक आणि मनमोहक आहे.काही वर्षांपूर्वी मूर्तीचा वज्रलेप करून घेतला आहे असं तिथल्या पुजाऱ्यांकडून समजलं. - [शिळेवरील धनुष्यबाण । इतिहासाच्या पाऊलखुणा](https://www.discovermh.com/bow-and-arrow-on-a-rock/): मध्ययुगात कोकणचे दोन भाग मानले गेले होते. दक्षिण कोकण उत्तर कोकण या भूमिला पूर्वी अपरांत असे म्हटले गेले आहे. कोकण ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. परशुरामाची माता कुंकणा (रेणुका)यावरुन कोकण हे नाव पडले असावे असे मानले जाते परशुरामाने जिंकलेली भूमी ब्राह्मणांना दान दिल्यानंतर आपणास रहावयास जागा उरली नाही हे पाहून परशुरामाने समुद्र शंभर योजने मागे हटवून अपरान्ताची भूमी निर्माण केली असे ग्रंथ सांगतात.(शिळेवरील धनुष्यबाण) - [फरिश्ता ते फिरस्ता – परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी](https://www.discovermh.com/records-of-the-city-of-foreigners/): आताचं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच अहमदनगर २८ मे हा या शहराचा स्थापना दिवस. स्थानिक लोक या शहराला फक्त नगर म्हणूनच संबोधतात. इथल्या बोलीभाषेलाही नगरी म्हटलं जातं . या शहराविषयी आणि इथल्या लोक जीवनाविषयी परकियांनी सुद्धा भरभरून लिहिल तर काहींनी चित्रातून आपल्या भावना प्रकट केल्या.परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी. - [राहुरी नव्हे रामपुरी ७००](https://www.discovermh.com/rampuri-not-rahuri/): अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात राष्ट्रकूट राजा चौथा गोविंद याचा 'सांगली ताम्रपट ' जतन.करून ठेवलेला आहे. याचा काळ शके ८५५ म्हणजे इसवी सन ९३३-३४ असा येतो.खरं तर या ताम्रपटाचा सांगली जिल्हा किंवा परिसराशी काही संबंध नाही. तेथील एका कुटुंबाकडे तो सापडला म्हणून त्याला सांगली ताम्रपट नाव पडले.हा ताम्रपट नेवासा तालुक्यातील लोहगाव नावाच्या गावाशी संबंधित आहे. - [पिंपळगाव कवडा येथील २४० वर्षे जुना बहिरो अनंत यांचा शिलालेख](https://www.discovermh.com/inscription-of-bahiro-anant/): अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात पिंपळगाव कवडा नावाचे एक छोटेसे गाव आहे. आज जरी नगर तालुक्यात असला तरी पूर्वी हा गाव पारनेर परगण्यात होता.या मोठा गावाला ऐतिहासिक वारसा लागला आहे. गावात ठिक ठिकाणी ऐतिहासिक खुणा नजरेस पडतात. याच गावच्या प्रवेश द्वारावर म्हणजे वेशीवर एक शिलालेख कोरलेला आहे. वेशीला रंग दिलेला असला तरी पिंपळगाव कवडा येथील २४० वर्षे जुना बहिरो अनंत यांचा शिलालेख  वाचता येतो.त्याचे मी केलेले वाचन असे- - [शूलाग्री स्थिती](https://www.discovermh.com/shulagri-status/): नगरामध्ये अशी घोषणा करण्यात आली की, जो कोणी मद्य प्राशन करील त्याला शूलाग्री स्थिती म्हणजे सुळावर चढविण्यात येईल. मोरोपंतांच्या आर्याभारत मधली ही एक आर्या. . सुळावर चढविणे हा शिक्षा प्रकार प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात होता. केवळ शिक्षा म्हणूनच नाही तर काही वेळा आत्माहुती देण्यासाठी स्वतः सुळावर चढत असत. - [ढोला मारू शिल्प, विठ्ठल मंदिर पळशी](https://www.discovermh.com/dhola-maru-shilp/): राजस्थानी लोकसाहित्यातील प्रसिद्ध लोक कथेचे ढोला मारू शिल्प पळशीच्या विठ्ठल मंदिरावर कोरलेले आहे. मंदिर स्थपती राजस्थानी असल्याची ही खूण म्हणता येईल. - [आजचा महाराष्ट्र निर्माण करणारे सातवाहन!](https://www.discovermh.com/satvahan-history-in-marathi/): आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैवाने आम्हीच मराठी माणसे एवढी कृतघ्न कि सातवाहन