Discover Maharashtra | अपरिचित महाराष्ट्र

सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास आणि संस्कृती जगाला दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Discover Maharashtra आपल्या सर्वांचं आहे. इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल, गॅजेटस, टॅबलेट, आय-पॅड, या सगळ्या नव्या युगाच्या तंत्रज्ञानात आपल्या महाराष्ट्राची इत्यान्त्भूत माहिती देण्यासाठी शेकडो आबाल-वृद्धांचे “Discover Maharashtra” हे एक हक्काचे व्यासपीठ. “आम्ही” आहोत फक्त एक माध्यम. “आपल्या”तल्या लेखकाला जागा करुन, त्याला लिहिण्याची उर्मी देऊन, त्याला लिहितं करणं आणि हे लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं हेच “आमचं” काम. यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हे “आमचं” मुख्य काम.

Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे.