इतिहास

शिवगारदचा अर्थ‬

महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तीला मराठीत गारद म्हाणतात
ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला अल्काब तर संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली म्हाणले जाते
छत्रपती शिवरायांची अल्काब व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात

दुर्गपती – गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य (राज्य) आहे असे

गज-अश्वपती – असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे
त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं
तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो

भूपती प्रजापती – वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार
हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे

सुवर्णरत्नश्रीपती – नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे शिवरायांच्या बाबती ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती

अष्टावधानजागृत – आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा )

अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात निपूण असलेले आठ प्रधान आहेत
आणि राज्यकारभारात त्यांचा सल्लाही घेणारे राजे

न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – प्रत्येक शस्त्रविद्येत व शास्त्रात पारंगत (निपूण) असलेले राजे

राजनितीधुरंधर – राजकारणात ( राजनितीमध्ये ) तरबेज असलेले राजे

प्रौढप्रतापपुरंधर – पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे परमप्रतापी राजे

क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुलात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे

सिंहासनाधिश्वर – जसा देव्हार्यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती

महाराजाधिराज – सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सार्या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजा

राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे शिवराय

मुजरा…….राजं……….मुजरा…

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close