घराण्याचे आमच्यावरील अपार ऋण तर विसरलोच, पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असताना त्याशी संबंध नसलेल्या भाकडकथांवरच जास्त विश्वास ठेवत गेलो आणि या उत्सवाचे मांगल्य आणि महत्व विसरून गेलो. या दिवशी रावणाला ठार मारून राम अयोध्येत परत आला अशी कथा असो कि या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करून कालगणना सुरु केली अशी उत्तर काळातील व्रतराजामध्ये येणारी कथा असो, तिच्यावरच आम्ही अंधश्रद्धेने विश्वास ठेवत गेलो आणि या स्वातंत्र्याच्या महोत्सवाचे मांगल्य मात्र हरपून बसलो. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या उत्सवाचा इतिहास डोळसपणे पहायला हवा. - [भारताचे पुरातन नाव मेलुहा](https://www.discovermh.com/the-ancient-name-of-india-is-meluha/): जेंव्हा या देशाला भारत हे नाव पडले नव्हते, हिंदुस्तान आणि इंडिया ही नावेही आली नव्हती तेंव्हा भारताला ‘मेलुहा’ हे नाव होते असे पुरावे सुमेरियन दस्तावेजांनी आपल्याला लाभलेले आहेत. सुदैवाने आपल्या प्राकृत भाषांनीही हा पुरातन पुरावा जपून ठेवला आहे. पण मेलुहा (मेलुक्खा अथवा मिलिच्छ) या शब्दाचा अपभ्रष “म्लेंच्छ” असा करत वैदिक आर्यांनी त्या शब्दाचा अर्थच बदलवन्याचा प्रयत्न केल्याने हे मुळचे राष्ट्रनाम मागे पडले. त्यानंतर ऋषभनाथपुत्र चक्रवर्ती भरतावरून भारत हे नाव प्रचलित झाल्यानंतर तर ते विस्मरणातच गेले. चिकटून राहिले ते हिणार्थाने भारतातील मूळ रहिवाशांना. नंतर म्लेंच्छ ही सद्न्या विदेशी परधर्मीय/परभाषिक लोकांना बहाल केली गेली. अर्थात ही सांस्कृतिक उलथापालथ कशी झाली हेही आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे. (भारताचे पुरातन नाव मेलुहा) - [विश्वात मानव एकटाच?](https://www.discovermh.com/are-humans-alone-in-the-universe/): आपल्याला ज्ञात असलेला जीवसृष्टी असलेला पृथ्वी हा एकमात्र ग्रह आहे. विश्वात अन्यत्र कोठे पृथ्वीसदृश्य ग्रह आहेत काय याचा आधुनिक विज्ञान शोध घेते आहे. असे काही ग्रह दूरच्या आकाशगंगांत सापडले असले तरी तेथे जीवसृष्टी आहे कि नाही, तेथे वातावरण आहे कि नाही, असल्यास त्याचे स्वरूप नेमके काय आहे याचा तपास अद्याप आपल्याला लागलेला नाही कारण ती आपल्या विज्ञानाची आजची मर्यादा आहे. प्रकाशाचा वेग ही मर्यादा असल्याने आणि या तारे व आकाशगंगा आपल्यापासून काही कोटी ते अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असल्याने आणि अदयाप मानवाला प्रकाशाचा वेग गाठता येणे आज तरी सर्वस्वी अशक्य आहे. समजा तसा वेग गाठता जरी आला तरी प्रकाशवेगाच्या स्थितीत मानवी काळ आणि शरीर-भौतिकीत नेमकी काय तोडमोड होणार याचे भाकीतही वर्तवता येणे अशक्य आहे. समजा सारे अडथळे ओलांडून आपण विश्वाच्या या अथांग पसा-यात कोणा एका ग्रहावर जीवसृष्टीच्या शोधात निघालो तरी इप्सित स्थळी पोचेपर्यंत कैक पिढ्या अंतराळातच खपतील हे अजून वेगळेच. आणि समजा ज्याही पिढीचे लोक जीवसृष्टी असलेल्या ग्रहावर प्रत्यक्ष पोचतील तेंव्हा तेथे कोणत्या प्रकारच्या जीवसृष्टीशी मानवाचा सामना होईल?विश्वात मानव एकटाच? - [समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेले ११ मारुती](https://www.discovermh.com/11-marutis-founded-by-samarth-ramdas-swami/): "जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा"!.. असे सुंदर वचन मनाच्या श्लोकात  लिहिणारे समर्थ रामदास स्वामी यांचे उपास्य दैवते म्हणजे श्रीराम व मारुतीराया. अंगापूरच्या डोहात पोहत असताना सापडलेल्या राममूर्तींची स्थापना चाफळ येथे करून सुंदर मंदिर रामदास स्वामींनी बांधले. तसेच अकरा मारुतीची ही स्थापना विविध गावात केली.. श्रीराम मंदिरे, मारुती मंदिरे, राम उपासना केंद्रे, मठ , उपासनेसाठी घळी, गुहा, यांच्या स्थापना करून समाजाला शांत , नैसर्गिक ठिकाणी चिंतन करण्यासाठी व आध्यात्मिक मार्गाची योग्य दिशा व प्रेरणा दिली. