गड किल्ले संवर्धन मोहिमा

असावा संवर्धन मोहीम क्र -४

असावा संवर्धन मोहीम क्र -४

मोहिमे अंतर्गत करण्यात येणारे कामे.
१)आपला मुख्य उद्देश वृक्षारोपण हा आहे..वृक्षारोपण म्हणजे १००-१५० झाडे लावून पब्लिसीटी स्टंट आपल्याला करायचे नाहीयेत. तेथील भौगोलिक परिस्थितीला अनुरुप १५-२० झाडे लावून त्यांना जगवणे हेच आपले वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे.
२)गडावर पिण्याचे पाणी नाहीये (गुहेतील पाणी वापरल जात)गडावरील छोटे टाके आपण पूर्ण साफ केलेले आहे..पण ते पाणी किती दिवस राहील याबद्दल शंका आहे.म्हणूनच येत्या मोहिमेत सदस्य संख्या जास्त झाली तर दोन गट करुन एक गट वृक्षारोपण तर दुसरा गट मोठे टाक साफ करण्यास सुरुवात करेल.
३)जाताना-येताना दिशादर्शक लावण्याचे प्रयोजन आहे.चकवा देणाऱ्या वाटा असलेने याची गरज आहे.तेव्हा हे फलक कुठे लावायचे हे गड चढताना उतरताना ठरवण्यात येईल.
४)गडावर दोन्ही टाक्यांवर जाळी टाकण्याचे प्रयोजन आहे..जेणे करुन येणारे दृष्ट लोक दगड माती किंवा इतर कचरा टाकून ते खराब करणार नाहीत.
५)भविष्यात मोठ्या बांधीव टाक्याचेही काम आपल्याला करायचे आहे.पण हे सर्व आपल्या पाठिंब्यावर,सहकार्यावर अवलंबून असेल.
६) ज्या किल्ल्याच नावही लोकांना माहिती नाही..तो किल्ला सर्वांनी पहायला याव अस काम आपल्याला करायच आहे..फक्त आपली साथ सोबत अशीच राहूद्या
कामाची यादी खूप मोठी आहे.पण बोलत बसण्यापेक्षा आपण काम करण्यावर भर देऊ.या कामासाठी आपल्यासारख्या शिवरायांच्या विचाराने प्रेरीत लोकांची गरज आहे..तेव्हा आपल्या सोबत आपला मित्र,भाऊ,बहिण यांना या शिवकार्यात आणून हे कार्य पूर्ण करण्यात सहकार्य करावे.

संपर्क Amol Mandavkar ९९२०४१८०८६

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close