VideoVinayak Parab Vlogsमहाराष्ट्रातील गडकिल्ले

Bhimashankar Trek | भीमाशंकर – शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक

Bhimashankar | Bhimashankar Trek | भीमाशंकर ज्योतिर्लिंग – शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक | Vinayak Parab

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

भीमाशंकर भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता
१) कर्जत ला उतरुन – कशेळी साठि बस पकडावी – कशेळी वरुन – खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
२) नेरळ ला उतरुन – ला उतरुन – कशेळी साठि ६ सिटर टमटम पकडावी – कशेळी वरुन – खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे खांडसा गावातुन हा ट्रेक 5/6 तासाचा वेळ लागतो पोहचण्यासाठी.
चित्रिकरण – यश गोळे / विनायक परब
चित्रिकरणाची साधणे – Go pro 7 Black

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close