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, अशा सारख्या साहित्य निर्मितीतून लोकांचे ज्ञानात भर घातली व प्रबोधन केले.(समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेले ११ मारुती) - [वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai](https://www.discovermh.com/wakeshwar-temple-wai/): प्राचीन भारतीय मंदिरस्थापत्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध कालखंडात झालेली त्यांची निर्मिती किंवा एकाच मंदिरात विविध कालखंडात काही कारणाने झालेले बदल. हे असे बदल महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहायला मिळतात. वर्षानुवर्ष होणारे ऊन-पावसाचे तडाखे, त्यामुळे होणारी दगडाची झीज, परकीय आक्रमणांमुळे झालेली मंदिराची नासधूस अशा अनेक कारणांमुळे मंदिरांच्या वास्तूमध्ये हे बदल वारंवार होत गेले. अशा मंदिरांचा इतिहास आणि त्यांचं स्थापत्य यांचं नीट निरीक्षण केलं तर हे बदल चटकन लक्षात येतात. अशाच धाटणीचं एक सुंदर मंदिर वाईजवळच्या वाकेश्वर इथं पहायला मिळतं.Wakeshwar Temple, Wai. - [कुंभोजमधील पाषाणी चक्रातून रोम-कोल्हापूर प्राचीन व्यापार अधोरेखित…](https://www.discovermh.com/ancient-rome-kolhapur-trade/): कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज (ता. हातकणंगले) गावाच्या परिसरात आढळलेल्या दगडी चक्रव्यूह संरचनेच्या पाऊलखुणांतून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूर-रोम व्यापारी संबंध अधोरेखित झाला आहे. - [छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार १० भागांची मालिका](https://www.discovermh.com/naval-forces-of-shiavaji-maharaj/): शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला आहे. कृष्णाजी अनंत सभासद बखर, चिटनीस बखर, पोर्तुगीज कालीन साधने व पत्र व्यवहार, इंग्रज कालीन प्रत व्यवहार, शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र, तसेच समकालीन पत्र व्यवहार अस्या साधनांचा आधार घेतला आहे. तसेच भा.कृ.आपटे यांच्या लिखीत साधनांचा प्रामुख्याने वापर केला आहे. सदर विषयावर माहीती संकलन करते वेळी शिवाजी महाराजांची युद्धनिती, सतर्कता, रयतेवरील प्रेम या सर्व गोष्टी नजरे समोर आल्या. खरे तर शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना विस्तृत असे लिखाण जेवढे करेल तेवढे कमीच आहे. जेवढे भाग लिखान करुन व माहीती संकलन करुन आपल्याला वाचनासाठी सादर केले आहेत. ## Pages - [Bookmarks](https://www.discovermh.com/bookmarks/) - [Submit YouTube Channel](https://www.discovermh.com/register-youtube-channel/): महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५० हुन अधिक विषयांवर २०००+ लेख आहेत. आता मराठी youtubers साठी हा आणखी एक उपक्रम चालू केला आहे. तुमचे व्हिडिओ आम्ही तुमच्या नावासह वेबसाईट वर टाकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावू. - [Registration Form](https://www.discovermh.com/registration-form/): Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक पोर्टल आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. - [Privacy Policy](https://www.discovermh.com/privacy-policy/): This privacy policy includes all the details about the data collected in Discover Maharashtra App and how it’s used. - [Discover Maharashtra | अपरिचित महाराष्ट्र](https://www.discovermh.com/discover-maharashtra-info/): महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, संस्कृती, मराठी माणूस, अपरिचित माहिती, वारसा स्थळे, स्वराज्याचे शिलेदार, महत्वाच्या व्यक्ती, गडकिल्ले, प्रवासवर्णन आणि बरंच काही जगाला दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे. - [About Discover Maharashtra](https://www.discovermh.com/about/): सप्रेम नमस्कार, - [Donate Us | चला महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवूया…](https://www.discovermh.com/donate-us/): नमस्कार, - [उपक्रम पाठवा | Send Venture](https://www.discovermh.com/send-venture/): Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक पोर्टल आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. - [लेख पाठवा | Send Your Blog](https://www.discovermh.com/send-your-blog/): Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक पोर्टल आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. - [Discover Maharashtra Blog](https://www.discovermh.com/blog/) - [सामाजिक संस्था/संघटना | Social Organization](https://www.discovermh.com/add-social-organization/): मागील काही वर्षात आपल्या समाजात विविध विषयांची बरीच जनजागृती होत आहे. अनेक संस्था, प्रतिष्ठान आपापल्या परीने समाजासाठी आपापले योगदान देत आहेत. याचा अभिमान नक्कीच आहे. नावे आणि कार्ये जरी वेगवेगळी असली, तरी त्यांचा अंतिम उद्देश समाजासाठी काही भरीव कार्य करणे हाच असतो. आजही अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या संस्थांचे कार्य सर्वत्र पोहोचवता यावे, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी तसेच त्यांच्या सर्व आगामी उपक्रमांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माध्यम बनून हा एक छोटासा उपक्रम सुरू करत आहोत. - [Contact Discover Maharashtra | संपर्क साधा](https://www.discovermh.com/contact-discover-maharashtra/): Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक पोर्टल आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. - [अपरिचित महाराष्ट्र विषयी | About Discover Maharashtra](https://www.discovermh.com/about-discover-maharashtra/): गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवाचे,शौर्याचे,पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार आहेत.त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास अपूर्णच.शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे मूक साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची आज आपण काय अवस्था करून ठेवली आहे ?(About Discover Maharashtra) ## Categories - [Aditya Chounde](https://www.discovermh.com/bloggers/aditya-chounde/) - [Anil Dudhane](https://www.discovermh.com/bloggers/anil-dudhane/) - [Bloggers](https://www.discovermh.com/bloggers/) - [Kiran Khamkar](https://www.discovermh.com/bloggers/kiran-khamkar/) - [Pruthvi Dhawad](https://www.discovermh.com/bloggers/pruthvi-dhawad/) - [Ramesh Kharmale](https://www.discovermh.com/bloggers/ramesh-kharmale/) - [Rohan Gadekar](https://www.discovermh.com/bloggers/rohan-gadekar/) - [Shrimala K. G.](https://www.discovermh.com/bloggers/shrimala-k-g/) - [Sumeet Lokhande](https://www.discovermh.com/bloggers/sumeet-lokhande/) - [Suyog Shembekar](https://www.discovermh.com/bloggers/suyog-shembekar/) - [Vidarbha Darshan](https://www.discovermh.com/bloggers/vidarbha-darshan/) - [Video](https://www.discovermh.com/video/) - [अपरिचित इतिहास](https://www.discovermh.com/history/unknown-history/) - [आठवणी इतिहासाच्या](https://www.discovermh.com/bloggers/aathvani-etihasachya/) - [आम्हीच ते वेडे](https://www.discovermh.com/bloggers/amhichtevede/) - [आशुतोष बापट](https://www.discovermh.com/bloggers/ashutosh-bapat/) - [इतिहास](https://www.discovermh.com/history/) - [उपक्रमा विषयी](https://www.discovermh.com/about-discover-mh/) - [ऐतिहासिक गढी‎ आणि वाडे](https://www.discovermh.com/the-glory-of-maharashtra/historic-forts-and-castles/) - [कथा](https://www.discovermh.com/blogs/the-story/) - [कविता](https://www.discovermh.com/blogs/poems/) - [किरण शेलार](https://www.discovermh.com/bloggers/kiran-shelar/) - [कृष्णा घाडगे](https://www.discovermh.com/bloggers/krishna-ghadge/) - [खांदेरीचा रणसंग्राम](https://www.discovermh.com/history/khanderi-battle-info/) - [खानदेश](https://www.discovermh.com/bloggers/khandesh/) - [खानदेश](https://www.discovermh.com/history/khandesh-history/) - [गड किल्ले संवर्धन मोहिमा](https://www.discovermh.com/gad-kille-mohim/) - [घराण्याचा इतिहास](https://www.discovermh.com/history/family-history/) - [छत्रपती शिवाजी महाराज](https://www.discovermh.com/shivaji-maharaj/) - [छत्रपती संभाजी महाराज](https://www.discovermh.com/biography/chhatrapati-sambhaji-maharaj/) - [जीवनचरित्र](https://www.discovermh.com/biography/) - [झुंज - रामशेजची कथा](https://www.discovermh.com/history/the-story-of-ramshej/) - [टीम पुढची मोहीम](https://www.discovermh.com/bloggers/team-pudhachi-mohim/) - [डाँ.धम्मपाल माशाळकर](https://www.discovermh.com/bloggers/dr-dhammapal-mashalkar/) - [तीर्थक्षेत्र](https://www.discovermh.com/the-glory-of-maharashtra/pilgrimage/) - [दिनविशेष](https://www.discovermh.com/history/day-special/) - [दुर्ग भरारी](https://www.discovermh.com/bloggers/durgbharari-team/) - [धबधबे](https://www.discovermh.com/the-glory-of-maharashtra/waterfalls/) - [नागेश सावंत](https://www.discovermh.com/bloggers/nagesh-sawant/) - [पुस्तक परिचय](https://www.discovermh.com/blogs/book-introduction/) - [प्रणव कुलकर्णी](https://www.discovermh.com/bloggers/pranav-kulkarni/) - [प्रमोद करजगी](https://www.discovermh.com/bloggers/pramod-karajagi/) - [प्रवास](https://www.discovermh.com/travel/) - [प्रसाद पाठक](https://www.discovermh.com/bloggers/prasad-pathak/) - [प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के](https://www.discovermh.com/bloggers/dr-arvind-sontakke/) - [बाजींद कांदबरी](https://www.discovermh.com/biography/bajind-kandabari/) - [मकरंद करंदीकर](https://www.discovermh.com/bloggers/makarand-karandikar/) - [मजेशीर गोष्टी](https://www.discovermh.com/blogs/fun-stuff/) - [मयुर खोपेकर](https://www.discovermh.com/bloggers/mayur-khopekar/) - [मराठा रियासत](https://www.discovermh.com/bloggers/maratha-riyasat/)